भाग -तीन
नकळत तिने त्याच्याकडे पाहिले नी त्यांची नजरानजर झाली.
तिच्या डोळ्यात त्याला काळजी दिसत होती.
"अगं, पहिल्यांदाच असा आजारी पडलो. पण तू मला माफ केलेस ना?" रवीची नजर तिच्यावरच होती.
"हो रे, मी तर ते विसरलेही." हसून ती.
"झाले का तुमचे पॅच अप? आता कसले गैरसमज तर नाही आहेत ना?" आकाश आत येत म्हणाला. त्यावर दोघेही हसले.
"फ्रेंड्स?" रवीने तिच्यापुढे हात समोर केला तशी थोडीशी ती गोंधळली. बावरून तिने आकाशकडे पाहिलं.
"तुझ्या मित्राची बहीण म्हणून विचारतो आहेस का?" ती.
"माझा मित्र वेडा असेल पण तुझी मैत्रीण तर नकटी आहे ना." तिला वाकुल्या दाखवत आकाश तिच्या हातून निसटला.
"आँ? अगं, आता मध्येच कालचे कसे आले?" तो म्हणाला.
" माझ्या मैत्रिणीला काही बोलशील तर मागच्या जन्मातील गोष्टी देखील मी उकरून काढीन. आता आईला काय सांगते ते बघच तू." ती विजयी मुद्रेने म्हणाली.
" ये नको गं बाई. तुझ्या नकट्या नेहाला यापुढे मी कधीच नकटी म्हणणार नाही." त्याने आपले हात जोडले.
"ओरडायला काय झाले गं?" तोवर आई आत आली होती.
"असे काय रे बाळा? तू पी बघू. तब्येतीला बरे असते." रवीच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाली.
"डेमो!" ती हसून म्हणाली. "माझ्याशी मैत्री करायची असेल तर अशा प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे ध्यानात ठेव. मला हरण्याची सवय नाहीये आणि दादाला मी हरवू शकत नाही. कारण शेवटी आम्हा दोघांची नाळ एकत्रच जुळली होती ना? त्यामुळे आमच्या भांडणात तू कधी, कसा अडकशील तुलाही कळणार नाही बरं, चालेल ना? विचार कर नी मगच मैत्रीचा हात पुढे कर." आपली एक भुवई उंचावत ती म्हणाली.
"अशा अडकण्याने आईचे प्रेम मिळत असेल तर तुझ्याशी मैत्री करायला आवडेल मला." त्याने परत आपला हात समोर केला.
तिनेही मग त्याच्या हातात हात दिला आणि मग सुरु झाला त्यांच्यातील नव्या नात्याचा प्रवास!
********
"आज खायला काय आवडेल तुला?" मेघा.
"रवी बाळा, जेवणात काय करू रे? तुला काय आवडतं? "
नाश्ता करताना आई रवीला विचारत होती.
"पालक पनीर! काकू पालक पनीर बनवाल का तुम्ही? मी आजवर कधीच खाल्लेलं नाहीये."
जेवताना मेघाच्या आईने मुद्दाम त्याला जास्त भाजी वाढली. त्याच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव बघून त्या माऊलीला तृप्त झाल्यासारखे वाटले.
"आई, तू बाबाला एवढ्या सहजतेने तुझ्या अंतरात कसे दडवून ठेवलेस गं? त्याच्या आठवणीने तुला त्रास होत नाही का?" जेवताना तेजस्विनी मेघाला विचारत होती.
त्याच्या आवडीची भाजी त्याच्यासारखीच खात असलेल्या लेकीकडे पाहून ती म्हणाली.
"मग त्याच्या आठवणीने मला इतका त्रास का होतो? तुझ्यासारखे संयत राहणे मला का जमत नाही? बाबा मला कळलाच नाही का गं?" तेजस्विनीच्या डोळ्यात पुन्हा आसवांची गर्दी होऊ लागली.
"शुऽऽ! पुन्हा असं म्हणू नकोस हं. तुझ्याइतका तुझा बाबा कदाचित कोणालाच कळला नसेल. मलाही नाही. उगाच का त्याची प्रत्येक गोष्ट तुझ्यात सामावली आहे? बाबा तुझ्या आतच आहे, अंतर्मनाने एक साद घालून तर बघ, मला जाणवणारे त्याचे अस्तित्व तुलाही जाणवायला लागेल." तिच्या केसातून हात फिरवत ती म्हणाली.
"आई, ती खिडकी बंद कर ना. पावसाचा आवाजही आता नकोसा वाटतो गं." तिच्या डोळ्यात पुन्हा मेघ दाटले.
"आई, तू काय करते आहेस?"
"काही नाही. तू केवळ एकवार बघ तर ह्या पावसाकडे." खिडकीच्या काचा सरकावत ती म्हणाली.
त्या भर पावसात तिरंग्यात गुंडाळलेला बाबाचा देह तिच्या नजरेसमोर आला.
तिच्या मनात कालवाकालव होऊ लागली.
तुझ्या मनी वेदना.
कशी मी राहू, बोल कुठे जाऊ?
मला काही समजेना.
साद ही घालते लाडकी तुला.
जगण्या तू दिला, माझ्या जीवा अर्थ खरा.
बाबा..
थांब ना रे तू बाबा
जाऊ नको दूर बाबा..'
"आई, हा पाऊस पहिला की मला केवळ शेवटचाच बाबा आठवतो गं. बाकीच्या इतर सर्व स्मृती पुसल्या गेल्याहेत असे वाटते."
ती मेघाला मिठी मारून रडत म्हणाली.
" माझा एवढा शूर पिल्लू असा रडका कधीपासून झालाय हं?" मेघा बळेच हसत म्हणाली. "आणि आठवणी अशा पुसल्या जात नाहीत गं. हां, त्यांच्यावर जराशी धूळ तेवढी साचली असेल. पावसाचे दोन थेंब त्याच्यावर उडाले की त्याही आठवणी स्पष्ट होतील." तिला शांत करत मेघा म्हणाली.
"बाबाऽऽ!" त्याच्या येण्याने तिला कोण आनंद झाला होता!
**********
बाबाविना कसा असेल तेजस्विनीचा प्रवास? कळण्यासाठी वाचत राहा, कथामालिका अधीर मन झाले!
पुढील भाग लवकरच.
**********
************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा