Login

अधीर मन बावरे, 5

एक हळुवार प्रेम कथा
अधीर मन बावरे... 6
दीर्घ कथा स्पर्धा, डिसेंबर 2025/ जानेवारी 2026


नीलिमा त्या केबिन मधून बाहेर आली. ती खाली येऊन जयश्री ची वाट बघायला लागली. कदाचित तिला वेळ लागणार होता.
ती इकडे तिकडे बघत टाईमपास करायला लागली.
काही वेळातच जयश्री बाहेर आली ती पण खुश दिसत होती.
ती नीलिमा जवळ आली.
काय गं, झालं सिलेक्शन? "
नीलिमाने तिला हसतच येताना बघून विचारलं.

झालं, पण पगार काही खास नाही, आणि वेळ भरपूर, दहा ते सात, काम पण भरपूर, मला दोन तीन प्रॅक्टिस करून दाखवायला लावली, तू सांग, तुझं काय
तिने उत्सुकतेने विचारलं

चल बाहेर, इथे नको बडबड करायला, चल असं बोलत त्या दोघी बाहेर आल्या.

ए काही तरी खाऊन घेऊ बाई मला भूक लागली, आणि तुला तर माहिती, आमच्या घरी आत्ता गेलं तर आधी कामाचे ढीग उपसावे लागतील मग दोन घास खायला मिळतील, मला तर बाबा बोलले तरी वाईट वाटत नाही आता,
नीलिमा गाडी काढत बोलली.

त्या दोघी तिथून जवळ असलेल्या एका कॅफे मध्ये गेल्या, आणि ऑर्डर देऊन बोलायला लागल्या
"अगं, खुशाल माझी साइन घेतली, म्हणे कामाची वेळ अनिश्चित, असं कुठल्या कंपनीत असतं गं, मग मी पण माझा झटका दाखवला, मी सरळ त्या कागदाचेफोटो काढून घेतलं, आणि तुला सांगते,, साइन पण मी फेक केल्यात, मला तर ती बाईच फेक वाटली, काय माहिती का पण मला ठीक नाही वाटलं, म्हणून म्हणलं बघू, तसं पण कोण इथे कायम नोकरी करणार?
नीलिमा हसतच बोलली.

हो ना गं, सगळं विचित्र काम आहे, ज्युनियर अकाउंटन्ट साठी कोण एवढे राऊंड्स घेत का, मला सुद्धा पटलं नाही, तू पण इथून पुढे काळजी घे बाई, बरं का, काही कागदपत्र, तुझ्या वस्तू नीट ठेव, आणि त्या बॉस पासून जरा सावध रहा,
जयश्री तिला सांगत होती.

नीलिमा घरी आली.
काय गं, इंटरव्हिव होता ना, इतका वेळ लागतो का मग,
तिची आई ओरडली.

उद्या पासून मला आठ वाजता निघावं लागणार आहे, त्यामुळे भांडी वगैरे बघून घ्या, धुणं पण जमणार नाही,
नीलिमा थंड स्वरात बोलली.

अगं बाई, नोकरी लागली तर असं बोलते आहे, कंपनीची मालकीण झाली. आहे, काय गं,
आई चिडून बोलली.

आई नशिबात असेल तर तसं पण होईल कोणी सांगावं, आणि हो, उद्या जर लग्न झालं माझं तर तिथून येऊन भांडी धुणं करणार आहे का मी, जाऊ द मला तयारी करायची आहे, भाजी वगैरे आहे का, नसेल तर आणून ठेव, नाही तर आमच्या कडे जेवण मिळत, घरी असलं सगळं तर मी करून जाईन,
नीलिमा बोलून वर निघून गेली.

लग्न? लग्न तर करायचच आहे गं तुझं
तिची आई तिच्याकडे बघून कुत्सित स्वरात बोलली.
सदर कथेचे भाग नियमित प्रकाशित होणार असून वाचण्यासाठी पेजला फॉलो करा.
सेटिंग मध्ये जाऊन फेव्हरेट ऑप्शन निवडा म्हणजे भाग पोस्ट झाला की समजेल.
0

🎭 Series Post

View all