Login

अफेअर लग्नानंतरचे ( भाग २)

लग्नानंतर आपल्या जोडीदाराने अफेअर केले तर दुसऱ्याला त्याची काहीही चूक नसतांना शिक्षा भोगावी लागते.
नीलमच्या आईचा फोन आला तेव्हा तिला ऑफिस मधल्या लोकांनी सांगितलं होते की, तिला थोडं बरं नाही.

दुसऱ्या दिवशी नीलमला सुटी झाली आणि पोलिसांनी देखील नीलमला समज देऊन कुठलाही गुन्हा नोंदवला नाही. पिकनिकचा शेवटचा दिवस होता. काही लोक जवळच फिरायला गेली होती. इकडे नीरज नीलमला घेऊन आला. हॉटेल मध्ये आज फक्त दोघेच होते.

"नीलम...मी परत तुला कशाचाही फोर्स नाही करणार....सॉरी."

"नीरज तू माझा एक चांगला मित्र आहेस.तू जेव्हापासून या ऑफिसमध्ये आलास तेव्हापासून तू मला खूप सपोर्ट केला. आता तीन वर्ष होतील आपली ओळख होऊन. तू  बिन्धास्त सगळ्या गोष्टी शेअर करतो.पण मला नाही जमत तसं."


"अगं मला शेअर करायला कुणीच नाही. म्हणून तुला शेअर करतो."

"हे बघ नीरज पण तू जसा माझ्याशी वागतो ना ते नाही आवडत मला.एक मित्र आहेस मग तसं वाग ना, मर्यादा नको सोडू तू."

"हो काल रात्री चुकलं माझ...जरा जास्त झाली होती. त्यासाठी मी मनापासून माफी मागतो."


"अरे..तू काय काय बडबडलास ...तुला आहे का माहीत...हा.. हा.. हा..माहीत कसे असेल म्हणा त्यासाठी शुद्ध असावी लागते."

"हो..नाही आठवत मला. पण मला ना खूप त्रास झाला ना की पितो मी. तू कधी तरी मला बघितलं का पितांना."

"अरे पण काय झाले ? तुला स्वतःला आवरता नाही येत नीरज..अरे तुझ्या बायकोला माहीत झालं तर..काय वाटेल तिला."

" बायको!!!! मला गेली कित्येक वर्ष झाले बायको माहीत नाही गं.फक्त शरीर सुख देणारी स्त्री म्हणजे बायको असते का गं? सकाळपासून रात्री पर्यंत आपला नवरा...आपली बायको काय करते हे माहीत नसते आम्हा दोघांना."


" म्हणजे आणि तुझा मुलगा?"


" तुला माहित नाही ..म्हणजे आपण कधी बोललो नाही या विषयावर पण माझी बायको...."


नीरज शांत झाला..

" काय तुझी बायको ...अरे बोल ना पुढे."

"माझ्या बायकोचे अफेअर आहे."

"काय?"


"हो...आणि एक नाहीतर दोन दोन..."

"तू तिला काही का बोलत नाही."

"काय करणार?  मुलाच्याही नजरेत मी वाईट आणि ती फार चांगली आई आहे. तो एक शब्द सुद्धा तिच्या विरोधात ऐकायला तयार नाही होत कधीकधी."


"पण तुझी बायको अशी का वागते."

"पैसा अजून काय? अगं तिच्या गरजा खूप मोठ्या मोठ्याआहेत. मी नाही पूर्ण करू शकत काही गरजा तिच्या. मी सहन करतो ते फक्त मुलासाठी. आम्ही जगाच्या नजरेत एकत्र आहोत फक्त...."


"नीरज, अरे तुझी बायको तशी वागते म्हणून तू माझ्याशी असा वागलास?"


"अगं सांगितलं ना काल जरा जास्त झाली म्हणून. सॉरी चुकलो मी. प्लिज पण माझ्या या चुकीसाठी आपली मैत्री नको तोडू."

'एगझ्याटली...मलाही तेच म्हणायचे ह़ोते. की, आपल्या मैत्रीवर गालबोट नको लागू देवू. ऑफिस मध्ये तू एकमेव असा आहेस की मी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते.पण मग तूच असा वागला तर मी काय करायचे रे?"

"बरं आवर आता..परत अशी चूक नाही होणार. तू कुणाजवळ नको बोलू प्लिज की मी तुला लग्नासाठी जबरदस्ती केली माझी बायको असताना. "


"का ? लाज वाटतेय आता...नाही सांगणार कुणाला कारण सांगितलं ना तर मला तुझ्याशी नात तोडाव लागेल आणि मी ते नाही करू शकत कारण माझी लेक पूर्वी तुझ्यात खूप गुंतली आहे."

"अगं हो काल रात्री तुझ्या आईचा फोन आला होता तुझ्या फोन वर मी सांगितलं त्यांना..."


"काय सांगितलं तू त्यांना..."

"अगं हेच की तू जरा बाहेर गेली आहे, उद्या सकाळी करायला सांगतो कॉल."

"बरं झाल सांगितलं नाहीस."

"आता खरं खरं सांग तू नस का कापली.कारण मी जे काही वागलो...त्या करणावरून तर तू कधीच अशी वागणार नाही.. आय नो."


"म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. मी नाटक केलं."


"नाही गं...पण शुल्लक कारणावरून. तू कधीच  एवढं टोकाचं पाऊल उचलणार नाही."


"चल आवरून घेते बॅग...सगळा पसारा पडलाय. बाकी लोक परत यायची वेळ झाली. लवकर निघालो तर लवकर पोहचू घरी."


"नीलम अगं विषय नको बदलू.आता नाही सांगायचं तर नको सांगू. मी तुला कधीतरी तुझ्या आयुष्याबद्दल विचारलं का?माझ्या घरचं तर तुला सगळं माहीत आहे."


"मी विचारलं तुला...तू तुझाच सांगत राहतो त्याला मी तरी काय करू."

"हो गं बाई...आवर आता...पण उद्या रविवार आहे तू मला तुझ्या आयुष्यातलं सगळं सांगुण मोकळी हो."


तिने त्याच्याकडे आश्चर्याने बघितलं...


"हो तुलाचं म्हणतोय मी कळलं का नाही. तेवढा अधिकार तर नक्की आहे."

"किती दिवस झाले भेटून पण तू कधी मला विचारलं नाहीस?"


"हो..पण तू या आधी असं टोकाचं पाऊल कधी उचललं नाहीस."

एवढ्यात बाकी ऑफिसमधली माणसं परत आली आणि मग सगळे जण घरी यायला निघाले.

आईला कळेल का नीलम सोबत काय घडले?
वाचू या पुढच्या भागात..
क्रमशः
©® कल्पना सावळे.