Login

जीवघेणी अदृश्य : नजरकैद

एक माफिया आणि एका मुलीची कथा.
रात्रीच्या भयानक काळोखात जिथे सगळे जीव कंटाळून, दमून झोपून गेलेले होते. त्याचवेळी तो अंडरवर्ल्डचा डॉन चंद्राला सुद्धा आपल्यासाठी कामाला लाऊन आपल्या पापात सहभागी करत होता. तसं तर चंद्राचं काम अख्ख्या जगाला रात्रीच्या वेळी प्रकाश देण्यासाठी असतं. पण आज तोसुद्धा फक्त आणि फक्त त्या माफियासाठी चंदेरी प्रकाश समुद्रावरच पाडत होता. फक्त या कारणासाठी की त्याला काही अडचण होऊ नये आणि त्याने केलेली स्मगलिंग तिच्या योग्य ठिकाणी पोहचावी.

मोठी शिप जी सगळ्या सुखसुविधानी संपन्न होती. दिसायला एकदम लक्झरीयस आणि क्लासी समुद्रावर सॉफ्ट स्पीडवर धावत होती.

त्याचं शिपच्या लास्ट फ्लोअर तोच डॉन हातात व्हिस्कीचा घोट पित समुद्राला आपल्या नजरेत भरत होता. त्याला त्या समुद्राचा हेवा वाटत होता कारण सध्या तोच एक होता जो त्याच्या कंट्रोल मध्ये नव्हता. समुद्राने ठरवलं तर एका क्षणात त्याचा रुबाब आणि अभिमान फक्त एका छोट्याश्या हेलकाव्याने पाण्यात मिसळू शकतो. ऊन, वारा,पाऊस, नैसर्गिक आपत्ती, आणि समुद्र सोडून सगळंच त्याच्या कंट्रोल मध्ये होतं.

तरीसुद्धा तो आजूनही अतृप्तच होता. कदाचित या पाच गोष्टींना सुद्धा आपल्या कंट्रोल मध्ये ठेवायचा विचार करत असेल. नाहीतर दुसरं काहितरी कारण असेल.

वाऱ्यामुळे त्याचे थोडे वाढलेले केस कपाळावर आणि हवेत उडत होते. त्याचा गोरा रंग चंद्राच्या प्रकाशामुळे अजूनच उजळून निघालेला. हातात diamond च वॉच होतं आणि black कलरचा डेनिमचा shirt आणि स्काय ब्लू कलारची अरमानी पँट. इन केला नव्ह्ता पण बह्या फोल्ड केल्यामुळे त्याच्या हाताचे मसलस् व्यवस्थित शो ऑफ होत होते. त्यात तो खूपच attractive दिसत होता. हातातला ग्लास तसाच खालच्या दिशेने सोडुन दिला. आणि समोरच्या ग्रिलला दोन्ही हातात पकडुन कमरेतून खाली वाकला.

खालच्या फ्लोरवर उभा असलेल्या गार्डने तो ग्लास व्यवस्थित कॅच केला होता. गार्ड वरच्या दिशेने लक्ष ठेऊन होता असं काहीही नव्हतं त्याचं लक्ष खालीच होतं. पण जेव्हा ग्लास हवेतच खाली पडत होता त्याच्या आवाजाच्या बेसिस वर त्याने ग्लास कॅच केला. त्याचे सर्वच गार्ड्स शार्प माईंडेड आणि वेल ट्रेंनड होते.

पण त्याला अशी टेस्ट घ्यायला नेहमीच आवडायचं.
""हि लाईक टू मेक पझल्स नॉट टु सॉव्ह देम""


तेव्हढ्यात त्याच्या पाठीवरून नाजूक हातांचा स्पर्श झाला. त्या हातांनी त्याच्या छातिभोवती घट्ट विळखा घातला.

तसं त्याने हात पकडत त्या व्यक्तिला आपल्या समोर आणलं.

सध्यातरी त्याच्या डोळ्यांसमोर सगळ्यात सुंदर दृष्य होतं. इराणमधली सगळ्यात फेमस ॲक्टरेस असलेली जास्मिन हैदरी...जिच्यासाठी तिथलीच नाही तर जगातली ऑडियांस वेडी होती. तिचे ग्रे कलरचे डोळे, परफेक्ट बॉडी फिगर विथ स्मुथ टेक्श्चर स्किन,आणि सगळ्यात महत्वाचे तिचे लिटेल बीट गोल्डन कलरचे केस. याच विशेषतेमुळे ती मिस युनिवर्स सुद्धा झाली होती. पण यासगळ्यात जगातली तिच्यासारखी क्लॉसी मुलगी त्याच्यासमोर लोटांगण घालत नाही आली तर आश्चर्य!!!


हेय हॅण्डसम... किती उशीर बाहेर होतास तू ? आय मिस यू सो मच!! ती त्याला मिठी मारत म्हणाली.

नाथिंग लिटल बीट काम होतं... बट नाऊ आय एम फ्री फॉर लाँग टाईम... तो तिला बाजूला करत किस करत म्हणाला.

सकाळी त्याला उशिराच जाग आली. बाजूला अफरीन आजूनही झोपेत होती. तिचा अंगावरचा हात बाजूला करून फ्रेश होऊन आला.

