Login

अफेअर लग्नानंतरचे (भाग ३)

लग्नानंतर आपल्या जोडीदाराने अफेअर केले तर दुसऱ्याला त्याची काहीही चूक नसतांना शिक्षा भोगावी लागते.
संध्याकाळी सगळे आपापल्या घरी पोहचले.
नीलम घरी पोहचल्याबरोबर तिने पूर्विला मिठी मारली.

"मम्मा अगं काय झालं? तुला माझी खूप आठवण येत होती का?मला पण तुझी खूप आठवण येत होती."


"हो का बाळा...आय लव यू बाळा..."

"लव यू टू मम्मा...."


"चल आधी फ्रेश हो...मस्त गरमागरम थालीपीठ केलंय तुमच्या आवडीचे आणि हे काय गं हाताला काय लावून घेतलं."


"अगं काही नाही गं.... असचं... थोडे खरचटलं"

नीलम फ्रेश झाली आणि तिघी जेवायला बसल्या जेवताना ट्रीपच्या गमती जमती नीलमने सांगितल्या. पूर्वी आणि आईने त्या मस्त एन्जॉय केल्या. मग नीलमने पुर्विला झोपायला नेले आणि तिला झोपवतांना ती ही झोपी गेली.


इकडे नीरज घरी आला तेव्हा घरी त्याच्या बायकोचे काही मित्र बसले होते. तर आत त्याचा मुलगा आणि काही त्याचे मित्र दारू पित बसले होते.

आपला फक्त पंधरा वर्षाचा मुलगा आत दारू पीत बसला होता,हे बघून त्याच्या तळपायातली आग मस्तकात गेली.

तो आत जसा गेला तसा बायकोच्या म्हणजेच शर्वरीच्या हातातला ग्लास घेतला आणि जमिनीवर फेकला.

" थोडी लाज वाटू दे शर्वरी. मी काही म्हणत नाही याचं अर्थ असा नाही की तू तुझ्या मनाला वाटेल ते करावं."


दोघांचे भांडण सुरू झाले. ते बघून त्याचा मुलगा परेश बाहेर आला.

"पप्पा, अहो तुम्ही का ओरडत आहे मम्मीला...तुम्ही फिरता इकडे तिकडे, मज्जा करता  ते चालत तुम्हाला आणि आईने थोडी मज्जा केली तर बिघडले कुठे."


"परेश तू लहान आहेस तुला कळत नाही काही."

"मी मोठा आहे पप्पा  आता, सगळं कळतं मला."


"कळलं असतं ना तर असा दारू पित बसला नसता."

"चील पप्पा , अहो बियर आहे ती दारू नाही."

शर्वरी पण जोरात ओरडली,


"काय? ....परेश तू तर म्हटला होता ...आम्ही कोल्ड ड्रिंक आणतो म्हणून."

"आई..तुला चालत सगळं..."

तो अजून काही बोलायच्या आत शर्वरीने फटकन एक कानशिलात लगावली.


निरजने त्याला बाजूला घेतलं.

"आता मारून काय उपयोग. तुझं थोडं तरी लक्ष आहे का त्याच्याकडे? मी जेव्हा त्याला बोलायचो, रागवायचो तेव्हा तो तुझा मुलगा होता. त्याला काहीच बोलायचं नाही अशी म्हणायची तू मला."

शर्वरी आता चिडली आणि म्हणाली,

" बघ मूर्खा तुझ्यामुळे सगळं ऐकावं लागत आहे मला."


" मम्मा अगं....तूच मला पप्पाच्या विरोधात भडकायची आणि आता तूच मला मारलस. तू जेव्हा त्या आलेल्या काकांसोबत फिल्म बघायला  जायची तेव्हा मला खूप खाऊ घेवून द्यायची. तुला काय वाटते मला काही कळत नाही. तू ना..."

परत शर्वरीने हात उचलायचा प्रयत्न केला. तेव्हा नीरज बोलला,

"शर्वरी अजिबात हात उचलू नको तू आता आणि परेश तू आता एक शब्द जरी काढला ना तर माझ्या सारखं वाईट नाही कुणी."

