अहंकार

Difference between self respect and arrogance

कवितेचे शीर्षक:अहंकार

एक अजाणशत्रू आहे माणसासं,जो ओळखता येत नाही त्यासं,

जो कारणीभूत असतो नाशास, अहंकार म्हणतात त्यास,

स्वभिमान आणि अहंकार,यात आहे एक पुसटशी रेषा,

अहंकारी माणसाला, नाही समजत माणुसकीची भाषा,

सवय असते ,स्वत:च्याच भावविश्वात जगण्याची,

नसते फिकिर, कधीही दुस-यांच्या सुखदु:खाची,

जरी समाजात असेल,तुमच्या शब्दाला मान,

नका करु लहानथोर,गरीब माणसांचा अपमान,

मातीतून आलो आणि मातीतचं मिसळणार, आहे हा निसर्गाचा नियम,

माणूस आहे आणि माणूस म्हणून जगा,आहे हा जीवनातील संयम,

शिशीर ऋतूत पानगळ लागून,श्रावणात फुटते झाडांना नवीन पालवी,

अहंकाराची आहुती देऊन,मनाच्या मंदिरात देऊ आनंदाची सावली,

अहंकार गळून जाताच्ं, मीतलं मीपणं निघून जातं,

आयुष्य जगणंं,खरंच खूप सरळ होऊन जातं,

जगताना नसते ,कुणाकडूनही अपेक्षांची झालर्ं,

म्हणून मनात नेहमी असते , आनंदाची लहर्ं.

रुपाली थोरात