Login

अफेअर लग्नानंतरचे ( भाग ५)

लग्नानंतर आपल्या जोडीदाराने अफेअर केले तर दुसऱ्याला त्याची काहीही चूक नसतांना शिक्षा भोगावी लागते.
"पवन अरे...मी माझ्या पैशाने पार्टी देत आहे...तू कारण सुद्धा विचारलं नाही की कसली पार्टी?"

"सॉरी सॉरी सांग ना...काय विशेष आहे?"


आता मात्र पवन एकदम बदलला त्याची भाषा एकदम प्रेमळ झाली.


"अरे मला नोकरी मिळाली म्हणून पार्टीचे बोलले मी."

"अरे व्वा!! मस्त!! अभिनंदन... अगं मी गंमत केली तुझी.चल जाम भूक लागली आहे. तुझ्याकडून पार्टी.... वाह! क्या बात है!"


एवढे बोलून त्याने नीलमला मिठी मारली. नीलम तर आनंदात होती पण तिला त्याच वागणं फारस पटलं नव्हत.


नीलम तर रेडी होतीच ,पवन लगेच रेडी झाला. ते हॉटेलला गेले...मस्त पार्टी केली. जेवणाच बिल टेबलावर आले. लगेच पवनने हात खिशात टाकला, तो पैसे देणार तेव्हा नीलम म्हणाली,

"अरे पार्टी मी दिली ना मग मीच देते पैसे.तू कशाला देतो."

तो लगेच म्हणाला,
"आज मी देतो नंतर दरवेळी तू द्यायचे."

दोघे ही हसले. बिल देवून झाले आणि ते निघाले, काही अंतरावर चालत आल्यावर आईस्क्रिमची गाडी दिसली. दोघांनी एकमेकांकडे बघितलं. लगेच पवन गेला आणि दोघांसाठी आईसक्रीम घेऊन आला.


नीलम मनातल्या मनात म्हणाली, 'खरच मी काही पुण्य केले असेल म्हणून तर एवढा चांगला नवरा मिळाला मला.'


दोघे घरी आले. दुसऱ्या दिवशी पासून नीलम कामावर जाणार होती म्हणून ती सकाळी उठली, घरचं सगळं आवरून ती कामाला गेली. आणि पवन पण कामाला निघून गेला.


आता हे दोघांचं रूटीन चालू झाले.मध्ये फक्त कधीतरी सासू बाईंचा फोन यायचा आणि त्या विचारपूस करायच्या.

बघता बघता एक महिना निघून गेला. साधारण पाच तारखेपर्यंत दोघांचे पगार झाले. नीलमने दूधाचे पैसे दिले, किराणा भरला आणि इस्त्रीचे बिल, पेपर बिल हे सगळं चुकत केलं. काही सोन पण खरेदी केलं


महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत नीलमचा पगार संपला. एक दिवस तिला काही तरी अर्जट काम होते त्यासाठी तिला पैसे हवे होते.पण तिच्या जवळ जी रक्कम होती त्यात काही पैसे कमी पडत होते.

मग तिने पवनकडे पैसे मागितले तर पवन म्हटला,

"अगं माझे पैसे संपले..थोडे फार आहेत माझ्याकडे. तुला जास्त गरज नसेल तर राहू दे ना, नाहीतर मागू का कुणाजवळ?"


"नाही नको, राहू दे...बघते मी."

एवढे पैसे गेले कुठे असा प्रश्न नीलमला पडला. पण तिच्याच मनाने तिला उत्तर दिले की,
' कदाचित गावी पाठवले असतील म्हणून तिने तो विषय तिथेच सोडून दिला.'


दोघांचा संसार मस्त चालला होता. पवन बरेच वेळा ऑफिसचे कामानिमित्त बाहेर गावी जायचा.

साधारण नऊ महिन्यानंतर नीलम गरोदर राहिली, दोघे खूप आनंदात होते.

एक वेळ पवनला महिनाभर बाहेर गावी जायचे होते.


"नीलम, अगं मला ऑफिसच्या कामासाठी महिनाभर बाहेर जावे लागेल."


"ठीक आहे ना मी आईला बोलवून घेते माझ्या."

"ठीक आहे, तुला तसे गरज भासली तर पैसे पाठवतो मी."


नीलम हसली...

"का गं काय झाले हसायला?"

"काही नाही रे..सगळा खर्च तर मीच करते. तू कधीतरी  दिला आहे का घरात पैसा?काय करतो काय माहित एवढ्या पैशाचं?


"म्हणजे मी उडवतो का पैसे असे वाटते का तुला."

"तसं नाही रे."

"मग कसं?"

"बरं बाबा चुकलं माझे."

पवन रूममधे चालला गेला. दुसऱ्या दिवशी तो सकाळीच बाहेर गावी जाण्यासाठी निघाला.


"पवन... अरे, एवढी मोठी बॅग..कामाला चाललास ना का अजून कुठे?"


"नाही दुसरी बायको केली आहे, तिच्याकडे जातो राहायला."


"अरे  एवढा का चिडतो?"


"मग चिडू नाही तर काय..काहीही प्रश्न विचारते. बरं ते जावू दे आई येणार आहे ना तुझी नक्की."


"हो निघाली पण ती, तू इकडची काळजी करू नकोस...."


"बरं येतो मी."


"हो रोज न चुकता कॉल करायचा."


"हो गं बाई."


पवन निघून गेला. इकडे नीलम रेडी होवून कामावर निघून गेली. संध्याकाळी ती घरी येत नाही तोच आईचा फोन आला

"हॅलो आई."

"अगं कुठे आहेस?"


"आई, अगं शेजारी चाबी ठेवली आहे घे ती तू...मी निघालेच आता..पोहचते  वीस मिनिटांनी."

"बरं बरं ये सावकाश."

काही वेळातच नीलम घरी आली , त्या आधी आई घरात आलेली होती.


"आई...कशी आहेस गं?"

"मी मस्त आहे रे बाळा तू कशी आहेस आणि आमचा छोटा बाळा कसा आहे?"


"तो पण मस्त आहे.. आई अगं खायला काय काय आणलं? खूप भूक लागली आहे मला."

"अगं हो हो आधी हातपाय धू.तुझं सगळं आवडीच आणलं आहे. तू खा मग मी चहा बनवते."


"हो ...आलेच मी."


आईने नीलमला खायला दिले.


"अगं नीलम मला एक विचारायचा होता."


"विचारना अगं, त्यात काय एवढं?"


काय विचारायचे असेल आईला? वाचू या पुढच्या भागात
क्रमशः...
©® कल्पना सावळे

🎭 Series Post

View all