अगर तुम साथ हो.. भाग १७
मागील भागात आपण पाहिले की रितेशचे बाहेर अफेअर असल्याचे काव्याला समजते. आता बघू पुढे काय होते ते.
"हॅलो मॅम.."
"गुड मॉर्निंग मॅम.."
"वहिनी.. " पार्थला काव्याला ऑफिसमध्ये बघून काय बोलू ते सुचत नव्हते.
"रितेश त्याच्या केबिनमध्ये आहे?" काव्याने विचारले.
"हो.. तो आणि.." पार्थने मान खाली घातली. काव्याने आजूबाजूला नजर फिरवली. भाड्याच्या खोलीपासून सुरू झालेला त्यांचा व्यवहाय, आज इतका वाढला होता. चार माणसं होती सुरूवातीला. आणि आता? या ऑफिसमध्येच वीसेक असतील. काव्याच्या मनात विचार सुरू होते. पण आज तिला अचानक आलेलं बघून स्टाफ मात्र गोंधळात पडला होता. ती फक्त वर्षातून एकदा लक्ष्मीपूजनाच्या वेळेस यायची तेवढंच. नाहीतर कधी इथे यायची वेळही यायची नाही.
"मॅम, तुम्ही चहा, कॉफी काही घेणार का?" रितेशच्या सेक्रेटरीने, प्रियाने विचारले.
"नाही.. काही नको. माझं रितेशकडे थोडं काम आहे. ते झालं की निघते मी." काव्याने हसत बोलायचा प्रयत्न केला. प्रिया मात्र थोडी भांबावली होती.
"मॅम, ते सरांची आत मिटिंग सुरू आहे." तिने बोलताना मान खाली घातली.
"घाबरू नकोस. त्या मिटिंगबद्दलच बोलायचे आहे मला." काव्याचे शब्द ऐकून प्रिया चपापली. पार्थनेही तिला जाऊ दे अश्या अर्थाची खूण केली. काव्याने रितेशच्या केबिनवर नॉक केले आणि ती आत्मविश्वासाने आत गेली.
"काव्या तू?? इथे?" तिला बघून रितेश थोडा घाबरला होता.
"चुकीच्या वेळेस आले का?" रितेशसोबत असलेल्या बाईकडे बघत काव्याने विचारले. ती रितेशपेक्षा बरीच लहान दिसत होती. दोघांचेही विस्कटलेला अवतार बरंच काही सांगत होता.
"नाही.. बस ना.. आम्ही डिस्कसच करत होतो. हिला आय मिन यांना ओळखतेस ना? या ईशाना.. आपल्या महत्त्वाच्या क्लायंट आहेत." रितेश स्पष्टीकरण देत होता.
"मी ते विचारले का?" काव्या शांतपणे बोलत होती.
"न.. नाही.." रितेश चाचरला.
"खरंतर मला विचारायचे होते की मिटिंग सुरू असताना असं काय बोलणं सुरू होतं की ज्यामुळे कपडे विस्कटतात?" काव्याचा अचानक आलेला प्रश्न रितेश आणि ईशानाची भंबेरी उडवून गेला.
"तुमची मिटिंग संपली असेल तर मिस ईशाना तुम्ही जाऊ शकता." काव्याने दरवाजा उघडला. ईशानाने रितेशकडे बघितले. रितेशने तिला जाण्याची खूण केली. ती गुपचूप तिथून निघून गेली. ती गेली हे बघितल्यावर काव्याने प्रियाला हाक मारली.
"प्रिया, जोपर्यंत मी बोलवत नाही, कोणालाच आत पाठवायचे नाही." काव्याने दरवाजा लावून घेतला.
"काव्या, हे काय सुरू आहे?"
"मी तेच विचारते आहे. हे काय सुरू आहे? खरंतर हा प्रश्न मला ज्यादिवशी तुझ्याबद्दल समजलं तेव्हाच विचारता आला असता पण मी थांबले. कारण मला तुला कसलीच पळवाट शोधू द्यायची नव्हती."
"काय बोलते आहेस तू?" रितेशच्या बोलण्यात जीव नव्हता.
"किती वर्ष फसवतो आहेस मला?"
"काव्या.."
"मला उत्तर हवं आहे रितेश. ते मिळालं की मी माझ्या रस्त्याने जायला मोकळी."
रितेशच्या चेहर्यावर पहिल्यांदाच भिती दिसत होती.
रितेशच्या चेहर्यावर पहिल्यांदाच भिती दिसत होती.
"तू म्हणाली होतीस, मला सोडून कधीच जाणार नाहीस." रितेश तिचे हात पकडत म्हणाला.
"तुला आठवतं, आपलं लग्न ठरलं तेव्हा तुझ्याकडे काहीच नव्हतं.. मी म्हटलं होतं की तू सोबत असशील तर सगळ्यातून निभावून जाऊ आपण.." काव्या आपला हात सोडवत म्हणाली. "तुझ्या आईवडिलांनी आपल्याला घराबाहेर काढले, तेव्हाही मी तुझ्यासोबत होते.. कारण कुठेतरी तुझं माझ्यावर प्रेम होतं. किमान मला असं वाटत होते." काहीतरी बोलण्यासाठी रितेशने तोंड उघडायचा प्रयत्न केला. काव्याने त्याला हाताने थांबवले.
"रिशान झाला. तेव्हा माझ्या, त्याच्या तब्येतीचं कारण देत तू मला घरी बसवलंस. नंतर क्रिशाचा जन्म झाला. तू मला छान पटवलंस की आईबाबांपैकी एकाचा तरी सहवास मुलांना मिळणं गरजेचं आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि सगळं सोडून घरी बसले. मला त्याचा पश्चाताप होत नाहीये.. कारण त्याकाळात मी माझी मुलं घडवली आहेत. मी हे सगळं केलं कारण तू माझ्यासोबत होतास.. आणि आता आयुष्याच्या या वळणावर मुलं बाहेर शिकायला जायचं म्हणतात, तू इकडे रंग उधळतो आहेस.. म्हणजे सर्वांसाठी सगळं करूनही माझी झोळी रिकामीच?" काव्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळला.
"काव्या... माझी चूक झाली." रितेश मान खाली घालून म्हणाला.
"हिच चूक माझ्याकडून झाली असती तर? काय केलं असतंस तू?"
"एकदा.. फक्त एकदाच मला संधी दे ना.. मी नाही वागणार परत असं."
"हे तुझ्या आईवडिलांसमोर आणि मुलांसमोर सांगशील? नाही ना? याचा अर्थ तू फक्त वेळ निभावून नेतो आहेस. सध्या तुला तुझ्या आईवडिलांना सांभाळणारी केअरटेकर हवी आहे म्हणून तू वरवरचं बोलतो आहेस. आणि जिथे मनच एकत्र नाहीत तिथे शरीराने एकत्र राहण्यात तरी काय फायदा? मी आजच माझ्या घरी निघेन."
"तुझ्या घरी?"
"हो.. ते छोटंसं घर मला पुरेसं आहे. रिशान बाहेरच जाणार आहे शिकायला.. क्रिशाही दोनतीन वर्षांनी त्याच्या पावलावर पाऊल टाकेल. तोपर्यंत तिला हवं तर ती माझ्यासोबत राहिल नाहीतर तुझ्यासोबत." रितेशच्या नजरेसमोर सगळं पांगापांग झालेलं घर दिसू लागलं. इतके वर्ष फक्त काव्याच्या भरोश्यावर त्याचं घर चालत होतं. ज्याचा कुठेतरी त्याला अभिमान होता. आपली एक चूक आणि पूर्ण घराची वाताहात?
"काव्या, नको ना हा निर्णय घेऊस. माझा नाहीतर मुलांचा तरी विचार कर.त्यांना काय वाटेल?"
"हा विचार तू केलास?
"नाही केला म्हणून तर माफी मागतो आहे तुझी."
"मी माफ केल्यावर पुढे काय?" काव्याच्या प्रश्नावर रितेश तिच्याकडे बघत राहिला.
"म्हणजे?"
"त्या ईशानाचं काय?"
"काव्या.. गेली काही वर्ष आपला बिझनेस बर्यापैकी वाढत होता, आयुष्य स्थिर झालं होतं, घराच्या आघाडीवर शांतता होती. काहीतरी थ्रील हवं होतं म्हण किंवा वेगळेपण. त्याच दरम्यान ईशाना आयुष्यात आली.. आणि जगणं बदललं. परत एकदा तरूण व्हावंसं वाटलं. पण आता तू माझे डोळे उघडल्यावर समजले की एका बाजूला कुटुंब आणि दुसरीकडे ती जर असेल तर कुटुंबाचे पारडे नेहमीच जड असेल." रितेश मनापासून बोलत होता.
"यावर कसा विश्वास ठेवू मी?"
"काय करू म्हणजे विश्वास बसेल तुझा? काव्या तुला सोडायचा मी विचारही नाही करू शकत. हे सगळं तसंही तुझ्याच नावावर आहे. तुला हवं तर तूच मला इथून बाहेर काढू शकतेस, हे तुलाही माहित आहे. आता तूच ठरव काय करायचं ते."
रितेश खुर्चीवर डोळे बंद करुन बसला. काव्या त्याच्याकडे बघत होती. सोडून जाते बोलणं सोपं होतं.. पण मग घराचं काय? माधवराव आणि स्मिताताई करू शकणार होते त्यांचं त्यांचं? तिच्या वयात येणाऱ्या मुलांना हा मानसिक आघात पचवता आला येईल?ते तिच्यासोबत येतीलही, पण वेगळं राहून बाबाचं प्रेम मिळेल त्यांना? बाकीच्यांचं सोडा.. ती स्वतःतरी राहू शकणार होती त्यांच्याशिवाय? नवीन घराची वीट न् वीट बांधण्यापासून ती त्याच्यासोबत होती. प्रत्येक गोष्ट तिने स्वतः केली होती. सोपं होतं तिच्यासाठी ते घर सोडून जाणं? त्याहीपेक्षा महत्त्वाचं.. ती राहू शकणार होती रितेश शिवाय? मनापासून प्रेम केलं होतं तिने त्याच्यावर. त्याच्यासाठी काय काय नव्हतं केलं? आणि एकाक्षणात हे सगळं सोडून जायचं? काव्याचं डोकं विचार करून दुखू लागलं. गौरीकडून हे सगळं ऐकल्यापासून तिच्या मनात हेच विचार होते. आणि आता रितेशशी झालेलं बोलणं तिला सहन झालं नाही. ती तिथेच चक्कर येऊन खाली कोसळली.
रितेश खुर्चीवर डोळे बंद करुन बसला. काव्या त्याच्याकडे बघत होती. सोडून जाते बोलणं सोपं होतं.. पण मग घराचं काय? माधवराव आणि स्मिताताई करू शकणार होते त्यांचं त्यांचं? तिच्या वयात येणाऱ्या मुलांना हा मानसिक आघात पचवता आला येईल?ते तिच्यासोबत येतीलही, पण वेगळं राहून बाबाचं प्रेम मिळेल त्यांना? बाकीच्यांचं सोडा.. ती स्वतःतरी राहू शकणार होती त्यांच्याशिवाय? नवीन घराची वीट न् वीट बांधण्यापासून ती त्याच्यासोबत होती. प्रत्येक गोष्ट तिने स्वतः केली होती. सोपं होतं तिच्यासाठी ते घर सोडून जाणं? त्याहीपेक्षा महत्त्वाचं.. ती राहू शकणार होती रितेश शिवाय? मनापासून प्रेम केलं होतं तिने त्याच्यावर. त्याच्यासाठी काय काय नव्हतं केलं? आणि एकाक्षणात हे सगळं सोडून जायचं? काव्याचं डोकं विचार करून दुखू लागलं. गौरीकडून हे सगळं ऐकल्यापासून तिच्या मनात हेच विचार होते. आणि आता रितेशशी झालेलं बोलणं तिला सहन झालं नाही. ती तिथेच चक्कर येऊन खाली कोसळली.
"आई... डोळे उघड ना? काहीतरी बोल ना." क्रिशाच्या रडण्याचा आवाज येत होता.
"क्रिशा लहान मुलांसारखं वागू नकोस." रिशानचा रडका आवाज आला.
"डॉक्टर काय म्हणाले? कधी येईल शुद्धीवर?" स्मिताताईंचा चिंतातुर आवाज.
"रितेश, अशी कशी चक्कर आली तिला?" कुंदाताईंनी काव्याचा पकडलेला हात तिला जाणवला. त्या हातांची थरथर तिला जाणवली.
"आदित्य, तू या सगळ्यांना घेऊन घरी जाशील प्लीज? इथे या कोणाला काही झालं तर परत आपल्याला त्रास." रितेशचा अगदी बारिक आवाज ऐकू येत होता. कुंदाताईंचा हात दूर गेलेला काव्याला समजला. तिला डोळे उघडायचे होते, 'आई तू जाऊ नकोस' , हे सांगायचे होते. पण तिच्या डोळ्यांवर आणि जिभेवर जणू हजार मणांची ओझी होती. सगळी खोली रिकामी झाल्याचं तिला जाणवलं. आपण परत एकटेच या विचाराने तिला रडू येत होतं.
"पार्थ, केवढी मोठी शिक्षा मिळाली माझ्या एका चुकीची मला." रितेशच्या रडण्याचा आवाज ऐकून काव्याने परत एकदा डोळे उघडायचा प्रयत्न केला.
"आज ती इथे पडली आहे तर मला जाणवतं आहे, ती काव्याचं माझ्या आयुष्यात काय महत्त्व आहे. काय करू म्हणजे ती बरी होईल? मी नाही तिला असं बघू शकत." रितेशने पार्थच्या खांद्यावर डोके ठेवले होते.
"फक्त माझ्याजवळ रहा.." काव्याच्या तोंडातून शेवटी शब्द बाहेर पडले.
"काव्या.. तू आलीस शुद्धीवर..." रितेशचा आनंद तिला जाणवत होता. "किती घाबरवलंस आम्हा सगळ्यांना? जरा तरी विचार कर आमचा.." रितेश काव्याचा हात हातात धरून बोलत होता. काव्या तृप्त मनाने हे ऐकत होती. तिच्या नकळत तिच्या मनाने निर्णय घेतला होता, रितेशला परत एक संधी द्यायचा. तिने डोळे परत मिटून घेतले.
विवाहबाह्य संबंध.. अनेकदा इथेतिथे बघितलेला, भरपूर चर्चा झालेला विषय. आजूबाजूलाच जेव्हा दोनतीन उदाहरणे बघितली तेव्हा त्याचे गांभीर्य जाणवले. पुरूषाच्या पडत्या काळात बायकोने सगळं करायचं तरी उर्जितावस्थेत तो तिला सोडून देतो किंवा दुसरा घरोबा करतो. हे कधीच न समजलेलं कोडं. नवर्याचे प्रताप माहिती असूनही ती बायको कशी त्याच्यासोबत राहते हा विचार नेहमी मनात यायचा. खरंतर या कथेचा शेवट वेगळाच ठरवला होता.. पण बर्याचदा कथा ठरवणे आणि ती उतरणे यात खूप फरक जाणवतो. तो परत एकदा प्रकर्षाने जाणवला. काव्याने रितेशसोबत रहायचा निर्णय घेतला. कारण तो एकटा म्हणजेच तिचा संसार नव्हता. आणि बाईने कितीही म्हटलं तरी वेगळं होणे हे त्रासदायकच असते ना? तिच्यासाठी तिच्या कुटुंबासाठी. काहीजणांना शेवट पटणार नाही.. पण असो..
कथा कशी वाटली ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा