"अगं पवनला एवढ कसलं काम आहे गं बाई ते पण एवढ्या दिवस! आधी पण असाच जायचं का तो?"
"आई, आधीच माहीत नाही पण एक दोन दिवस जायचं तो..पण यावेळी एक महिना काहीतरी ट्रेनिंग आहे म्हटला त्याचं."
"हो का!...बाई जरा लक्ष ठेव त्याच्यावर."
"आई तू काही पण नको. तो नाही गं तसा."
"अगं कुणाच्या तोंडावर नसतं लिहल ते."
"हो पण..आई जावू दे बाई."
"आता तुला काय काय खायचं ते सांग महिनाभर आहे मी इथे."
"का मग कुठे जाणार आहेस?"
"मी जाईल बाई माझ्या घरी.आपलं घर आपलचं असतं."
"बरं बाई.. आताच तर आली लगेच नको विचार करू जायचा."
नीलम रोज कामावर जायची आणि आई घरचं करायची. रोज रात्री नीलम पवनसोबत फोनवर बोलायची.
एक दिवस तिला काही काम होतं म्हणून तिने दुपारी कॉल केला तर तो एका बाईने उचलला.
"हॅलो कोण बोलत आहे?"
"तुम्ही कोण बोला ना."
"पवन आहे कुठे?"
तेवढ्यात पवनने फोन हिसकावून घेतला
"हॅलो...अगं बोल नीलम काही अर्जंट काम आहे का?"
" अर्जंट असेल तरच मी कॉल करू का?"
"अगं तसं नाही गं."
"कोण होती ती बाई?"
"अगं कुणी नाही ऑफिस मधली आहे.फोन वाजला म्हणून उचलला तिने."
"असं कुणाचाही फोन कसा उचलला, ते ही ऑफिस मध्ये."
"तू भांडण करण्यासाठी फोन केलास का? काय असर होईल बाळावर.?"
"एवढी काळजी बाळाची तुला?"
"बोल बाई पटकन काम आहेत मला."
"काही नाही ठेव फोन."
संध्याकाळी नीलम घरी आली
"काय गं नीलम आज चेहऱ्याचा रंग उडालेला का आहे? काय झालं?गरोदरपणात टेन्शन नाही घ्यायच कामाचं."
नीलम काहीच बोलली नाही..ती आईच्या कुशीत शिरली.
काही केल्या तिच्या डोक्यातून ही गोष्ट जातच नव्हती की ती बाई कोण असेल बरं?
महिना निघून गेला. पवन परत आला.अगदी पाहिल्यासारखं वागणं. त्याच्यात काहीच फरक दिसत नव्हता. तो आल्यावर आई निघून गेली. पुन्हा त्याचे रूटीन चालू झाले.
असेच दिवस निघून जात होते. आता नीलमला सातवा महिना लागला होता. तिच्या बाळाचे वजन जास्त असल्यामुळे तिचे पोट खूप मोठे दिसत होते. त्या महिन्यात दोघे दवाखाण्यात गेले, तपासणी झाली, फी द्यायच्या वेळी मात्र पवनचा हात काही खिशाकडे वळला नाही. नीलमने फी दिली. आता पण तिच्या मनात आले की, घरचा खर्च, बाकी कुठलाही खर्च असो तो मीच करते. निदान हा तरी खर्च त्याने द्यायला हवा होता.
एक दिवस तिने तिच्या सासूबाईला फोन केला.
"आई कशा आहात?"
"मी बरी आहे गं..पण तुझ्या नवऱ्याला म्हणावं तुझा बाप मेला आहे पण आई अजून जिवंत आहे, काही पैसे पाठवत जा."
"हो..हो...सांगते."
"तू बरी आहेस ना...नीट खात पित जा बाई...याच काही संसारात लक्ष नाही दिसत."
सासूचे तिने ऐकून घेतले बाकी काही बोलली नाही ती.
त्या दिवशी रात्री जेवण झाली. मग दोघे शतपावली करायला गेले तेव्हा,
"पवन... अरे, तू किती पैसे पाठवतो आईला?"
"का गं असं असं अचानक विचारते? तूला आता सगळं हिशोब द्यावा लागेल का?"
"तसं नाही रे असच विचारलं."
"बरं तू सांग, तू माहेरी कधी जाणार आहेस डिलिव्हरी साठी."
"का रे?"
"अगं माझ्या आईच काहीं जमणार नाही. तुला तर माहीत आहे तिला इकडे शहरात करमत नाही आणि तुझी आई आली तर तुझ्या घरी कुणी नाही.त्यापेक्षा तूच जा तुझ्या माहेरी."
"बस दोन दिवसात निघणार आहे मी. तसं सरांशी बोलले मी."
आज का कुणास ठाऊक नीलमला वाटत होते की तिच्या जाण्याची पवन वाट बघत आहे.
आज पवन लगेच झोपी गेला. तेव्हा नीलमने त्याचा फोन चेक केला. पण फोनला सगळीकडे पासवर्ड लावलेले असल्यामुळे तिला काहीच सापडलं नाही.
दोन दिवसानंतर ती माहेरी निघून गेली.
त्यांनतर पवनने स्वता:हून तिला कधीच फोन केला नाही. तिने केला तर एक फॉर्मिलिटी म्हणून तो बोलायचा. कधी बाळाची चौकशी नाही किंवा ती कशी आहेस हे विचारनं नाही.
निलमने आई जवळ एक दिवस मन मोकळं केलं. तेव्हा आई म्हणाली,
"अगं पुरुषांना खूप काम अस्त्तात. कशाला करेल तो तुझी काळजी, मी असतांना. काम करून दमून येत असेल आणि झोपी जात असेल. उगाच मनात भलते सलते विचार करू नको."
दोन महिने कसे गेले काही कळलं नाही. एक दिवस नीलमच्या पोटात दुखायला लागले. आईने तिला दवाखाण्यात ऍडमिट केले.तेव्हा आईने पवनला खूप फोन केले पण त्याने ते काही उचलले नाही.
आता करेल फोन, मग करेल या आशेवर आई होती. शेवटी आईने फोन करने बंद केले.
'आई तू त्याला सांगितलं का नाही की मी सांगु?"
"अगं केला फोन , पण त्याने काही उचलला नाही बाई."
आणि रात्री एक वाजता नीलमने गोंडस मुलीला जन्म दिला.आईने परत त्याला फोन केला.पण काही फायदा झाला नाही. आता झोपला असेल उद्या सकाळी तरी नक्की करेल या आशेवर ती होती.
करेल का पवन फोन? येईल का बाळाला बघायला?
वाचू या पुढचा भागात.
वाचू या पुढचा भागात.
क्रमशः
©® कल्पना सावळे
©® कल्पना सावळे