नीलम आणि आई पवनची वाट बघत बसले. पण पवन तर आलाच नाही आणि त्याचा फोन सुद्धा आला नाही.
सुरुवातीला नीलमला वाटलं की त्याला काही प्रोब्लेम तर झाला नाही ना, म्हणून तिने ऑफिस मध्ये चौकशी केली.पण तो तिथे रोज कामाला जात होता.
आता मात्र तिच्या मनात जी शंका होती ती खर ठरायच्या मार्गावर होती. दोन तीन दिवस झाले, मग नीलम आता घरी जाणार होती पण तरीही तो आलेला नव्हता. त्याला जणू काही घेणे देणे नव्हते ना बाळाचे ना बायकोचे.
निलमला सुटी झाली. मुलगी झाली म्हणून तर तो आला नसेल असं तिच्या मनात आलं पण त्याला कुणी सांगितलं असेल? हेच सगळं तिच्या डोक्यात चालू होते. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसला होता.
एक दिवस बाळ खूप रडत होते आणि नीलम बाजूला बसलेली होती .तिने बाळाला घेतलं सुद्धा नाही, बाळाला नीलम का घेत नाही म्हणून आई बाहेरून धावत आली. बाळाला पटकन उचललं.
"नीलम अगं ये नीलम... तुला ऐकु येत नाही का बाळ किती रडते आहे."
तरीही तीच लक्ष नव्हतं.
मग आईने तिला हलवलं..
"अगं नीलम.... बाळ रडत आहे, कुठे लक्ष आहे तुझे."
"अह्ह.....आई काय झालं गं?"
"अगं बाळ रडते आहे ..."
"हो अगं माझ्या लक्षात नाही आले."
"असं कुठे लक्ष होत गं तुझं...आई आहेस तू विसरली हे."
निलमने बाळाला घेतले आणि शांत केलं. तिच्या डोळ्यांत पाणी आले.
"नाही गं आई , मी कशी विसरेल? मी काय पवन आहे जो एक बाप झाला पण त्याला काही घेण देण नाही."
आईला खूप वाईट वाटले, आई काहीच न बोलता रूमच्या बाहेर आली आणि खूप रडायला लागली.
आईला खूप वाईट होत पण नीलमच्या पुढे रडली तर ती खचून जाईल आणि आई तो विषय टाळत होती.
सव्वा महिना झाला त्यात किती वेळा तिने पवनला, त्याच्या आईला फोन लावले पण कुणीच तिचा फोन घेत नव्हते. तिला काय करावे काही कळत नव्हते.
"आई अगं मी जावून येवू का सासरी माझ्या?"
"अगं आता कुठे सव्वा महिना झाला आहे फक्त आणि तू जायचं म्हणतेस."
"अगं म्हणजे मला जरा बघायचे आहे काय झालं नेमकं?"
"अगं पण तू गेलीस तर माझे चित कसं लागणार, एवढं लहान बाळ कसं सांभाळशील."
"आई, तू चलते का मग ?"
"बरं पण...."
"पण काय?"
"अगं काही नाही ...चल जावू.."
साधारण दोन दिवसांनी त्या दोघी निघाल्या. नीलम जेव्हा तिच्या पुण्याच्या घरी पोहचली तेव्हा त्या घराला कुलूप होते.आजूबाजूला चौकशी केली तर कळलं की तो बऱ्याच दिवसापासून इथे येत नाही. ती शेजारी असणाऱ्या मावशीला दिसली.
"अगं नीलम ये ना घरात."
"नाही... नको...मावशी.'
"अगं ये ग...या ना ताई तुम्ही पण."
चहा ठेवते हं बसा जरा..."
"मावशी अहो पवन दिसला का अशात?"
"हो दिसला म्हणजे साधारण एक महिना झाला त्याने हे घर सोडलं?"
"सोडलं?"
"हो तुला माहीत नाही."
"नाही ना..."
"अगं बाळ बघायला आला असेल तेव्हा सांगितलं नाही का त्याने."
"नाही..."
तेवढ्यात तिची आई बोलली,
"अहो ताई तुमच्यापासून काय लपवायचे आता."
"का काय झाले?"
"अहो तो बाळ बघायला सुद्धा आला नाही."
"काय?"
"हो ना... म्हणून आम्ही दोघी इथे आलो, त्याचा शोध घेत घेत."
"नीलम अगं तू गेली आणि त्यानंतर एक मुलगी यायची इथे...मुलगी कसली बाईचं म्हणावं लागेल."
"म्हणजे?"
"अगं यायची म्हणजे इथेच राहायची."
"हो का?"
आता निलमला खात्री पटली की, तो काही आपला राहिला नाही. तिच्या डोळ्यांत पाणी आले.
मावशी चहाचा कप हातात देत म्हणाली,
" एवढ्यात त्याच सगळ्यांशी बोलणं कमी झाले होते. कुणाशी बोलत नव्हता तो.आम्हाला तर तुला मुलगी झाली हे पण नाही माहीत."
" एवढ्यात त्याच सगळ्यांशी बोलणं कमी झाले होते. कुणाशी बोलत नव्हता तो.आम्हाला तर तुला मुलगी झाली हे पण नाही माहीत."
आई हळूच बोलली,
"हो का..."
तिच्या डोळ्यातलं पाणी बघून मावशी म्हणाली,
"बाळा हताश नको होऊ, अगं तू नोकरी करायची ना...तिथे जॉईन कर आणि आईला ठेव बाळाला सांभाळायला."
"हो...ते करेल मावशी मी पण अहो, शेवटी बापाची जागा मी कशी भरून काढू?"
यावर मावशी आणि आई यांच्याजवळ शब्द नव्हते. काही वेळानंतर..
"मावशी निघतो आम्ही."
"अग थांब एवढ्या लांबचा प्रवास करून आलीस. फ्रेश हो,जेवण कर मग काय करायचं ते ठरवा."
नीलम हसली...
"आता काय ठरवायचं मावशी. सगळं पवन ठरवून निघून गेला.आता मी निघते..पुढे बघते काय करायचे."
"नीलम म्हणशील तर आमच्या वर एक रूम आहे रिकामी, तुझी इच्छा असेल तर ये तिथे राहायला. तुझ ऑफिस जवळ आहे ना आणि सोयीस्कर होईल,बाकी काही नाही."
"किती भाडे आहे मावशी?"
काय बोलेल मावशी? काय निर्णय घेईल नीलम?
वाचू या पुढच्या भागात
क्रमशः
©® कल्पना सावळे
©® कल्पना सावळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा