अदृश्य उपस्थिती... भाग - १
रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते. पुण्याच्या कात्रज घाटावरून खाली उतरून येताना शहराच्या दिव्यांचा झगमगाट लांबवर दिसत होता. पण त्या दिव्यांच्या मागे एक अंधार दडला होता आणि त्याच अंधारात आता अडकली होती १७ वर्षांची सान्वी देशपांडे.
संपूर्ण दिवस कॉलेजचे सांस्कृतिक कार्यक्रम, मित्रमैत्रिणी, नाच-गाणी यात गेल्यामुळे ती दमली होती. ती आपल्या स्कूटीवरून घरी परतत होती. तिचा रस्ता नेहमीच शांत, झाडांनी आच्छादलेला, फारसा वर्दळ नसलेला.
पण आज काहीतरी वेगळं जाणवत होतं.
वारा अधिक थंड होता. झाडांच्या पानांचा आवाजही काहीसा अनोळखी वाटत होता आणि सर्वात महत्त्वाचं तिच्या मागे एकच पांढऱ्या रंगाची कार पुन्हा पुन्हा दिसत होती. कधी दूर, कधी जवळ. पण ती कार तिच्या लक्षातून निघत नव्हती.
"कुणी तरी माझ्यामागे येतंय का…?" तिच्या मनात विचार चमकला.
ती स्कूटीचा स्पीड वाढवत होती, पण कारही तितक्याच गतीने वाढत होती. रस्त्यावर दुसरं कुणी नव्हतं. एक विचित्र शांतता, आणि फक्त कारचा मंद प्रकाश. तिला भीती वाढू लागली.
ती पटकन विचार करू लागली, "घरी पोहचले की बाबांना सांगेल. आत्ता फक्त रस्ता संपला की झालं… पण हा रस्ता इतका लांब का वाटतोय आज.
थोड्या वेळात ती एका चौकात आली. इथे दिवसा गर्दी असली तरी रात्री मात्र ओसाड. सिग्नल बंद, दुकाने बंद.
तिने मागे पाहिले.कार गायब झाली होती.
तिने मागे पाहिले.कार गायब झाली होती.
क्षणभर सुटकेचा श्वास तिने टाकला. पण लगेच तिचं लक्ष गेलं, उजव्या बाजूच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून कुणीतरी सावकाश उतरत होतं.
एक काळी हुडी घातलेला, चेहरा न दिसणारा मनुष्य.
सान्वी थिजली. तो थेट रस्त्याकडे येत होता… अगदी तिच्याकडे पाहत.
सान्वी थिजली. तो थेट रस्त्याकडे येत होता… अगदी तिच्याकडे पाहत.
तीने घाईघाईने स्कूटी सुरू केली आणि परत जोरात निघाली. तिचं हृदय धडधडत होतं.
"मी चुकीची कल्पना करतेय… कदाचित तो फक्त कामगार असेल?" पण मन तिला वेगळंच सांगत होतं.
शेवटी ती आपल्या सोसायटीत पोहोचली. सुरक्षा रक्षक तिथे झोपला होता. तिने त्याला हाक मारली, पण तो हलकेच अंग बदलून पुन्हा झोपला. लिफ्टकडे जाताना तिच्या हातातून हेल्मेट खाली पडलं. तिने ते उचलण्यासाठी खाली वाकली, आणि त्याच वेळी,
लिफ्टचे दरवाजे आपोआप उघडले.
लिफ्टचे दरवाजे आपोआप उघडले.
कोणीच नव्हतं. लिफ्ट रिकामी होती.
पण ती रिकामी असूनही…आतमध्ये उजेड हलका लुकलुकत होता. जणू तिथे कुणीतरी आत्ताच उभं होतं.
सान्वीच्या अंगावर काटा आला.
सान्वीच्या अंगावर काटा आला.
दरवाजा उघडून ती आत गेली. आई-बाबा कात्रजच्या कार्यक्रमातून परतण्यास अजून वेळ होता. ती एकटीच होती.
तीने दार लावले. स्कूटीची किल्ली टेबलवर ठेवली, बॅग सोफ्यावर ठेवली, आणि ती पाण्याचा ग्लास आणण्यासाठी किचनमध्ये गेली. तेव्हाच, धाड!
हॉलमध्ये कुठेतरी काही तरी पडल्यासारखा आवाज आला. सान्वी थिजली. ग्लास तिच्या हातातून सुटता सुटता थांबला.
ती सावकाश बाहेर आली. तिने दिवा लावला.
हॉलमध्ये सर्व काही व्यवस्थित होतं.
हॉलमध्ये सर्व काही व्यवस्थित होतं.
"मीच थकलेय बहुतेक…" ती स्वतःलाच म्हणाली.
तीने फोन काढला, तिच्या स्टेटसवर मित्रमैत्रिणींनी भरपूर मेसेज टाकले होते. त्यात अचानक तिला एक नवीन नंबर दिसला.
"घरी पोहोचलात?" नंबर सेव्ह नव्हता.
सान्वी दचकली. कुणी अनोळखी व्यक्तीला तिच्या घरी परतण्याची वेळ कशी माहिती?
तिने लगेच हे कोण आहे? असा रिप्लाय केला.
पण पुढचा मेसेज अधिक भीतीदायक होता,
"तुझ्या मागे बघ."
"तुझ्या मागे बघ."
सान्वीच्या हातातून फोन पडता पडता थांबला.
तिने ताबडतोब मागे वळून पाहिले, कोणीच नव्हतं.
तिने ताबडतोब मागे वळून पाहिले, कोणीच नव्हतं.
तिच्या अंगावर काटा आणखी उभा राहिला. तिने लगेच दरवाज्याकडे धाव घेतली. दार लॉक होतं. पण तीने दुहेरी कडी लावली.
पण मेसेज करणारा कोण ? आणि त्याला माहिती कशी?
तिने पोलिसांना कॉल करण्याचा विचार केला, पण त्या क्षणी समोरच्या बाल्कनीच्या दरवाज्याची कडी हलायला लागली. खर्र… खर्र…
जणू कुणी बाहेरून दार उघडायचा प्रयत्न करत होतं.
सान्वीचे श्वास जलद झाले. ती टीव्हीच्या मागे लपली.
“देवा, कोण आहे हे!”
सान्वीचे श्वास जलद झाले. ती टीव्हीच्या मागे लपली.
“देवा, कोण आहे हे!”
कडी थोडी उघडली. आत येणारा वारा थंडगार होता.
ती टीव्हीच्या मागे बसलेली. खोलीमध्ये शांतता.
अचानक, टीक…
कोणीतरी घरात पाऊल टाकल्याचा आवाज आला.
अचानक, टीक…
कोणीतरी घरात पाऊल टाकल्याचा आवाज आला.
सान्वीचा श्वास अडकला. तिला कोणत्याही हालचालीचा आवाज येत नव्हता, पण वातावरणात एक जाणवणारी उपस्थिती होती. जणू कुणीतरी तिला पाहत होतं.
ती फोन उचलणार इतक्यात, खोलीतून मंद आवाज आला, "तुला खरंच वाटतं, तू एकटी आहेस…?"
सान्वीला तो आवाज अगदी जवळून आला होता,
पण कोणीच दिसत नव्हतं. ती घाबरून हॉलच्या बाहेर धावली.
पण कोणीच दिसत नव्हतं. ती घाबरून हॉलच्या बाहेर धावली.
बाहेर पळताना तिच्या पायाला काही तरी लागलं. तिने खाली पाहिलं. जमिनीवर एक पांढरा कागदाचा तुकडा होता. त्यावर जाड अक्षरांत लिहिलं होतं,
"मला तु नकोय, तुझं सत्य हवं आहे."
तिला कळेना – कोणतं सत्य? तिचं तर आयुष्यही साधं.
तिला कळेना – कोणतं सत्य? तिचं तर आयुष्यही साधं.
तीने पुन्हा कागद उचलला, मागच्या बाजूला आणखी एक ओळ होती, "तुझ्या वडिलांच्या स्टडी रूममध्ये बघ."
ती भीतीने थरथरत बाबांच्या खोलीत गेली. ट्यूबलाईट लुकलुकत होता. टेबलवर जुन्या फाईली होत्या.
लपवण्यासारखं काहीच नसावं असं तिला वाटलं.
लपवण्यासारखं काहीच नसावं असं तिला वाटलं.
पण मग तिला एक लहान लाल रंगाची फाईल दिसली.
ती नेहमी टेबलाच्या ड्रॉवरमध्ये बंद असायची. आज मात्र ड्रॉवर उघडा होता आणि फाईल बाहेर काढलेली होती.
ती नेहमी टेबलाच्या ड्रॉवरमध्ये बंद असायची. आज मात्र ड्रॉवर उघडा होता आणि फाईल बाहेर काढलेली होती.
सान्वीने फाईल उघडली. त्यात काही फोटो, काही कागदपत्रे आणि काही नोट्स होत्या. फोटोमध्ये एक माणूस दिसत होता, काळी हुडी घातलेला. हा तर आज रस्त्यावर दिसलेला तोच…! सान्वीचे डोळे मोठे झाले.
कागदावर लिहिलं होतं, "Case No. 47 – Missing Person: Kabir Shah"
फाईलमध्ये बाबांचा सिग्नेचर होता. तिचे बाबा, एक फॉरेन्सिक सायकोलॉजिस्ट, पूर्वी एका केसमध्ये काम करत होते.
त्या केसमधील कबीर शाह अचानक गायब झाला होता.
बाबांनी त्याला शेवटचे भेटले होते असे रिपोर्टमध्ये लिहिले होते.
बाबांनी त्याला शेवटचे भेटले होते असे रिपोर्टमध्ये लिहिले होते.
सान्वीच्या मनात प्रश्नांचे वादळ उठले, कबीर शाह गायब झाल्यानंतर आज हा कुठे भेटतोय? आणि माझ्यामागे का लागलाय?
तेवढ्यात फोन पुन्हा वाजला. Unknown Number: “छान तुला फाईल सापडली.” सान्वी ओरडून फोन फेकणार होती तेवढ्यात…
संपूर्ण घराची वीज गेली. हॉल अंधारात बुडाला.
फक्त तिच्या फोनचा हलका प्रकाश.
दरवाज्याकडे पाहताच तिचं हृदय धडधडलं,
दाराबाहेर दोन सावल्या दिसत होत्या.
फक्त तिच्या फोनचा हलका प्रकाश.
दरवाज्याकडे पाहताच तिचं हृदय धडधडलं,
दाराबाहेर दोन सावल्या दिसत होत्या.
एक उंच. एक थोडी आखूड.
जणू कुणीतरी दाराच्या अगदी जवळ उभं.
सान्वी थरथरू लागली, "कुणीही असलात तरी… निघा इथून!" ती ओरडली. पण प्रतिसाद आला नाही.
जणू कुणीतरी दाराच्या अगदी जवळ उभं.
सान्वी थरथरू लागली, "कुणीही असलात तरी… निघा इथून!" ती ओरडली. पण प्रतिसाद आला नाही.
दरवाज्यावर एकच हलकी टकटक झाली.
टक…टक…टक…
टक…टक…टक…
जणू कुणी संयमाने, हळूहळू धीर धरून दार ठोठावलं.
अचानक बाहेरून एका ओळखीच्या आवाजाने हाक मारली, "सान्वी! दार उघड! आम्ही आलोय!"
ते आई-बाबा होते. तीने लगेच दार उघडले. पण दाराबाहेर ते दोघेच उभे होते. ना कोणत्या सावल्या, ना कुणी अनोळखी.
"तुझा एवढा श्वास का फुललाय? ठीक आहेस ना?" बाबांनी विचारलं.
सान्वीच्या डोळ्यांतून पाणी आले. तिने सर्व काही सांगून टाकलं, कार, माणूस, मेसेज, आवाज, फाईल.
बाबांचे चेहरा गंभीर झाला. "सान्वी… ती फाईल मीच काढली होती आणि आज सकाळी इथेच ठेवली."
सान्वी थिजली. "म्हणजे… तो हुडी घातलेला माणूस…?"
बाबा हळूच म्हणाले, "कबीर शाह तीन वर्षांपूर्वी गायब झाला. त्याला कुठेही पाहिलं गेलं नाही आणि त्याचा फोन पोलिसांनी आधीच जप्त केला आहे. तो तुला मेसेज करू शकत नाही." सान्वीची भीती गोंधळात बदलली.
तीने हळूच विचारलं, "मग मला आवाज कोणी दिला?"
आईने तिच्या केसांवर हात ठेवत हलकेच उत्तर दिलं,
"कधी कधी भीती मनात आकार घेते सान्वी. अंधार, शांतता, एकटेपणा… हे तुझ्याशी खेळ करत असतात."
आईने तिच्या केसांवर हात ठेवत हलकेच उत्तर दिलं,
"कधी कधी भीती मनात आकार घेते सान्वी. अंधार, शांतता, एकटेपणा… हे तुझ्याशी खेळ करत असतात."
ती खूप वेळ शांत बसली. तिचं मन अजूनही हळूहळू शांत होत होतं. बाबांनी फाईल बंद करून ड्रॉवरमध्ये ठेवली.
आईने तिला पाणी दिलं. संघर्ष संपल्यासारखं वाटलं.
आईने तिला पाणी दिलं. संघर्ष संपल्यासारखं वाटलं.
त्या रात्री सान्वी स्वतःच्या खोलीत झोपायला गेली.
ती दिवा लावूनच झोपली. फोन शांत होता. काहीच मेसेज नव्हते.
ती दिवा लावूनच झोपली. फोन शांत होता. काहीच मेसेज नव्हते.
तीने डोळे मिटले… पण अचानक फोन एकदा लुकलुकला.
स्क्रीनवर एक मेसेज आला, UNKNOWN: मी अजूनही इथे आहे.” सान्वी पांढरी पडली. फोन तिच्या हातात थरथरू लागला. तिने नजर हळूच खोलीच्या कोपऱ्याकडे वळवली.
आणि तिथे…खिडकीच्या बाहेर…कुणीतरी काळ्या हुडीमध्ये उभं होतं. या वेळी मात्र तिची कल्पना नव्हती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा