अघटीत... भाग ११ (अंतिम)

राजेश्वरीचे लग्न जरी वीरशी झाले होते तरी नवऱ्याचा हक्क मात्र ऋषभ बजावत होता. माझ्या सांगण्यावरून राजेश्वरीच्या जेवणात औषध टाकली जायची ज्याने तिला गुंगी येत असे. तिच्यासोबत जे काही होत असे ते करणारा वीर नाही ऋषभ होता. तिला ते कधीच कळले नाही.” लीलावती बोलत होती. मनातील विष बाहेर निघत होते.
मागील भागात आपण बघितले…

रडता रडता लीलावली एकदम खाली जमिनीवर बसल्या. सुन्न होऊन. त्यांचे डोके देखील जमिनीवर टेकले होते. त्या अशा अचानक खाली बसताच शेखर, ऋषभ आणि भूमी त्यांच्या जवळ गेले.


आता पुढे…


“ए शेखर छान ॲक्टिंग केली ना मी? असच अपेक्षित असेल ना इथे पडलेल्या माझ्या भैयासाहेब आणि वहिनीसाहेबांना?” डोळ्यातील आसू बोटांवर घेत लीलावती ते हवेत उडवत बोलली. चेहेऱ्यावर एक प्रकारचे कुच्छित हसू होते.


“मॉम. काय सॉलिड ॲक्टिंग केली. एक क्षण तर मला वाटले तुला खरंच दुःख झाले आहे की काय!” भूमी उभी राहत बोलली. लीलावती, शेखर आणि ऋषभ देखील उभे राहिले.

“अरे, तुझी मॉम बेस्ट ॲक्टर आहे.” शेखर लीलावतीची पाठ थोपटत बोलला.


“भूमी तू अजून मॉमला ओळखलच नाहीये. मॉमला ह्या पाटील आणि त्यांच्या तोऱ्याचा किती राग आहे हे माहीत नाहीं तुला.” ऋषभ बोलला.


“चला सुंठेवाचून खोकला गेला म्हणायचे तर. नाहीतर ह्यांना मारण्यासाठी वेगळा प्लॅन करावा लागला असता.” शेखर बोलला.


“नाही. माझा प्लान अगदी परफेक्ट होता. जदुगराचा जीव जसा पोपटात असतो तस ह्यांचा जीव त्या राजेश्वरीत होता. ती गेली तर हे आज ना उद्या जाणारच होते ह्याची मला खात्री होती.

आता ह्या बंगल्याची आणि सगळ्या कारभाराची मालकीण मीच होणार.” लीलावती क्रूर हसत बोलली.


“पण तो श्रीवर्धन आहे की अजून.” ऋषभ बोलला.


“तो. तो मूर्ख आहे. त्याला पटवणे इतके अवघड नाही. लहान पणापासून मी त्याला माझ्या मुठीत केले आहे. मी सांगेल ती पूर्व दिशा इतका विश्वास आहे त्याचा माझ्यावर. भूमी तू श्रीवर्धनची बायको झाली की मग सगळं आपल्याच हातात येणार आहे.” लीलावती छद्मी हसत होती.


“तुझे स्वप्न पूर्ण झाले म्हणजे.” भूमी बोलली.


“ह्या सगळ्या मालमत्तेवर अधिकार मिळवणं हे माझं स्वप्न नव्हतंच कधी. मी हे सगळं केलं ते सूड उगवण्यासाठी.

तीन वर्ष आधी मी मोठ्या आशेने राजेश्वरीचा हात ऋषभसाठी मागितला होता.
पण ह्या माझ्या भैयासाहेबांनी माझा मुलगा दिसायला चांगला असला तरी त्याची माझ्या मुलीशी लग्न करण्याची योग्यता नाही असे म्हणून माझ्या ह्या लीलावतीच्या मुलाला नाकारले होते. माझ्या ऋषभचे राजेश्वरी वर प्रेम असुनही त्यांनी नकार दिला. इतका गर्व होता ह्यांना. तेव्हाच ठरवले होते की सूड घ्यायचा. म्हणून ह्या देशमुखांना कटात सामील करून घेतले आणि वीरला त्यांच्या बहिणीचा मुलगा म्हणून उभे केले. मग काय सगळं आपल्याला पाहिजे तसं घडत गेले.

राजेश्वरीचे लग्न जरी वीरशी झाले होते तरी नवऱ्याचा हक्क मात्र ऋषभ बजावत होता. माझ्या सांगण्यावरून राजेश्वरीच्या जेवणात औषध टाकली जायची ज्याने तिला गुंगी येत असे. तिच्यासोबत जे काही होत असे ते करणारा वीर नाही ऋषभ होता. तिला ते कधीच कळले नाही.” लीलावती बोलत होती. मनातील विष बाहेर निघत होते.


“पण मॅडम राजेश्वरीला का मारले?” देशमुख बोलले.


“आमचे काम झाल्यावर तिचा काय उपयोग होता? आणि असेही ती मला माझ्या डोळ्यांसमोर नकोच होती त्यामुळे ती मारणार हे नक्कीच होते. त्या दिवशी वीर फार्म हाऊस वर गेला तेव्हा थोडा नशेत होता. रात्री उशिरा ऋषभ देखील तिथे आला तेव्हा दोघांचे संभाषण राजेश्वरीने ऐकले ऋषभला देखील तिने बघितले होते. त्यामुळे त्याचं दिवशी तिला मारणे गरजेचे झाले होते. म्हणून वेळ न घालवता ऋषभने तिच्या डोक्यावर वार केला आणि ती जागीच कोसळली. राजेश्वरी पहाटे लवकर फार्महाऊस वरून निघाली, घाटात गडद धुक्यात एका ट्रकने त्यांच्या गाडीला टक्कर दिली. ज्यात ड्रायव्हर सह तिचा देखील मृत्यू झाला. सहानुभूतीला आम्ही होतोच. पण कोणाला माहीत नव्हते की, करते करविते आम्हीच आहोत.

त्याचे दोन फायदे झाले. एक तर सूड पूर्ण झाला. दुसरा म्हणजे राजेश्वरीच्या नावावर असलेली संपती ह्या विकीला मिळाली म्हणजे पर्यायाने काही हिस्सा त्याच्याकडे राहून बाकी आम्हाला मिळाला. संपत्तीचा हिस्सा मिळाल्याने त्याचे तोंड गप्प झाले. चंद्रकांत पाटील आणि त्याची ही बायको मारणार हे त्याचं दिवशी निश्चित झाले होते. राहिला तो बावळट मुलगा तर त्याला देखील रस्त्यातून बाजूला करू काम संपलं की. मग आपलेच राज्य सगळीकडे. चला आता लोकांना, पोलिसांना दाखवण्यासाठी थोडे नाटक अजून करू.” लीलावती क्रूर हसली.


लीलावतीचे बोलणे संपले तसे कपाटात लपलेले श्रीवर्धन आणि अतुल बाहेर आले. त्यांच्या पाठोपाठ पोलिस देखील होते. सगळ्या पुराव्यानिशी लीलावती, शेखर, ऋषभ, भूमी, देशमुख आणि वीरला अटक केली गेली.



इंदुमती आणि चंद्रकांत उठून उभे राहिले. रक्ताच्या बहिणीने केले कारस्थान ऐकून ते पार तुटून गेले होते. लीलावतीशी एक शब्दं देखील न बोलता त्यांनी तिला घेऊन जाण्यास सांगितले.

पोलिस त्यांना घेऊन गेले.

“थँक्यू सर. तुमच्या मदतीमुळे हे शक्य झाले. पुढे कोणत्याही केसमध्ये काही मदत लागली तर नक्की सांगा.” म्हणत एक पोलिस अधिकारी अतुलशी बोलून निघून गेला.


“अतुल माफ करा आम्हाला. तुमच्यामुळे राजेश्वरीला न्याय मिळाला इतकेच नाही तर श्रीवर्धन देखील बचावले.” इंदुमती हात जोडत बोलल्या.


“अतुल आज तुझ्यामुळे घरातले भेदी समोर आले.” श्रीवर्धनने देखील आभार मानले.

“पण पोलीस अतून कुठून आले?” इंदुमती बोलल्या.


“ह्या कपाटाच्या मागच्या बाजूला एक छोटी चोर खोली आहे. जी मी खूप आधी बनवून ठेवली होती. मागच्या दारातून आत आल्यावर एका भुयारी मार्गाने इथे येता येतं. म्हणून अतुलने मागचे दार काहीकाळ उघडे ठेवले होते. तिथेच त्यांना लपवले होते.”


“होय आई साहेब. मी ह्या खोलीत आलो तेव्हा काही कॅमेरे आणि माईक बसवले होते ज्याचे रेकॉर्डिंग आत सुरू होते आणि आतल्या लॅपटॉप वर ते दिसत देखील होते. त्यामुळे आपल्याकडे आता सगळे पुरावे आहेत.” अतुल बोलला.

“इंदुमती मी आजारी नव्हतो कधीच. त्या दिवशी अतुलने पेन ड्राईव्हवर जे काही दाखवले त्यानंतर मी आत निघून गेलो. तेव्हा रात्री माझे आणि अतुलचे फोनवर बोलणे झाले. त्याने अजून काही गोष्टी सांगितल्या आणि मी त्याच्या प्लॅनचा एक भाग झालो. प्लॅन साठी ह्याहून अधिक उत्तम जागा कोणती नव्हतीच म्हणून स्वतः ला इथे बंद करून घेण्याचे नाटक केले. खऱ्या गुन्हेगारांना समोर आणण्यासाठी डीटेक्टिव अतुलने रचलेला एक सापळा होता.” चंद्रकांत बोलले.


“डीटेक्टिव? आणि असे काय सांगितले होते त्यांनी तुम्हाला?” इंदुमती आश्चर्याने बघत होत्या.


“त्या रात्री जेव्हा मला राजेश्वरीचा फोन आला तेव्हाच मला शंका आली होती त्यामुळे मी माझी सूत्र लगेच हलवली. पण तिला ऋषभच्या वारा पासून वाचवू शकलो नाही. पण ती तेव्हा जिवंत होती हे मात्र मला माहित होते. तिची गाडी घाटात पोहोचण्या आधी तिला आणि ड्राइव्हरला गाडीतून बाहेर काढले आणि त्या जागी त्यांचे कपडे घालून दोन बॉडीज ठेवल्या. गाडी दरीत पडली त्यामुळे त्यांचे चेहरे खराब झाले होते. म्हणून राजेश्वरीची ओळख तिच्या कपड्यान वरून आणि गाडीवरून पटली.” अतुल सांगत होता.


“म्हणजे राजेश्वरी?” इंदुमतीचा आवाज कातर झाला.


“होय. आपली राजेश्वरी जिवंत आहे. इतके दिवस कोमात होती पण काल त्यांना शुद्ध आली.” चंद्रकांत बोलले.


“काय कुठे आहेत त्या?” इंदुमती बोलल्या. त्यांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती.


“माझ्या घरी. डोक्यावर जबरदस्त मार लागला होता. त्यामुळे इतकेदिवस कोमात होत्या. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मी माझ्या घरीच त्यांचा उपचार सुरू ठेवला.” अतुल बोलला.


“आणि डीटेक्टिव म्हणजे? तू तर नोकरी करतोस ना?” श्रीवर्धन अजूनही न सुटलेले कोडे सोडवत होता.

“ते फक्त लोकांना दाखवायला. पण माझे खरे काम राजेश्वरीला माहित होते, म्हणून त्यांनी कोणाला न सांगता मला फोन केला. बाकी तुम्हाला सांगितले मी सगळे.” अतुल बोलला.


“अतुल आम्हाला राजेश्वरी जवळ घेऊन जा. कशा आहेत त्या? कधी त्यांना बघते असं झालं आहे मला.” इंदुमती अधीर होत बोलल्या.


“हो चला.” अतुल सगळ्यांना घेऊन गेला.


राजेश्वरीला बघून सगळेच खुश झाले. अतुलने तिची उत्तम काळजी घेतली होती हे लक्षात येतं होते.


मागचे सगळे विसरून सगळ्यांनी नव्याने सुरुवात केली. झालेल्या घटनेतून बाहेर यायला राजेश्वरीला थोडा त्रास झाला, पण सगळ्यांच्या मदतीने ते शक्य झाले. अतुल आणि राजेश्वरी लग्नाच्या बेडीत अडकले. कायदेशीर रित्या गुन्हेगारांना शिक्षा झाली. वीरला मात्र माफीचा साक्षीदार बनवून कमीत कमी शिक्षा होईल ह्याचा प्रयत्न केला गेला.


समाप्त.


सूड प्रवृत्ती कोणताही असू शकते. त्यामुळे सावध रहा.


© वर्षाराज


🎭 Series Post

View all