अधीर मन झाले..(भाग ३७)

अधीर मन झाले.. एक प्रेमकथा
"अरे एवढं घाबरायला काय झालं संभव? इकडे ये... बस इथे आणि आता बोल." संभवच्या हाताला पकडून त्याला बेडवर बसवत समर बोलला.

समरच्या अचानक आलेल्या प्रश्नांमुळे संभव थोडा गडबडला.

"तू समजतो तसं काहीच नाहीये रे दादू?" नजर चोरत संभव बोलला.

"मी कुठे काय समजलो तेव्हा आणि तुला काय रे माहित मी काय समजलो ते? उगीच चोराच्या मनात चांदणे." हसतच समर बोलला.

"म्हणजे तसे नाही, पण असं अचानक आम्हाला समोर पाहिल्यावर तुमच्याही मनात काहीतरी विचार आलाच असेल ना?"

"हो आला ना. तू माझ्याशी खोटं बोलून ओवीला भेटायला का गेला असशील? इतकं काय महत्त्वाचं काम होतं तुझं ओवीकडे? हे असे काहीबाही विचार मनात सुरू आहेत बघ.आहे तुझ्याकडे या प्रश्नांची उत्तरं?"

"तुला खरं सांगू दादू..."

"तेच तर बोलतोय मगाचपासून, जे काही असेल ते अगदी खरं खरं सांग."

"अरे माझं काही महत्त्वाचं काम नव्हतं ओवीकडे. सहजच तिला भेटायला गेलो होतो. उद्या जाणार आहे मी म्हणून मग तिला भेटावंसं वाटलं बाकी काही नाही."

"अच्छा... याचा अर्थ तुला तिला भेटावंसं वाटलं! पण का रे?" चेहऱ्यावर गमतीशीर हावभाव आणत समर बोलला.

"असंच रे दादू... तिच्याशी बोललं की एक प्रकारची पॉझिटिव एनर्जी मिळते, म्हणून." नजर चोरत संभव उत्तरला.

"ओह! वाव... असं आहे तर. गुड प्रोग्रेस माय ब्रदर." संभवच्या पाठीवर शाबासकीची थाप देत समर बोलला.

"ये दादू गप रे. उगीच असा विचित्र लूक देवू नकोस ना आणि ओव्हर रिॲक्ट तर अजिबात करू नकोस. आधीच वहिनीने आणि तू आमची चोरी रंगे हाथ पकडल्याचं गिल्ट येतंय आणि तुला मजा येतिये होय."

"तसं नाही रे.. पण तुझ्या लक्षात येतंय का, की तू ओवीच्या प्रेमात पडलायेस संभव."

"आय नो दादू...पण बरं झालं तू सांगितलंस. म्हणजे आता खात्री तर पटली हे प्रेमच आहे म्हणून."

"शहाण्या... मुलींपासून नेहमी चार हात दूर राहणारा तू आज चक्क एका मुलीच्या प्रेमात पडलायेस सोन्या. माझा खरंच विश्वास बसत नाहीये या गोष्टीवर. पण हे एक बरंच झालं. जो होता है वो अच्छे के लिये होता हैं मेरे भाई. तुझ्यासाठी मुलगी शोधण्याचे आमचे कष्ट वाचले बाबा आता. आमचं खूप मोठं काम हलकं केलंस तू."

"काहीही काय रे... दादू पण हे इतक्यात तरी वहिनीला अजिबात सांगू नकोस हा आणि वहिनीलाच नाही तर इतक्यात कोणालाच काही बोलू नकोस."

"का रे बाबा. इतरांचे जाऊ दे पण वहिनीला का नको सांगू. यार माझी बायको आहे ती आणि तिला काही सांगू नको म्हणतोस तू. दिस इज नॉट फेअर आ."

"अरे मी यासाठी म्हणतोय की तिने ओवीला काही सांगायला नको इतक्यात म्हणून."

"पण तू तिच्याच बहिणीच्या प्रेमात पडलास ना मग तिला कळायला नको? "

"दादू यार समजून घे ना. आता कुठे ओवीने माझी मैत्री एक्सेप्ट केलिये, सध्या तरी तेवढंच पुरेसं आहे रे माझ्यासाठी. कारण मला तिच्याबद्दल जे वाटतं तेच तिलाही माझ्याबद्दल वाटावं हा इतक्यात तरी अट्टाहास नाहीये माझा. कोणतीही गोष्ट मला तिच्यावर लादायची नाहीये. तिच्या मनाचा कौल देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि तिच्याही मनात जर तसे काही असेलच तर मला हे प्रेम हळूहळू फुलायला हवंय. पण त्यासाठी आधी मैत्रीतील विश्वासाचे नाते घट्ट व्हायला हवे आणि माझ्या मनातील भावना मी स्वतःहून तिला सांगेल. असं दुसऱ्याने कोणी सांगितलं तर नात्यातील विश्वास नातं सुरू होण्याआधीच कमी होइल रे, असं वाटतं."

"ये हुई ना बात. तुझं काम कसं एकदम नियमबद्ध असतं बाबा. आता मैत्री आणि प्रेमात देखील तसंच, पण असो...तुमच्या दोघांच्याही मैत्रीला आणि प्रेमाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. पण काय रे... तुला असं वाटत नाही का... की ओवीच्या मनात देखील तुझ्याबद्दल त्याच भावना आहेत म्हणून?"

"वाटतं ना... तिच्या प्रत्येक रिएक्शन मधून मला जाणवतं तसं. पण काय सांगावं बाबा, ती ओवी आहे. तिच्या मनाचा थांग लागणं अवघड आहे. वरवर आपण कितीही अंदाज बांधले तरी तिच्या मनाच्या खोल तळाशी काय असेल याचा अचूक अंदाज लावणं कठीणच."

"पण जर तिच्याही मनात तुझ्याविषयी त्याच भावना असतील तर मग?"

"तसे जरी असले तरीपण इतक्यात तरी मला तिच्या मनातील गोष्टी बाहेर नाही येवू द्यायच्या. कोणतीही घाई नाही करायची मला. सगळ्यात आधी आमची मैत्री भरभरून जगायची आहे मला. त्यात याहीपेक्षा तिचे करिअर महत्त्वाचे आहे दादू. उगीच माझ्यामुळे तिचे नुकसान व्हायला नकोय मला. फर्स्ट प्रायोरिटी तिने तिच्या करिअरलाच द्यायला हवी आणि मग बाकी इतर गोष्टी. जसं की मी केलं. आयुष्यात सक्सेस व्हायचे असेल तर मनातील भावनांना मुरड घालता यायला हवी. "

"गुड... हे अगदी बरोबर बोललास बघ तू. पण मैत्रीच्या नात्यातील प्रेमाचा गंध मात्र मनाच्या कप्प्यात अलगद साठवून ठेव. बाकी सध्या तरी एवढंच म्हणेन मी की अगदी योग्य ट्रॅक पकडलायेस तू."

"थॅन्क्स दादू. असाच तुझा सपोर्ट शेवटपर्यंत राहू दे."

"तो तर कायमच असणार आहे रे. आय एम अल्वेज विथ यू माय ब्रदर."

"लव्ह यू दादू." म्हणत संभवने घट्ट मिठी मारली त्याच्या दादुला."

समरने तर त्याचे काम केले. तिकडे आता कार्तिकी देखील  ओवीला फोन करण्याच्याच तयारीत होती. जस्ट सर्व आवरून ती तिच्या खोलीत आली. तेवढ्यात समर देखील रूममधे आला.

"ये काय झालं? बोलले का भाऊजी काही? आपल्याला वाटतं तसंच आहे ना? बोल ना पटकन्."

"तू पॉज घेशील तर मी बोलेल ना."

"सॉरी.. बोल आता."

समरने मग सर्व काही कार्तिकीला सांगितले. कार्तिकीचा आनंद तर गगनात मावेनासा झाला.

"वाव... आता ओवीच्या मनातील गोष्टी एकदा का समजल्या की मग झालं." उत्साहाच्या भरात कार्तिकी बोलली.

"झालं काय झालं? अजिबात नाही आ कार्तिकी. कुठलीही घाई करू नकोस. आता कुठे त्यांच्यात मैत्री झालिये. आपल्याला त्यांची मैत्री फुलायला वेळ तर द्यायला हवा ना. त्यामुळे इतक्यात तरी कोणतीही घाई करु नकोस. असे संभवनेच सांगितलंय."

"पण अरे ओवीच्या मनात देखील काय आहे हे आपल्याला काढून घ्यायला हवं ना."

"त्याची गरज नाहिये कार्तिकी. मी तुला आधीही म्हणत होतो, तू खूपच घाई करतियेस आणि तूही ओवीला इतक्यात तरी काही विचारणार नाहीयेस."

"असं कसं रे समर. आता तू तुझ्या भावासोबत बोललास ना मग मी का नाही बोलायचं माझ्या बहिणीसोबत? मी बोलणार."

"म्हणूनच तुला काहीच सांगू नको असं संभव म्हणत होता. तुम्ही बायका ना प्रत्येक बाबतीत जरा जास्तच उतावीळ असता. तुझ्याच बहिणीच्या भल्यासाठी तो बोलतोय."

"मग मीही तिच्याच भल्याचा विचार करतेय ना."


"अगं हो बाई. मी कुठे नाही म्हणालो. पण ओवीचं अजून कॉलेज सुरू आहे. पुढची दोन वर्ष खूप महत्त्वाची आहेत  तिच्यासाठी. ते दोघं पाहून घेतील ना काय करायचं ते. आपण आता त्यांच्यात लुडबुड नको करुयात आणि माझा संभववर पूर्ण विश्वास आहे. तो सगळं कसं अगदी बरोबर मॅनेज करेल."

"ह्ममम... तुझा तुझ्या भावावर विश्वास आहे पण बायकोवर नाही. जाऊ दे आजकाल मी काहीही करायला गेले तर तुला ते आवडत नाही."

"असं काही नाहीये गं बाई. तुला मदत करू का मी पॅकिंग करायला?"

"काही नको झालंय सगळं पॅकिंग." लटक्या रागातच कार्तिकी उत्तरली.

"मग अजून काही काम बाकी असेल तर मी करतो. तू सांग फक्त."

"कळतंय मला सगळं... पण तुझा हा मस्का माझ्या रागाला नाही वितळवू शकणार हेही ध्यानात ठेव."

"अरे बापरे! आता तर अवघडच झालं मग. आता काय बरं करू मी. काही सुचतच नाहीये. माझं तर पहिलंच लग्न आहे ना हे. त्यामुळे बायकोला मनवण्याचा अनुभव थोडा कमी पडतोय. काय बरं करावं आता? गाणं म्हणू का की गोष्ट सांगू बरं?" समर स्वतःशीच बडबडत होता.

समरची ॲक्टिंग पाहून कार्तिकीला आपसूकच हसू आलं.

"काही करू नकोस शहाण्या. उगीच वकील झालास, तू तर ॲक्टर व्हायला हवं होतंस."

"हो का मॅडम. पण गेला ना आता तुझा राग?"

कार्तिकीच्या गळ्यात आपल्या दोन्ही हातांचा हार घालत थोडा रोमँटिक होत समर बोलला.

"नाही गेला आणि तो जाणार पण नाही." आता कार्तिकी पण थोडा भावच खात होती.

"असं नको करू राणी. उद्या हनिमून टूरवर जायचंय आपल्याला. असं रुसण्यात आणि मनवण्यातच आपला वेळ गेला तर मग कसं व्हायचं?"

"ते तू तुझं बघ आता." नजर खाली झुकवत थोडा जास्तच भाव खात कार्तिकी बोलली.

"मी माझं कसं बघणार. माझ्या माहितीप्रमाणे हनिमून हा दोघांचा असतो ना. मग तुझ्याशिवाय माझा हनिमून थोडीच ना होणार आहे."

"गप्प बस चावट." नजर चोरत लाजतच कार्तिकी बोलली आणि लाजून ती पाठमोरी झाली. न राहवून समरने मग पाठमोऱ्या कार्तिकीला घट्ट मिठी मारली. हळूच तिच्या कानात लव्ह यू म्हणत त्याने प्रेमाची पुन्हा एकदा कबुली दिली. त्याच्या त्या गरम श्वासांनी तीही मोहरली.

"कार्तिकी यार आता नाही थांबवू शकत मी स्वतःला." पुन्हा एकदा त्याचे गरम श्वास तिच्या कानावर रुंजी घालू लागले.

"पहाटे लवकर उठायचे आहे माहीत आहे ना. मग लवकर झोपायला हवं ना." म्हणत कार्तिकी समरच्या मिठीतून अलगद बाजूला झाली.

"अरे काय हे... तू पण ना बायको. खूप अंत पाहतेस यार माझा."

"त्यात तर खरी मजा असते." हसतच कार्तिकी बोलली.

तेवढ्यात तिचा फोन वाजला. ओवीचा फोन होता.

'आता पुढचा एक तास काही दोघींच्या गप्पा संपणार नाहीत. बरोबर वेळेत फोन केलाय आमच्या मेहुणीबाईंनी.' तोंडातल्या तोंडात समर पुटपुटला आणि बेडवर आडवा झाला.

"बोल गं ओवी.. काय म्हणतेस?"

"कुठे काय..मला वाटलं तू फोन करशील, मी वाट पाहत होते. मग न राहवून मीच केला. झाली उद्याची तयारी?"

"हो गं झाली. बाकी काय म्हणतेस?"

"काही नाही गं. तूच सांग, कुठपर्यंत पोहोचली तुमची गाडी."

"अजून जिथे आहे तिथेच आहे."

"अरे देवा..खूपच स्लो आहात बाबा तुम्ही."

"सब्र का फल मीठा होता है ना." कार्तिकी म्हणाली.

"अच्छा... असं आहे होय. मग काही खरं नाही बाबा वकीलसाहेबांचं."

"तू नको लगेच त्याची बाजू घेऊस."

"आता नाही उशीर होत वाटतं. सकाळी लवकर उठायचंय ना, मग लवकर झोपायला हवं." कार्तिकीला टोमणा मारत समर बोलला.

"काय गं काय म्हणत आहेत वकीलसाहेब?"

"काही नाही गं तू लक्ष नको देवूस."

"बरं झोपा आता. सकाळी लवकर जायचे आहे ना? उगीच आता जागरण करत बसू नका. वकील साहेबांना म्हणावं तुम्हीही झोपा. जे काही जागरण करायचे ते हनिमूनला गेल्यावर करा." समर आणि कार्तिकीची खेचत ओवी बोलली.

"आता तू सांग आम्हाला."

"गम्मत केली गं. चालू द्या तुमचं. मी झोपते आता. बरं तुम्हा दोघांनाही हॅप्पी जर्नी. मस्त एन्जॉय करा."

"हो गं आणि तूही अभ्यासाकडे लक्ष दे जरा. एक्झाम जवळ आलीये हे विसरू नकोस आणि सद्ध्या सोशल मीडियाचा वापर कमीच कर."

"येस बॉस. आता शोभतेस खरी माझी मोठी बहीण."

"हो तर. जरा लक्षच ठेवायला पाहिजे तुझ्याकडे. खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी पण योग्य वेळ आल्यावर."

कार्तिकीला काय बोलायचे आहे ते ओवीला आधीच ठाऊक होते.

"ओके मॅडम...बरं काळजी घ्या दोघेही, चल बाय गुड नाईट." म्हणत ओवीने फोन ठेवला.

एव्हाना संभवचे दोन मिस्ड कॉल झाले होते.  लगेचच मग ओवीने त्याला कॉलबॅक केला.

"हॅलो.. हा बोल."

"काय गं, झालं का वहिनीसोबत बोलणं?" संभवने विचारले.

"हो आता तिचाच कॉल सुरू होता."

"मग काय म्हणाली ती."

"आज पहिल्यांदाच मोठ्या बहिणीसारखं वागत होती ती. अभ्यासावर फोकस कर, सोशल मीडियाचा वापर कमी कर वगैरे वगैरे."

"हो मग.. काय चुकीचं आहे त्यात. बरोबर तर बोलली ती."

"हो ना... आणि रात्री फोनवर माझ्या दिराशी गप्पा मारत बसू नकोस, त्यांच्यापासून दूरच राहा असंही म्हणाली."

"अच्छा... असं आहे तर. पण तसंही मी दूरच जात आहे उद्या. मग नाही त्रास देणार तुला."

"रागावलास? मी गम्मत करत होते ना. असं काही नाही बोलली ती."

"माहितीये गं मला आणि नाही रागावलो मी, पण आता इतके दिवस घरी होतो; त्यामुळे सर्वांना सोडून जाण्याची इच्छाच होत नाहीये."

"समजू शकते यार मी. खूप सॅक्रीफाईज करावं लागतं तुम्हा लोकांना."

"आता असं वाटतंय ना ओवी की तुझ्यासारखं डॉक्टर किंवा वहिनीसारखं इंजिनअर किंवा मग दादूसारखं वकील व्हायला हवं होतं मी. म्हणजे निदान असं आपल्या माणसांपासून दूर तर राहावं लागलं नसतं ना. माहीत नाही आता गेल्यावर पुन्हा केव्हा येणं होईल."

"अजिबात डिस्मुड करून घेऊ नकोस. तुला माहिती असेल पण तरीही पुन्हा सांगते...डॉक्टर, वकील, इंजिनियर तर कोणीही होवू शकतं रे पण एअर फोर्समध्ये असं कोणालाही जाता येत नाही मिस्टर संभव देशमाने. त्यासाठी आधी स्वतःला सिद्ध करावंच लागतं. जे की तू केलं आहेस. जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने मला कॉल कर. आय एम अल्वेज विथ यू."

"थॅन्क्स ओवी... ह्यावेळी खूप गोड आठवणी सोबत घेऊन जातोय मी. ज्या दिवशी आपली पहिली भेट झाली तेव्हापासून तर आजपर्यंत खूप साऱ्या आठवणी साठल्या आहेत. ज्या आठवून आपसूकच माझे टेन्शन कमी होईल, याची खात्री आहे मला. पण काहीही म्हण ओवी, तुला खूप मिस करणार आहे मी."

"मी टू. पण जर शक्य असतं मीच आले असते तुझ्यासोबत." गमतीच्या सुरात ओवी बोलली.

"हो का...चल येतेस मग?"

"तेवढं कुठं आमचं नशीब बाबा."

"आणि नशिबानेच जर संधी दिली तुला माझ्यासोबत येण्याची तर येशील?"

"गप्प बस... काहीही काय?"

"अगं खरंच बोलतोय मी."

"जे होणारच नाही ते बोलू नये माणसाने."

"आणि तसे झालेच तर?"

"तू झोप आता. तुला झोपेची गरज आहे. कारण काहीही बडबडायला लागलायेस तू. मीही झोपते आता. पण त्याआधी तुझ्यासाठी मी अजून बऱ्याच आठवणी पाठवल्या आहेत. फोन ठेवल्यावर व्हॉट्सॲप चेक कर. चल बाय ठेवते मी."

"बाय गुड नाईट म्हणत संभवने देखील घाईतच फोन ठेवला. त्यालाही उत्सुकता लागली होती ओवीने नेमकं काय पाठवलंय याची."

क्रमशः

नेमके काय पाठवले असेल ओवीने? जाणून घेऊयात पुढील भागात.

©® कविता वायकर


🎭 Series Post

View all