मागील भागात आपण पाहिले की ओवी आणि संभव टेरेसवर एकांतात काही वेळ घालवतात. थोड्या वेळाने ते आपापल्या खोलीत जातात. आता पाहुयात पुढे.
"बरं आता तू सांगतोस की मी शोधून काढू? इतका वेळ तू कुठे होतास ते?"
तिकडे स्वराजच्या प्रश्नांना उत्तरे देता देता संभवच्या तर नाकी नऊ आले. संभवला छळण्याची एक संधी तो सोडत नव्हता.
तिकडे स्वराजच्या प्रश्नांना उत्तरे देता देता संभवच्या तर नाकी नऊ आले. संभवला छळण्याची एक संधी तो सोडत नव्हता.
दबक्या पावलांनी संभव जेव्हा खोलीत येत होता नेमकी तेव्हाच स्वराजने जणू त्याची चोरी पकडली. कारण संभव जेव्हा बाहेर जात होता तेव्हाही स्वराजची झोपमोड झाली होती आणि आताही तब्बल एक तासानंतर तो जेव्हा आत आला तेव्हाही स्वराजची झोपमोड झाली. बराच वेळ तो रूममधे नव्हता हे त्याच्या लक्षात आले होते. अचानक कोणीतरी दरवाजा उघडून आत येत असल्याचा भास झाला, नेमकी तेव्हाच त्याला जाग आली. मोबाइलचा टॉर्च लावला तर समोर संभव होता. तेव्हापासून त्याचे अनेक प्रश्न सुरु झाले होते.
तिकडे ओवी मात्र संभवच्या आठवणीत कूस बदलत कितीतरी वेळ झोपण्याचा अजूनही प्रयत्न करतच होती. पण तरीही तिला झोप काही लागेना.
संभवच्या मिठीतील तो प्रत्येक क्षण आठवून ती पुन:पुन्हा जगत होती. पापणी आड फक्त संभव आणि त्याच्या सोबतच्या गोड आठवणी दडल्या होत्या. सारं काही आठवून ती एकटीच गालातल्या गालात हसत होती, संभवचा तो स्पर्श आठवून वारंवार मोहरत होती. अजूनही त्याच्या मिठीचा तो सुगंध तिला तिच्या अवतीभोवती जाणवत होता. चंद्राच्या शितल छायेत जणू त्यांचा प्रेमाचा गाव सजला होता. हे सारे सुख पापणीत कायमस्वरूपी बंदिस्त करून ती झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न अजूनही करतच होती. पण आज झोपही तिच्यावर जणू रुसलीच होती.
इकडे रात्रीच्या दोन वाजता स्वराज मात्र संभवची शाळा घेतच होता.
"वहिनीला भेटायला गेला होतास ना शहाण्या?" स्वराजने पुढचा प्रश्न केला.
"गप रे, तिला कशाला भेटायला जाऊ मी? ती तर केव्हाच झोपलीये." संभवने थाप मारली.
'आता ह्याला थोडीच ना समजणार आहे की ओवी खरंच झोपलिये की जागी आहे ते.' मनातल्या मनात संभव बोलला.
तेवढयात त्याच्या मोबाइलची मेसेज टोन वाजली, स्क्रीनवर ओवीचे नाव स्पष्ट दिसले. स्वराजची नजर एकदम त्यावर खिळली.
घाईतच संभवने मोबाईल उचलून बाजूला ठेवला. पण तोपर्यंत स्वराजने ओवीचे नाव आणि त्यापुढे असलेले हार्ट्स पाहिले होते. आता संशयाला तर दुसरी जागाच नव्हती.
"काय रे...वहिनी तर केव्हाच झोपल्या होत्या ना? मग हा मेसेज कोणत्या वहिनाचा आहे?" खोचकपणे स्वराजने विचारले.
"बरं, मी झोपतो आता मला खूप झोप येतिये." म्हणत पुढे जास्त काही न बोलता संभवने तोंडावर ब्लँकेट ओढले.
