वृद्धाश्रमात सुखरूप पोहोचल्याचे आजीचे नातवाला पत्र (दत्तक)
प्रिय नंदन,
मी वृद्धाश्रमात सुखरूप पोहोचले आहे. खरे तर फोन करून मी आधीच तुला कळवले आहे पण मला आमच्या काळातील ह्या पत्राचा वापर तुला सांगण्यासाठी करायचा होता.
मी वृद्धाश्रमात सुखरूप पोहोचले आहे. खरे तर फोन करून मी आधीच तुला कळवले आहे पण मला आमच्या काळातील ह्या पत्राचा वापर तुला सांगण्यासाठी करायचा होता.
तुला भेटून खूप छान वाटले. असे वाटलेच नाही की तू माझा नातू नाहीस. बाळ दत्तक घेतात असे म्हणतात पण तू तर मला आजी म्हणून काही दिवसांसाठी दत्तकच घेतलेस रे.
काही दिवस तुझ्या घरी नेलेस आणि मला आवडतात ती पुस्तके विकत आणून दिलीस. तेव्हा तुला काय सांगू मला किती आनंद झाला.
माझी मुले माझी अडगळ होते म्हणून इथे सोडून गेले. तेव्हा खूप दुःख झाले होते रे, पण तू मला तुझ्या घरी नेवून ते दुःख विसरण्यासाठी काही दिवसांसाठी का होईना नकळतपणेच त्यासाठी प्रयत्न केलेस.
असे म्हणतात की आजची पिढी खूप स्वार्थी आणि उद्घट आहे पण तुझ्यात हे दोन्ही अवगुण मला पाहायला मिळाले नाहीत.
तू पुन्हा भेटायला येणार आहेस आणि मला खात्री आहे की, तू नक्की येशील. मी तुझी वाट पाहत राहीन. तू स्वत:ची काळजी घे आणि वेळेवर जेवण कर.
देव करो तुझ्या आयुष्यातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत.तसेच माझ्याकडून तुला खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद.
तुझीच,
लाडकी आजी.
लाडकी आजी.
© विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा