अधीर मन झाले..(भाग ४९)

अधीर मन झाले.. एक प्रेमकथा
त्या रात्री सार्थकने खूप विचार केला. क्षणभर 'हे आयुष्यच नको आता' असं वाटलं त्याला. पण लगेचच ओवीने घातलेली शपथ आणि आई बाबांचा चेहरा त्याला आठवला.

'खरंच ओवी म्हणते तसं प्रेम हे दोन्ही बाजूने असेल तरच त्या नात्याला अर्थ आहे. मी कितीही ओवीवर प्रेम केलं, अगदी फुलासारखं तिला जपलं पण तिचं दुसरंच कोणावर प्रेम असेल तर मग आमच्या नात्याला काहीही अर्थ नसेल. उगीच स्वतःच्या स्वार्थासाठी तिच्या प्रेमापासून तिला दूर करण्यात काहीही अर्थ नाहीये आणि ओवी मिळाली नाही म्हणून मी माझ्या जीवाचं काहीतरी बरंवाईट करून घेणं, हेही चुकीचंच आहे. असं अविचाराने वागून नाही चालणार. खरंच आई बाबांचा विचार करायला हवा मला.'

रात्रभर सार्थक विचार करत राहिला. त्याची झोपही जणू कुठेतरी हरवून गेली होती. डोळ्यांतील अश्रू देखील आटले होते.

'खरंच ओवी माझ्या आयुष्यात नसेल तर मी जगू शकेल? काय काय स्वप्न पाहिली होती पण क्षणात सगळं संपलं. आता मन घट्ट करायलाच हवं. ओवी म्हणते तसं आई बाबांसाठी मला स्वत:ला सावरायला हवं. नको तो विचार आधी बंद करायला हवा. पण ओवी यार सोप्पं नाहीये तुला विसरणं. खूप साऱ्या आठवणी आहेत गं आपल्या एकमेकांसोबत. त्या कशा विसरू मी?'

विचार करता करता पुन्हा एकदा जुन्या आठवणींनी सार्थकचे डोळे पाणावले. पहाटे खूप उशिरा त्याचा डोळा लागला.

सकाळी सकाळी त्याचा फोन वाजला. फोनच्या आवाजाने त्याला जाग आली. काळजीपोटी ओवीने त्याला कॉल केला होता.

"हा ओवी, बोल."

"सार्थक..ठीक आहेस ना तू?"

"हो तर...मला काय होणार तेव्हा."

"नक्की ना...?"

"हो गं बाई."

"थॅन्क्स यार..माझ्या भावना समजून घेतल्याबद्दल.. बिग थँक्यू." ओवी म्हणाली.

"अगं थँक्यू काय त्यात! मित्र आहोत ना आपण. एकमेकांना समजून नाही घेतलं तर काय अर्थ आहे मग त्या मैत्रीचा."

'हा नक्की तोच सार्थक आहे ना?' जो रात्री वेड्यासारखं बडबडत होता आणि रात्रीतून इतका मोठा बदल! कसं शक्य आहे? याच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? हा नाटक तर करत नसेल?' सार्थकमधील या अचानक झालेल्या बदलामुळे ओवी क्षणभर गोंधळली.

"काय गं...काय झालं?"

"काही नाही...तू ठीक आहे हे समजलं आणि हायसं वाटलं."

"वाटलं होतं की हे आयुष्यच नको आता पण लगेचच तू घातलेली शपथ आठवली आणि आई बाबांचा विचार आला मनात मग मरणं कॅन्सल केलं." हसत हसत सार्थक बोलला.

"असा विचार देखील कधी मनात आणायचा नाही आ सार्थक. नाहीतर मी आयुष्यभर स्वत:ला माफ करू शकणार नाही."

"ओके बॉस. पण मला एक प्रॉमिस कर, आपली मैत्री मात्र आहे तशीच राहील, त्यात कोणताही बदल होणार नाही."

"प्रॉमिस.."

"थॅन्क्स ओवी...बरं चल आवरतो मी आता. ऑफिसला जायचंय."

"आज सुट्टी नाही तुला?"

"कसली सुट्टी! उलट एक खूप महत्वाची मीटिंग आहे आज."

"ओके, आवर मग."

"सार्थक, जाता जाता एक विचारू?"

"ह्ममम..बोल ना."

"तुला प्रश्न पडला नाही का रे, की माझ्या आयुष्यात असणारी ती व्यक्ती नेमकी कोण आहे?"

"जाणून घेऊन काय करू मी? तू सांग, ज्या व्यक्तीने तुझ्या आयुष्यातून माझा पत्ता कट केला त्या व्यक्तीविषयी उगीच माझ्या मनात घृणा निर्माण व्हायला नको असं वाटतं. कारण त्यात त्या व्यक्तीची तर काहीच चूक नाहीये माहितीये मला."

"पण कधी ना कधी तर तुला कळेलच ना?"

"हो.. पण तोपर्यंत माझ्या मनाची तयारी झालेली असेल ना. त्यामुळे प्लीज आता नको काही सांगू."

"सार्थक... एका रात्रीतून कुठून आलं रे एवढं शहाणपण?"

"माहीत नाही पण शहाणं व्हावं लागेल आता. कारण पूर्वीसारखं कान पकडायला ओवी नसेल ना आता माझ्या आयुष्यात."

"सार्थक.. असं का बोलतोस? मी असेल नेहमी..तू काळजी करू नकोस."

"बरं चल, मी आवरतो आता. तू तुझे स्पेशल डेज एन्जॉय कर. चलो बाय... हॅव अ गुड डे." म्हणत सार्थकने फोन ठेवला सुद्धा.

"ओवीचा फोन सुरू असताना संभवचा दोनदा कॉल येवून गेला. तिने मग लगेचच संभवला कॉल बॅक केला.

"काय गं..काय झालंय ओवी? तू इतकी डिस्टर्ब का आहेस? सार्थक सोबत भांडण तर झालं नाही ना?"

"नाही रे... तसं काही नाही."

"खोटं बोलू नकोस. नक्कीच काहीतरी झालंय ओवी?"

"भेटून बोलुयात का आपण? तसंही आपण भेटतोय ना आज?"

"हो मग. कालच ठरलंय ना आपलं. पण कुठे भेटायचं?"

"कुठेही भेट पण भेट. का कोण जाणे पण आज तुझ्या कुशीत शिरून खूप रडावंसं वाटतंय रे." बोलता बोलता ओवीचे डोळे अश्रूंनी डबडबले.

"ओवी... एनीथिंग सिरियस?"

"नाही... तसं काही नाही. पण खूप अस्वस्थ फील होतंय."

"बरं आवरुन घे. मला भेटल्यावर नक्कीच तुला छान वाटेल. मी लोकेशन सेंड करतो तिकडे ये. की घरी येवू तुला घ्यायला?"

"चालेल...घरीच ये."

"पण घरचे तुला पाठवतील माझ्यासोबत?" मनातली शंका संभवने बोलून दाखवली.

"तू सोबत असल्यावर का नाही पाठवणार? हा फक्त...माधवी काकीला तेवढं नाही पटणार, बाकी कोणी काही नाही बोलणार. आई तर कालच म्हणत होती, तुला संभवसोबत बोलायला सुद्धा नाही मिळालं. त्यांची सुट्टी संपायच्या आत भेटा एकदा दोघेही, छान गप्पा मारा, एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा..असंही म्हणाली."

"चक्क काकू असं म्हणाल्या!"

"हो रे..आई खूप फॉरवर्ड विचारांची आहे आणि तिचा तितकाच विश्वास देखील आहे माझ्यावर त्यामुळे ती जास्त बंधनं नाही लादत माझ्यावर आणि तिचा तोच विश्वास जपणं ही माझी जबाबदारी आहे."

"ग्रेट..मग सासूबाई कोणाच्या आहेत." कॉलर ताठ करत संभव बोलला.

"हो का..."

"हो ना...बरं चल आवरतो मी आणि काकूंनाही कल्पना दे, मी येतोय म्हणून आणि पुढच्या एक दीड तासात पोहोचतो तिकडे."

"हो सांगते मी आईला. ये तू पण सावकाश ये आणि महत्त्वाचं म्हणजे कार सावकाश चालव."

"ओवी... मी कार नाही आणत. बाईकवर येतोय. चालेल ना तुला?"

"हो रे...आवडेल मला बाईकवर तुझ्या पाठी बसायला. तू ये तर आधी."

"ओवी आय एम सो एक्सायटेड यार. पहिल्यांदाच असं एखाद्या मुलीला डेटवर घेऊन जाणार आहे मी."

"मला तर अजिबात एक्साइटमेंट नाही बाबा."

"सिरियसली!"

"मग काय...मी तर रोजच मुलांना डेट वर घेऊन जाते ना"

" खडूस... मी त्या अर्थाने बोललो का गं शहाणे."

"गम्मत केली रे... जा पळ आवरुन घे. मी पण आवरते."

"शून्य मिनिटात आवरतो."

"काहीही..."

"अगं म्हणायचं असतं तसं."

"हो रे सोनुल्या... जातोस ना मग आता आवरायला?"

"होय..बाय खडूस..." म्हणत संभवने फोन ठेवला आणि गाणे गुणगुणत तो बाथरुममध्ये गेला.

तिकडे ओवीने सीमा ताईंना संभव येणार असल्याची कल्पना दिली. त्याच्या सोबत बाहेर जाण्याची परवानगी देखील घेतली. सीमा ताईंनी देखील कोणतेही आढेवेढे न घेता परवानगी दिली.

"आई एक विचारू?" न राहवून ओवीने विचारले.

"हा बोल ना.."

"मी संभव सोबत जाणार याची तुला भीती नाही का गं वाटत? म्हणजे तुझ्या जागी माधवी काकी सारखी दुसरी कोणतीही आई असती तर लग्नाआधी असं भेटायला कधीच परवानगी दिली नसती."

"हे बघ ओवी.. माझा माझ्या लेकीवर आणि माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला घाबरायचं काही कारणच नाही. तसंही संभव एकदा का तिकडे गेला की मग पुन्हा तुमची भेट कदाचित डायरेक्ट तुमच्या लग्नातच होईल आणि हा एंगेजमेंट ते लग्न यादरम्यानचा जो काळ असतो ना तो अविस्मरणीय असा असतो. पुढे आयुष्यभर या सर्व आठवणी पुरतात. लग्न झाल्यावर देखील छान छान आठवणी जोडल्या जातात पण त्यावेळी जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि नातं यांत प्रत्येकाला कितीही नाही म्हटलं तरी तडजोड तडजोड ही करावीच लागते. म्हणूनच एकमेकांसोबत लग्नाआधीच्या काही गोड आठवणींची साठवण करा." ओवीचा हात हातात घेत सीमा ताई बोलल्या. तिच्यावरील त्यांचा विश्वास पाहून ओवीला क्षणभर भरुन आले.

आज पहिल्यांदा ओवी आणि संभव एकमेकांना असं ठरवून भेटणार होते. दोघेही खूपच आतुर झाले होते एकमेकांना भेटायला. ओवी आज खूप दिवसांनी स्वतःला आरशात न्याहाळत होती. एकीकडे संभवला भेटण्याची ओढ तर दुसरीकडे सार्थकची काळजी तिला बेचैन करत होती.

तिकडे संभव देखील आज नेहमीपेक्षा जरा जास्तच छान तयार झाला होता.

"काय मग भाऊजी....आज काही विशेष?"

"कुठे काय...काहीच तरी नाही."

"मग आज सकाळ सकाळ एवढे नटून थटून कुठे निघालात? त्यात स्वारी एवढी खुश दिसत आहे की नक्कीच दाल में कूछ काला है. कुछ तो जरुर है." कार्तिकीने संभवला हटकले. त्याची  खेचायला तिला वेगळीच गम्मत वाटायची.

"अगं वहिनी, खरंच तसं काहीच नाहीये...मी.. ते.. आपलं.. माझ्या एकदम जवळच्या मित्राला भेटायला जात आहे. खूप दिवसांनी भेटत आहे आम्ही आज. त्यामुळे खूपच एक्साईटमेंट आहे अगं."

"चुकून काहीतरी वेगलन ऐकलं का मी..? तुम्हाला मैत्रीण म्हणायचंय ना? बोला बोला, लाजू नका हो. मी कोणालाच नाही सांगणार."

"आता तुझ्यापासून काय लपवायचं वहिनी. अगं ते मी ओवीला भेटायला जात आहे." थोडं अडखळत, लाजतच संभव बोलला.

"वाव...ग्रेट."

"अगं हळू बोल ना. किती मोठ्याने ओरडतेस?"

" सॉरी सॉरी..ते आनंदाच्या भरात बोलून गेले पटकन्. बरं तुम्हाला दोघांनाही माझ्याकडून खूप साऱ्या शूभेच्छा. भेटा, छान गप्पा मारा, लाँग ड्राईव्हला जा, छान एन्जॉय करा. आज तुम्हाला पाहून मला आमची सारसबागेतील ती पहिली भेट आठवली." लाजतच कार्तिकी बोलली.

"हाऊ स्वीट!" कार्तिकीला लाजताणा पाहून संभव पुटपुटला.

"खूप छान दिवस असतात हे. पुढे आयुष्यभर माणूस विसरूच शकत नाही. ती पहिली भेट, तो पहिला स्पर्श, पहिली मिठी... सारं कसं अगदी अविस्मरणीय." जुने दिवस आठवून कार्तिकीच्या चेहऱ्यावर लाजेची कळी खुलली.

"काय हे वहिनी...तू तर कुठून कुठे पोहोचलीस! आम्हाला आज एकमेकांना अजून छान समजून घ्यायचंय, खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, आठवणींची साठवण करायची आहे."

"मीही तेच तर म्हणत आहे भाऊजी, तुम्ही आपलं काहीही विचार करता. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ नका हो घेऊ. बरं आवरा आता. माझी बहिण वाट पाहत असेल तिकडे."

"तू इथेच अशी उभी राहणार आहेस का आता? मी कसं आवरणार मग."

"तुम्ही आणि ओवी दोघेही सारखेच. सरळ सरळ सांगा ना, की बाई तू जा आता आवरू दे मला, माझी होणारी बायको माझी वाट पाहत आहे."

"अरे व्वा...किती हुशार आहे माझी वहिनी."

"असू द्या हा...उगीच पडेल बिडेल मी हरभऱ्याच्या झाडावरून."

"डोन्ट वरी... दादू येईल की मग तुला अलगद झेलायला." केसांतून कंगवा फिरवत संभव बोलला.

"काय बोलावं आता. जातेच बाई मी. तुमच्याशी बोलण्यात थोडीच ना मी जिंकणार आहे."

"बरं वहिनी ऐक ना...आईला काय सांगू मला समजेना."

"जे आहे ते सांगा, त्यात काय एवढं!"

"नको गं... योग्य नाही वाटत ते. कालच आमचा साखरपुडा झाला आणि आज लगेच होणाऱ्या बायकोला घेऊन फिरायला जातोय असं कसं सांगणार ना आईला?"

"ओवीवर माझं प्रेम आहे हे सांगायला घाबरला नाहीत आणि तिला घेऊन फिरायला जातोय हे सांगायला घाबरताय तुम्ही? काय भाऊजी तुम्ही पण."

"तसं नाही गं.. घाबरत वगैरे नाही, पण वाटतं ना मनाला काहीतरी."

"काही नाही वाटत. जाताना आईंना तुम्हीच सांगा आणि जे खरं आहे तेच सांगा. उगीच नंतर समजलं तर वाईट वाटेल त्यांना."

"बरं बाई.. सांगतो, आता जा तू."

"काय खडूस आहात ओ तुम्ही भाऊजी, सरळ सरळ हाकलून लावत आहात मला."

"तसं नाही गं.. पण मी माझ्या होणाऱ्या बायकोला आज पहिल्यांदा डेटवर घेऊन जातोय, खरंतर त्याचंच दडपण आलंय मला. प्लीज समजून घे ना."

"त्यात काय दडपण घ्यायचं? तिला तुम्ही थोडीच ना पहिल्यांदाच भेटताय. एरव्ही रोज फोनवर तासनतास बोलत असताच की."

"फोनवर बोलणं वेगळं आणि असं भेटणं वेगळं गं वहिनी."

"असू द्या वेगळं पण आता तो सगळा विचार काढून टाका बरं मनातून. जेवढा वेळ मिळेल तो मनसोक्त जगा आणि खूप साऱ्या आठवणींची साठवण करा."

"येस.."

तेवढयात नंदा ताईंनी कार्तिकीला आवाज दिला.

"बरं भाऊजी, मी जाते तुम्ही आईंना खरं सांगून जा. मला खात्रीये त्या काही नाही बोलणार."

"हो गं बाई. सांगतो."

कार्तिकीच्या सांगण्यावरून संभव नंदा ताईंना सांगून मगच घराबाहेर पडला. लेक आपल्याला न सांगताही किंवा खोटं बोलून जाऊ शकत होता. पण माझ्या संभवने तसे नाही केले. म्हणून मग नंदा ताईंनाही लेकाचे कौतुक वाटले.

ठरल्याप्रमाणे मग तो छान तयार होवून ओवीला घ्यायला पोहोचला. बेल वाजली तशी ओवीने दाराकडे धाव घेतली. तितक्यात ती दारापर्यंत पोहोचायच्या आधीच माधवी ताईंनी दार उघडले सुद्धा. संभवला सकाळच्या वेळी अचानक असं समोर पाहून त्याही क्षणभर गोंधळल्या.

क्रमशः

आता कशी होणार संभव आणि ओवीची भेट? माधवी ताईंना संभवचे तिकडे येण्याचे कारण समजल्यानंतर त्या ओवीला असं सहजासहजी संभव सोबत बाहेर जाऊ देतील? जाणून घेण्यासाठी वाचत रहा.. अधीर मन झाले...एक प्रेमकथा.

©®कविता वायकर


🎭 Series Post

View all