अधुरी प्रेम कहाणी भाग१
दीर्घकथा लेखन स्पर्धा
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
डिसेंबर २०२५ - जानेवारी २०२६
विषय:- ऐतिहासिक कथा
©® सौ. हेमा पाटील.
"कोण समजतो हा राजा स्वतःला? याच्या पायाशी सगळ्या जगाने लोळण घ्यावी इतकी महत्वाकांक्षा बाळगणे योग्य आहे का तात?" राजकन्या रूद्रान्वी संतापाने महाराज सुधिन्वा यांना म्हणाली.
"त्याने प्रतिज्ञा केली आहे, जो राजा अनीतीने वागेल त्याच्यावर चढाई करून त्याचे राज्य आपल्या ताब्यात घ्यायचे." महाराज सुधिन्वा म्हणाले.
"याचा न्याय करण्याचा अधिकार त्याला कुणी दिला? संपूर्ण जगावर त्याची सत्ता स्थापन करायची आहे का त्याला? त्यासाठी हे कारण पुढे करत आहे तो. अत्यंत लालसी राजा आहे तो."
"असे नाही रूद्रान्वी राजे. तो राजा स्वतः नीतीने राज्य करतो. रोज रात्री तो आपल्या राज्यात वेष पालटून फिरतो. प्रजा राजा बद्दल, कारभाऱ्यांबद्दल काय बोलते ते ऐकून तो त्याची शहानिशा करतो व जो अन्याय करत आहे असे त्याला आढळते, त्या अधिकाऱ्यास तो मृत्यूदंड देतो. त्यामुळे त्याच्या राज्यात त्याचा एखादा शिपाई सुध्दा हातून क्षुल्लक चूक होऊ देत नाही. त्याचे सगळीकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष असते. प्रजेवर थोडा जरी जुलूम झाल्याचे त्याच्या कानावर पडले तरी तो आकाशपाताळ एक करतो.
असा हा शूर व न्यायी राजा इतरत्र कुठेही असा जुलूम घडताना दिसताच त्या राज्यावर आक्रमण करतो. आजपर्यंत अनेक राज्ये त्याने युध्दात जिंकून घेतली आहेत व त्या राज्यांमध्ये आपल्या पध्दतीने राज्यकारभार सुरू केला आहे." प्रधानजी असे म्हणताच राजकन्या रूद्रान्वीच्या नयनात अंगार फुलला.
"प्रधानजी, तुम्ही शत्रूचे कौतुक करताय? हे शोभत नाही तुम्हाला. आत्ता तो आपला शत्रू आहे. त्याने आपल्या राज्यावर आक्रमण केले आहे. ही सुशीला नगरी आज त्याच्यामुळे संकटात सापडली आहे."
"रूद्रान्वी राजे, क्षमा असावी. मी आपणांस सत्य कथन केले. आपल्या शत्रूचे कौतुक करणे हा माझा हेतू नव्हता. आपल्या राज्यावर एका बलशाली राजाने आक्रमण केले आहे, त्याला तोंड देण्यासाठी तितकीच प्रभावशाली व्यूहरचना आखली पाहिजे यादृष्टीने विचारविनिमय करूयात." प्रधानांचे हे उत्तर ऐकून राजकन्या रूद्रान्वीचा क्षोभ थोडा थंडावला.
राजा सुधिन्वा, सेनापती, प्रधान आणि राजकन्या रूद्रान्वी शत्रूशी लढताना व्यूहरचना कशी असावी याच्या चर्चेत गढून गेले.

सुशीलानगरीचे महाराज सुधिन्वा आपल्या शयनकक्षात या घडीला चिंताक्रांत अवस्थेत बसले होते. त्याला तसेच कारण होते. राज्यावर शत्रूने आक्रमण केल्यावर कुणीही चिंताक्रांत होणारच. त्यात शत्रू बलाढ्य व ताकदवान असेल तर अधिकच कठीण!
राजकन्या रूद्रान्वीने संताप व्यक्त केला, त्यावेळी महाराज सुधिन्वा गप्प बसले होते. प्रधानांनी ज्या गोष्टीचे सुतोवाच केले होते त्यामुळे महाराजांनी चुप्पी धारण केली होती. आपल्याकडून प्रजेवर अन्याय झाला आहे हे त्यांनी स्वतःच्या मनाशी कबूल केले. यामुळेच मगाशी राजकन्येच्या संतापलेल्या अवस्थेतील विधानाला उत्तर देणे त्यांनी टाळले होते. आपल्या हातून चूक घडली आहे, त्याची शिक्षा आपल्याला मिळणार याची रूखरूख त्यांना लागली होती. 'या न्यायप्रिय राजाने स्वतःच्या बाबतीत न्याय करताना स्वतःला कधी झुकते माप दिले नाही, तो आपल्यावर काय दया दाखवणार?' असा विचार मनात येऊन त्यांच्या मनात भीती उत्पन्न झाली होती.

त्यांच्या चिंताक्रांत चेहऱ्याकडे पाहून राणी रूपमतीने विचारले,
"महाराज, युध्द करण्याची ही आपली पहिली वेळ नव्हे. आजपर्यंत अनेकदा आपण शत्रूला नामोहरम केले आहे. त्यावेळी कधीही आपल्या मुखकमलावर चिंता दिसली नाही, मग आजच का? आपण शूर आहात यात आम्हाला अजिबात संदेह नाही. आपली कन्याही युध्दकलेत आपल्याप्रमाणेच पारंगत आहे. असे असताना ही चिंता का?"

"राणीसाहेब, आपण म्हणता ते सत्य आहे. आजवर कधीही शत्रुची भीती वाटली नाही, आजही युध्दाची भीती वाटत नाही आम्हाला. आज मात्र नीती अनीतीचा खेळ आहे, इथे नीतीची सरशी होणार असे वाटतेय म्हणून चिंता वाटतेय. राज्यकारभार करताना जाणते-अजाणतेपणी हातून प्रजेवर अन्याय झाला आहे हे आम्हाला मान्य आहे. हा राजा स्वतः काटेकोरपणे नीतीयुक्त राज्यकारभाराची अंमलबजावणी करतो. त्याच्यापाशी चुकीला क्षमा नाही."
"असे कसे? आपण मनाशी अशी हार मानणे योग्य नव्हे महाराज. मनच खचले तर युध्द जिंकायचे कसे? आपण युध्दात जिंकायचेच असा मनाशी निग्रह करावा. हातून घडलेल्या चुकांचे परिमार्जन युध्द संपल्यानंतर करावे." राणीचे हे बोलणे ऐकून राजा सुधिन्वाच्या मनात आशा पालवली. आपण या सुशीलानगरीचे अधिकारी आहोत. हे राज्य शत्रूच्या ताब्यात जाऊ नये यासाठी जीवाच्या आकांताने लढणे हे आपले आद्य कर्तव्य आहे हे त्यांनी स्वतःला बजावले. या विचारातच ते झोपण्यासाठी मंचकावर पहुडले.
कोण होता तो नीतीवान, बलाढ्य राजा? ज्याची इतकी धास्ती सुशीला नरेश सुधिन्वा महाराजांनी घेतली होती? हे वाचूया पुढील भागात...

क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
नमस्कार वाचकहो, कथामालिकेचा पहिला भाग आज पोस्ट केला आहे. आवडल्यास नक्की अभिप्राय नोंदवा ही विनंती.
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."