'अच्छा! म्हणजे तू नाहीच सांगणार तर? पण तू जाऊन जाऊन कुठे जाणार आहेस? नव्याचे नऊ दिवस संपले की पुन्हा स्वतःच येशील माझ्याकडे. हे असे झाले नि ते तसे झाले, स्वराज प्लीज मला मदत कर, काय करू काहीच समजत नाहीये, हे असे बरेच प्रश्न घेऊन तू तेव्हाही माझ्याकडेच येशील.' स्वराज एकटाच बडबडत होता आणि संभव मात्र त्याला टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता.
"स्वराज थोडा एसीचा स्पीड वाढव ना प्लीज" संभव म्हणाला.
"हो का! येतंय रे, सगळं लक्षात येतंय. चालू दे तुझं, पण मी एसीचा स्पीड वाढवणार नाही आणि इतकंच गरम होतंय तर ब्लँकेट मधून बाहेर ये आणि हवा घे. आधीच तुझ्यामुळे दोन तीन वेळा झोपमोड झालिये माझी. आता जर पुन्हा मला त्रास दिला तर बघ." स्वराज म्हणाला.
"बरं बाबा, सॉरी...झोप आता तू आणि मलाही झोपू दे."
"हो झोप तू, पण त्याआधी वहिनीच्या मॅसेजला रिप्लाय दे." संभवची खेचत स्वराज बोलला आणि तोंड फिरवून तो झोपी गेला.
स्वराजची हालचाल बंद झाली हे पाहून संभवने तोंडावरील ब्लँकेट काढले आणि पहिला मोबाईल हातात घेतला.
"काय करू नवरोबा, काही केल्या मला झोपच येत नाहीये आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे होतंय. खूप वाईट आहेस यार तू."
ओवीचा मेसेज येवून आता पंधरा मिनिटं झाली होती पण अजूनही संभव तिच्या मेसेजला रिप्लाय देवू शकला नव्हता.
ओवीचा मेसेज येवून आता पंधरा मिनिटं झाली होती पण अजूनही संभव तिच्या मेसेजला रिप्लाय देवू शकला नव्हता.
अजून जास्त वेळ न घालवता लगेचच त्याने मग मेसेज टाईप केला.
"तुझ्या मनाची अवस्था माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण समजू शकतं ओवी? तुझी जी अवस्था आहे अगदी तशीच माझीही आहे. मी काय करू आता तूच सांग. अजून फक्त दोन दिवस गं, त्यानंतर मग सगळी बंधनं संपतील. मग फक्त तू आणि मी. बाकी कोणीच नाही."
"तुझ्या मनाची अवस्था माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण समजू शकतं ओवी? तुझी जी अवस्था आहे अगदी तशीच माझीही आहे. मी काय करू आता तूच सांग. अजून फक्त दोन दिवस गं, त्यानंतर मग सगळी बंधनं संपतील. मग फक्त तू आणि मी. बाकी कोणीच नाही."
बराच वेळ संभवने ओवीच्या रिप्लायची वाट पाहिली पण तिचा नो रिप्लाय.
"सॉरी ओवी. आय थिंक तू झोपली वाटतं. तुझ्या मेसेजला मीच थोडा उशिरा रिप्लाय दिला. पण अगं मी रूममध्ये आलो आणि नेमकं स्वराजच्या तावडीत सापडलो. तो जागाच होता. खूप सारे प्रश्न विचारून खूप वेळ छळलं गं त्याने मला. म्हणून मग तुला रिप्लाय नाही करता आला. सो सॉरी फॉर दॅट. गुड नाईट, लव्ह यू अँड मिस यू टू मच." समोर खूप सारे हार्ट आणि किसींग स्मायली टाकत संभवने मेसेज फॉरवर्ड केला.
आता ओवीच्या आठवणीत संभवला देखील काही केल्या झोपच लागेना. खिडकीतून आत डोकावणारी चंद्राची शीतल किरणे त्याला ओवीच्या सहवासाची जाणीव करून देत होती जणू. घडलेला प्रत्येक प्रसंग आठवून आपसूकच त्याच्या चेहऱ्यावर स्मित फुलत होते. अंगावर रोमांच उठत होते.