तिचे दोघे मित्र उठले त्यांनी घराचा रस्ता धरला. त्याचबरोबर त्याचे मित्रही घरातून जायला निघाले.

थोड्या वेळात घरात निरव शांतता झाली. त्या दिवशी घरात कुणीच जेवण केलं नाही. नीरजने त्याला खूप समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी पासून मात्र परेशमध्ये  एकदम बदल झाला.


"पप्पा मला माफ करा मी चुकलो, मी तुमच्याशी खूप वाईट वागलो ना. खरचं मला माफ करा."


"तुला तुझी चूक कळली ना बस मला अजून काहीच नको.अरे बाळा तू जरा अभ्यासाकडे लक्ष दे.आता मेहनत कर नंतर आयुष्यभर मज्जा करायची आहे."

नीरज रूम मधून बाहेर आला,

"शर्वरी आज जेवायला काय करायचं बघ तुम्हाला, मी बाहेर जाणार आहे."

शर्वरी लगेच म्हणाली,
"परेश तुला काय खायचं ते सांगा, मला पण जरा काम आहे म्हणून मी पण बाहेर जेवणार आहे."

"पप्पा मी येऊ का बाहेर तुमच्या सोबत म्हणजे तुम्हाला हरकत नसेल तर."

"हो...ये ना...मला आनंद होईल बाळा."

नीरज तिथून निघून गेला.त्याच्या मागोमाग शर्वरी देखील गेली.


"नीरज मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."


"रात्री बोलू आता मला बाहेर जायचं आहे."

"फारच घाई आहे तुला जायची."

"हो..का....तुला नसते घाई."

"नीरज, मला काही इंटरेस्ट नाही बोलण्यात तुझ्याशी मला सांग तू डिव्होर्स पेपर वर सही करणार आहेस का नाही."

"आण पेपर, करतो सह्या. तू माझ्या आयुष्यात आली हीच खूप मोठी चूक झाली माझी. आईला म्हणत होतो मी ही चांगली मुलगी नाही पण नाही...तू काय भुरळ घातली होती काय माहित तिच्यावर. तू आल्यावर महिना भरातच तिला हार्ट अटॅक आला आणि गेली मला सोडून कायमची. तिला तुझ वागणं खटकल पण ती काहीही करू शकली नाही."


"मला ना फक्त तुझ्या प्रॉपर्टीशी घेणं देणं होत... मला बाकी कशातच इंटरेस्ट नव्हता आणि मला ना ह्या मुलाची पण गरज नाही. जर तू सह्या केल्या तर..."


रागातच नीरज ने पेपर काढले आणि त्यावर सही केली आणि तिच्या थोबाडावर फेकले.

"हे घे पेपर आणि जा आयुष्यातून आमच्या आधीच तू ब्लॅक मैल करून करून सगळा पैसा घेतला...आता काहीच उरलं नाही माझ्याजवळ मग तू तरी कशाला राहशील."

"तुला तुझा मुलगा देते ना....मनात आलं तर येत जाईल त्याला भेटायला."

शर्वरी बाहेर आली तिची एक बॅग भरली आणि तिथून निघून गेली कायमची.


नीरज मात्र खूप दुखावल्या गेला. त्याला बघून परेशला खूप वाईट वाटलं. त्याला कळत होतं की कोण चुकत आहे.


"पप्पा ...मी आहे ना...."

नीरजने त्याला घट्ट मिठी मारली.

तेवढ्यात नीलमचा कॉल आला...

" अरे किती वेळ आहे, मी आले केव्हाची.?

"हो आलोच.."

"चल परेश आवर लवकर"

आणि दोघे निघाले.

काय गुपित असेल नीलमच्या आयुष्याचं? खरच ती सांगेल  का नीरजला की नाही? वाचूया पुढच्या भागात.

क्रमशः
©® कल्पना सावळे.