आजचा दिवस त्याच्यासाठी महत्वाचा होता. कारण त्याच्या शीपची चेकिंग आणि महत्वाची डील इथेच व्रॅक करायची होती. त्यासाठी त्याचं प्रेझेंटेबल असणं गरजेचं होतं. त्यासाठी तो व्यवस्थीत प्रिपेर झालेला होता.


शिप पोर्टवर लाँच झाली. तिथे सिक्युरिटी साठी आणि चेकिंग साठी वेगवेगळे अधिकारी उपस्थित होते. त्या सर्वांनी शीपला वेगवेगळ्या मेथड्सनी डीकोड केलं आणि ग्रीन सिग्नल देऊन शिपला आपल्या मार्गावर जायला वाट मोकळी केली. यासाठी जवळपास सहा तास गेले. कारण ती शिप खूपच मोठी आणि विशाल होती.


एव्हढ्या टाईट चेकिंगमध्ये सुद्धा कोणीही त्या शिपमधले असंख्य हिरे डीटेक्ट करू शकले नाहीत. हीच खूप मोठी गोष्ट होती. अशी कुठली जागा नव्हती जिथे चेकिंग झालेलं नव्हतं. पण तरीही कोणाच्या हाती ते हिरे लागले नाहीत.

"जिथं एखाद्या व्यक्तीची विचारशक्ती खुंटते तिथूनच त्याची विचारशक्ती चालू होते " याच तत्त्वावर जगत होता तो. कारण...

चेकिंग ही क्रुझची झाली. समुद्राशी एक्सपोज असलेल्या बेसची नाही. क्रुझचा बेस जो पाण्याशी एकस्पोजर करतो तिथेच डायमंड अश्या पद्धतीने स्टीच केलेले जेणेकरून ते बघुन सुद्धा कुणाला ओळखणार नाहीत. असं नव्हतं डिटेक्टर चा वापर केला नव्हता वापर करुन सुद्धा त्याचा उपयोग नव्हता. कारण ते डिटेक्टर क्रुझ च्या आसपास जाताच अश्या पद्धतीने पॉज व्हायचं की कोणालाही असच वाटेल की ही क्रुझ विदाऊट इलिगल गुड्स प्रवास करतेय. पण सत्य तर वेगळंच होतं काहीतरी...आणि असेही...

द विक्रमादित्य चक्रवर्ती याच्या विश्वात काहीही अवघड नव्हतं.

आज रात्री शिप भारतात लाँच होणार होती. आणि त्याचं मिशन सक्सेसफुल होणार होतं. इथून पुढे तो त्याचा न्यु प्रोजेक्ट लाऊंच करणार होता. डायमंड ज्वेलरीचा जो जगभरात प्रसिद्ध असेल.

तो भारतात ह्या प्रोजेक्टची सुरुवात करणार होता कारण इथे त्याला बराच फायदा भेटणार होता.

""""'''"""""""""""""""""""""""""""""

जम्मू काश्मीर :

सगळीकडे थंड वातावरण होतं. डोंगराळ प्रदेशात हिरवेगार झाडे, नदी आणि आपला मऊ कापूस पसरवणारा बर्फ हवेतून जमिनीवर पडत होता. असं वाटतं होतं जमिनीला झाकून घेण्यासाठी मऊ आणि रेशमी शाल अंथरली आहे. जसं महाराष्ट्र पावसाळ्यात हिरवा शालू परिधान करतो तसचं जम्मू काश्मीर पांढरी मऊ शाल वसंत ऋतूमध्ये परिधान करत असतो. यामुळेच या भागाचे सौंदर्य अजुनच खुलुन दिसते.

त्याच वेळी एक मुलगी एका दगडावर शांत बसली होती. त्या थंड वातावरणात सुद्धा तिच्या मनात एक अदृश्य बदल्याची आग जळत होती.

तिचे डोळे त्या वाहणाऱ्या थंड पाण्याकडे स्थिरावले होते. पण क्षनोक्षणी तिच्या डोळ्यांतली आग अजुनच वाढत होती.

तिचे ते घारे डोळे खूपच आकर्षक दिसत होते. पेहराव पहाडी लोकांसारखा होता. केस मध्यम कुरळे आणि भोरे दिसत होते. खुप जास्त सुंदर दिसत होती ती पण चेहऱ्यावर एक निराशा होती.

रूबी ओ रूबी तुम्हे कितने देर से धुंढ रहा था! कहा कहा धुडा तुम्हे और तुम यहाँ अकेली? .... जवळपास तेवीस पंचवीस वर्षांचा मुळगा तिच्याजवळ जात धापा टाकत म्हणाला.

अकेले रहणे का मन हुआ इसलिये आई थी यहा!... रूबी

क्या हुआ? जब से वो लोग आके गये है कूछ अजीब सी लग रही हो?... तो तिच्याजवळ बसत म्हणाला.

कूछ बाते और कूछ भावनाए चाहकर भी शब्दो में बया नाही की जा सकती!... ती एवढं बोलुन तिथून उठून गेली.

त्याला तिचं हे वाक्य कॉम्पलीकेटेड वाटलं. ती जाताना बघुन तो पुन्हा तिच्या मागे गेला.

क्रमशः