ओवीचे त्याला घट्ट बिलगणे, त्याच्या कपाळावर, गालावर अलगद तिचे ओठ टेकवणे हे सारे आठवून संभव स्वप्नांच्या दुनियेत पुरता हरवून गेला.
छातीशी पिलो कवटाळत तो दोघांमधील नात्यांची विण अधिकच घट्ट करणाऱ्या प्रत्येक प्रसंगाची मनातच आवृत्ती करू लागला.
ते सोनेरी क्षण पुन्हा पुन्हा आठवून तो एकटाच हसत होता. फायनली कधी त्याला डोळा लागला हे त्याचे त्यालाही समजले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा संभवचा मेसेज वाचून ओवीला हसूच आले. स्वराजने त्याला कसे छळले असेल याचा तिला अंदाज आला होता.
पुढे संभवने पाठवलेले हार्ट आणि किसींग स्मायली पाहून तर तिच्या चेहऱ्यावर आपसूकच मग स्मित फुलले. लाजेची छटा तिच्या चेहेऱ्यावर पसरली.
पुढे संभवने पाठवलेले हार्ट आणि किसींग स्मायली पाहून तर तिच्या चेहऱ्यावर आपसूकच मग स्मित फुलले. लाजेची छटा तिच्या चेहेऱ्यावर पसरली.
"काय मग मॅडम, झाली का झोप?" प्रणितीने विचारले.
"हो झाली की." हसतच ओवी उत्तरली.
"नक्की ना? मला तर वाटलं स्वप्नात येवून माझ्या ब्रोने तुझी झोपमोड केली की काय?"
"ताई, आता सकाळीच माझी खेचण्याचा मुड आहे का तुमचा?"
"बरं, मला एक सांग एकटीच का हसत होतीस आता?"
"असंच, काहीतरी आठवलं म्हणून हसले."
"तुला काय आठवलं असेल ते आलंय बरं का माझ्या लक्षात."
"ताई...तुम्ही पण ना. तुमच्याकडे पाहून वाटत नाही तुम्ही इतक्या खोडकर असाल. म्हणजे याआधी मला कधी जाणवलं नाही ते पण आता मात्र मी बऱ्यापैकी ओळखलं आ तुम्हाला."
"हो का, बरं ऐक ना...कोणाला सांगू नको आ हे आपल्यातील सिक्रेट. कारण प्रणिती म्हणजे एक हुशार आणि सिन्सिअर मुलगी म्हणून माझी ओळख आहे या घरात."
"अच्छा, असं आहे होय." हसतच ओवी बोलली.
"बरं ऐक, आता तुमची आंघोळ असणार आहे, मस्त एन्जॉय करा दोघेही."
"खरं सांगू का ताई...नवरा नवरीची आंघोळ, ते दोघे सोडून बाकी सगळे एन्जॉय करत असतात. मला तर खूपच टेन्शन आले आहे. माझं कसं होणार देवच जाणे. त्यापेक्षा मी माझी बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करून घेऊ का? मग काही टेन्शनच नाही. " ओवी म्हणाली.
"वा रे वा हुशार. असं काही करु नकोस आणि हो, सगळं छानच होणार गं, तू नको टेन्शन घेऊ. बाकी सगळ्यांसारखंच तूही मस्त एन्जॉय कर. समोर फक्त ब्रो आहे बाकी कोणीच नाही असा विचार कर. मग बघ सगळं सोप्पं होईल." प्रणिती म्हणाली.
"काय हो ताई, तुम्ही पण ना." लाजतच ओवी बोलली.
"बरं आवर तू, कितीही टेन्शन घेतले तरी आंघोळ काही चुकणार नाही. तिकडे मोठ्या आईने सगळी तयारी सुद्धा केली असेल. मी पाहून येते थांब." असे बोलून प्रणिती बाहेर गेली.
"अगं ओवी, ते बघ तिकडे खरंचच तुमच्या आंघोळीची सगळी तयारी झाली आहे बाई." खिडकीतून बाहेर डोकावत चिन्मयी बोलली.
"बाई, काय गं हे? असे कसे हे विधी, मला तर खूपच ऑक्युअर्ड फील होत आहे चिनू."
"काही नाही होत गं. ज्या प्रथा आहेत त्या तर पूर्ण कराव्याच लागतील ना आणि ही सगळी आता तुझीच माणसे आहेत त्यामुळे लोड कशाला घ्यायचा." समजुतीच्या स्वरात चिन्मयी म्हणाली.
"हो गं, ते तर आहेच."
"बरं ओवी, ही साडी नेसून रेडी हो. मोठ्या आईने सांगितले आहे." तेवढ्यात दरवाजातून आत येत प्रणिती बोलली.
"अहो ताई, पण माझ्याकडे आहेत ना भरपूर साड्या. त्यातलीच नेसते ना एखादी."
"अगं बाई, हीच नेस. ते कसलं कसलं पाणी टाकतात तुमच्या अंगावर त्यामुळे चांगली साडी नेसशील तर खराब होईल. म्हणून म्हणते हीच नेस."
"बरं द्या इकडे." म्हणत ओवीने प्रणितीच्या हातातून ती साडी घेतली.
थोड्याच वेळात मग बाहेर गार्डन मधील लॉनवर नवरा नवरीच्या शाही स्नानाची व्यवस्था केली होती. ओवी आणि संभव दोघेही आवरुन आले.
हसत खेळत खूप साऱ्या आठवणींची साठवण करत हा सोहळा देखील दिमाखात पार पडला. सगळेजण आनंदाने एन्जॉय करत होते. संभव आणि ओवीच्या चेहऱ्यावर प्रेमाबरोबरच लाजेची लाली देखील अगदी उठून दिसत होती. प्रेमाच्या त्या गुलाबी रंगात दोघेही अगदी न्हाऊन निघाले होते. सगळेजण दोघांचीही खूप खेचत होते. ते दोघेही हे सगळं मनापासून एन्जॉय करत होते.
आयुष्यातील या सुंदर अशा सोनेरी क्षणांची दोघांनीही हृदयाच्या कप्प्यात साठवण केली.
चार वर्षांपूर्वी अचानक एकमेकांच्या समोर आलेले हे दोघेजण आता मात्र सुंदर अशा रेशमी धाग्यात बांधले गेले होते. सर्वजण त्या दोघांसाठी खूपच खुश होते.
इकडे नंदा ताई आणि दीपा काकीने मिळून सर्वांसाठी नाश्ता रेडी केला होता. सर्वजण आवरुन नाश्त्यासाठी एकत्र जमले होते. ओवी अजून तिच्या खोलीतून बाहेर आली नव्हती. संभवचे लक्ष तिकडेच होते.
तेवढ्यात ओवी तिचे आवरुन आली. ओल्या केसांत ओवीचे रुप अधिकच खुलले होते. त्यामुळे राहून राहून संभवची नजर तिच्यावर खिळत होती. पण सगळे समोर असताना तो मनसोक्त ओवीकडे पाहू शकत नव्हता. हे प्रणितीच्या लक्षात आले.
"अरे ब्रो.. किती लाजतोस रे. तुझीच बायको आहे आता ती बिनधास्त बघ तिच्याकडे. कोणी काहीच बोलणार नाही तुला." गमतीच्या हसतच सुरात प्रणिती बोलली.
प्रणितीच्या बोलण्यावर मग एकच हशा पिकला. संभव आणि ओवीने मग लाजून नजर खाली झुकवली.
"आवरा रे पटकन् निदान खाताना तरी बडबड गोंधळ नका करू." दीपा काकी म्हणाली.
"संभव आणि ओवी.. हे पहा बाळांनो, तुमच्या आयुष्याचा नवीन प्रवास आता सुरु झालाय. आमचे आशीर्वाद तर कायम तुमच्या सोबत आहेतच पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रेमात पडणं, पुढे जाऊन आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीशी आपलं लग्न होणं हे जरी सोप्पं असलं तरी आयुष्यभर एकमेकांना समजून घेत, वेळ प्रसंगी एकमेकांच्या चुका पोटात घालत आपल्या जोडीदाराची साथ प्रामाणिकपणे निभावणं वाटतं तितकं सोप्पं नाही बरं का. पण तुमच्या दोघांसाठी ते कठीण देखील नाही याची मला खात्री आहे.
नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर देखील ज्यांच्या नात्यातील ओढ टिकून राहते, ज्याच्या संसारातील आनंद दिवसागणिक वाढत जातो तो कोणत्याही परिस्थितीत सुखी राहतो. असे हे जीवनाचे मर्म ज्याला समजले त्याचा संसार सुखाचा झालाच म्हणून समजा. काळजी करू नका जास्त लेक्चर नाही देणार आज." हसतच नंदा ताई म्हणाल्या.
नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर देखील ज्यांच्या नात्यातील ओढ टिकून राहते, ज्याच्या संसारातील आनंद दिवसागणिक वाढत जातो तो कोणत्याही परिस्थितीत सुखी राहतो. असे हे जीवनाचे मर्म ज्याला समजले त्याचा संसार सुखाचा झालाच म्हणून समजा. काळजी करू नका जास्त लेक्चर नाही देणार आज." हसतच नंदा ताई म्हणाल्या.
सगळ्यांनाच मग खूप हसू आले. कारण सवयीप्रमाणे नंदा ताईंचे ऑलरेडी बरेच लेक्चर देऊन झाले होते. हो, पण ते संभव आणि ओवी यांच्या भल्यासाठीच होते बरं का. नंदा ताईंनी कितीही बडबड केली तरी ती व्यर्थ कधीच नसते. हे सर्वांनाच ठाऊक होते.
पुढच्या दोन दिवसांत जागरण गोंधळ, देवदेव सारे आटोपले. ओवी आणि कार्तिकी दोघीही मग माहेरी गेल्या. नंदा ताईंच्या सांगण्यावरून दोनच दिवसांत ओवी पुन्हा सासरी आली. कार्तिकी मात्र डिलिव्हरीसाठी तिकडेच थांबली.
दुसऱ्या दिवशी समरने संभव आणि ओवीला बोलावून, 'हे माझ्याकडून आणि कार्तिकीकडून तुम्हा दोघांसाठी गिफ्ट' म्हणत त्यांच्या हातात एक पाकीट ठेवले. हनिमून पॅकेज होते त्यात. समरने पॅरिसची दोन तिकिटे बुक केली होती ओवी आणि संभवसाठी.
"अरे दादू हे कशासाठी? तेही डायरेक्ट आऊट ऑफ कंट्री आणि तेही आठ दिवस! अरे ओवी आधीच नाही म्हणाली होती त्यामुळे मी कोणताच प्लॅन केला नाही."
"ते माहीत होतं आम्हाला, म्हणूनच हे सरप्राइज."
"अहो पण भाऊजी, दीची डिलिव्हरी आलीये जवळ. अशात आमचे बाहेर जाणे योग्य नाही." ओवी म्हणाली.
"ओवी, अगं किती विचार करतेस तू. आम्ही सगळे आहोत ना इकडे आणि यासाठीच तुला लवकर बोलावून घेतले मी. इथली काळजी करू नका तुम्ही. तुमच्या आयुष्यातील सोनेरी क्षण आहेत हे. ते असे गमावू नका. एकदा का संसार सुरू झाला की मग एकमेकांसाठी म्हणावा तसा वेळ नाही मिळणार. आज दिवसभरात तुमच्या बॅगा पॅक करा. काही खरेदी करायची असेल तर जाऊन या बाहेर, कारण आज रात्रीची फ्लाईट आहे." नंदा ताई म्हणाल्या.
'दिच्या या अवस्थेत खरंतर मला तिच्या सोबत राहायचं आहे. पण आता हे तिकिट नाही घेतले तर हे लोक काय विचार करतील?'
ओवीची द्विधा मनस्थिती झाली होती. संभव मात्र मनातून खूपच खुश होता.
ओवीची द्विधा मनस्थिती झाली होती. संभव मात्र मनातून खूपच खुश होता.
क्रमशः
काय असेल आता ओवीचा निर्णय? जाणून घेऊयात पुढील भागात.
©®कविता वायकर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा