अफेअर..

तिचं अफेअर
कॅरेक्टर...


"तिचं तिच्या नवर्‍याशी पटत नाही बहुतेक.." प्रिया कुजबुजत म्हणाली.

"तुला काय माहित?" निशाने विचारले.

"बघितलं नाहीस का कधी? आजकाल ती सतत त्या हिरोसोबत फिरत असते." प्रियाने माहिती पुरवली.

"वाटत नाही ना तिच्याकडे बघून?" निशा आश्चर्याने म्हणाली.

"त्यात काय वाटायचे? कोणी काय लिहून फिरतं की काय कपाळावर? मांजर डोळे मिटून दूध पित असलं तरी जगाला दिसत असतंच ना.." प्रिया मुद्दाम जोरात बोलली. तिची वाक्यं बाजूने जाणाऱ्या समिताच्या कानावर पडली. ते ऐकून कोणीतरी उकळलेलं शिसं आपल्या कानात टाकतं आहे असंच तिला वाटलं. ती घरी आली. घर नेहमीप्रमाणेच बंद होते. तिने दरवाजा उघडला. लाईट लावताच घरातला अंधार दूर झाला. पण तिच्या मनातला अंधार मात्र तसाच होता. थकलेल्या चेहर्‍यावर पाणी मारून ती सोफ्यावर येऊन बसली. बाजूच्याच टेबलवर त्या तिघांचा हसरा फोटो होता. असे परत कधी हसलो होतो? ती स्वतःशीच आठवू लागली. तिने तो फोटो हातात घेतला. त्यातल्या त्या दोघांच्याही फोटोवरून तिने हात फिरवला. दोघांच्या.. प्रतिकच्या आणि प्रितेशच्या सुद्धा. तिच्या डोळ्यातून नकळत एक अश्रू ओघळला.

"आई, काही खायला आहे का?" दरवाजा उघडताच ओरडतच प्रतिक आत आला. स्मिताने वर बघितले. क्लासमधून दमूनभागून आलेला तो. ताडमाड वाढलेली उंची, विस्कटलेले केस.. आणि तरीही चेहर्‍यावरचा तो निरागसपणा. त्याला पटकन जवळ घ्यावंसं वाटलं तिला. पण त्याला ते आवडलं नसतं याची खात्री होती.

"पाच मिनिटं बस. पटकन करते काहीतरी." समिता उठत म्हणाली.

"आत्ताच आलीस का तू?" बघता बघता प्रतिकचा चेहरा बदलला.

"हो.. आज ऑफिसमध्ये थोडं काम होतं. म्हणून उशीर झाला." समिताने स्वतःची बाजू मांडायचा प्रयत्न केला.

"मी विचारलं?" आपली बॅग उचलत आत जात प्रतिक म्हणाला.

"इथे बस ना.. मी चहा बिस्किट आणते." समिता त्याला म्हणाली.

"बाबा आले की येतो मी." प्रतिक उठला होता.

"कुठे येणार आहेस, बाबा आला की?" प्रितेशचा आवाज ऐकून प्रतिकचा चेहरा खुलला.

"ते मला भूक लागली होती. तू आल्यावर मी बाहेर येणार होतो."

"मला माहित होतं, तुला भूक लागली असेल. म्हणूनच तुझ्यासाठी तुझा आवडता नाश्ता घेऊन आलो आहे." प्रितेश बॅग उघडत म्हणाला.

"थॅंक यू बाबा. आज ना.. आम्ही सगळे खूप खेळलो आहोत." प्रतिक आपल्या गोष्टी प्रितेशला सांगू लागला. दोघांसाठी जणू समिता तिथे अस्तित्वातच नव्हती. ती उठून आत गेली.

"बघितलंत? तिला आपण नकोच आहोत. तिला आपल्यासोबत थांबायचे नसते." प्रतिकचे बोलणे तिने ऐकले पण आता तिला त्याचे काहीच वाटले नाही. रात्रीची जेवणं आटोपून समिता आपल्या खोलीत आली. प्रितेश स्वतःचं आवरत होता. समिताला बघून तो दचकला.

"मी आज प्रतिकसोबत झोपतो आहे. त्याचा जरा अभ्यास घ्यायचा आहे." तिच्या बोलण्याची वाट न बघताच प्रितेश तिथून निघून गेला. जाताना न विसरता त्याने दरवाजा लावून घेतला. समिता स्वतःशीच हसली. दरवाजा लॉक करायची गरजच नव्हती. तिने मोबाईल हातात घेतला. आणि मेसेज करायला सुरुवात केली.

"खूप एकटं वाटतंय.. आज तू म्हणत होतास. मी खरंच तुला भेटायला हवं होतं. खूप खूप मिस करते आहे मी तुला.."



समिताचे खरंच बाहेर अफेअर असेल? तिच्या संसाराचे काय होईल मग? बघू पुढील भागात.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all