जलद कथालेखन स्पर्धा माहे ऑगस्ट 2025
विषय- नात्यातील अंतर
विषय- नात्यातील अंतर
अहंकाराचा फुगा भाग -१
"वेद तुला कितीदा सांगून झाले त्यांच्या घरी जात जाऊ नको. आज तू पुन्हा गेला होतास.यानंतर जर परत गेलास तर पायाला चटके देईल." विधी वेदला तंबी देत होती.
वेद काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला. विधीही अशांत आणि वेदही अशांत.

नेहमी नेहमी रागावूनही वेद सारखा सारखा त्यांच्या घरी का जात होता? ते कोण होते? आणि विधी त्याला का मनाई करत होती? प्रश्नांची मालिका.
ही खरे तर नात्यातील अंतर वाढवणारी अहंकाराची गाठ.
'इगो' हा असा खलनायक आहे जो दोघांच्या सुखी संसारात आणि त्यातील अमृतोपम गोड अशा नात्यात विष कालवून गेला.
अहंकार रुपी विषवेलीने भक्कम अशा कुटुंब वृक्षाला वेढून टाकले.
विधी थोडा वेळ त्याच्याशी बोललीच नाही. नंतर तिने त्याला जवळ घेतले. त्याला समजावत म्हणाली," वेद, तुला कळते रे बेटा आता मी तुला तिथे जायला का मनाई करते ते.मला समजून घे. ती लोकं तुझ्या मनात विषाचं बीज पेरतील आणि आमच्या पिढीत जी नाती दुरावलीत तेच दुःख तुझ्याही वाट्याला येईल. निदान तुला ती झळ पोहचू नये म्हणून माझा हा सगळा खटाटोप.
आज तुला वडील असून देखील तू पोरका झालास. उद्या ते तुला माझ्यापासूनही दूर करण्याचा प्रयत्न करतील. तू अनाथ होशील. मला खूप भीती वाटते रे वेद.
मला समजून घे वेद ,मला समजून घे."
विधीला हुंदका आवरता आला नाही. वेदही तिच्या गळ्यात पडून रडत राहिला. पाऊस कोसळून गेल्यावर आकाश निरभ्र व्हावे तसे दोघेही शांत झाले.
वेद म्हणाला ,"आई, आज वेळ आलीच आहे तर मी तुला सत्य परिस्थिती सांगूनच टाकतो."
विधीही क्षणभर विचारात पडली. याला असं काय कळलं? कोणती सत्य परिस्थिती हा मला सांगणार आहे?
तोच वेद बोलू लागला,

"आई तुझा वाचनाचा छंद मी जाणतो कितीही व्यस्त असलीस तरी तुझं वाचन सुरूच असतं.
आणि त्यातील वेचे सुद्धा तू लिहून ठेवत असतेस.
अशातच एक दिवस तू मला म्हणाली,
"आज मी माझी जुनी डायरी विरंगुळा म्हणून वाचत बसले होते. त्यात पुलं ,वपु, बहिणाबाई ,सुरेश भट, शांताबाई आणखी बरेच जण भेटलेत. संवाद सुरू होता त्यांच्यासोबत.पण मध्येच वपूंच्या एका ओळीवर गाडी अडली ती पुढे सरकेचना.तिथेच आवर्तनं .
ते वाक्य होते ,'लग्न म्हणजे एक क्षण भाळणे आणि आयुष्यभर सांभाळणे .'खरंच दोन स्वतंत्र स्वभाव, दोन भिन्न व्यक्तीमत्वे, वेगवेगळ्या आवडीनिवडी एकत्र येऊन अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेऊन आयुष्यभर सोबत चालण्याची शपथ .
बापरे! किती कठीण. सोबत म्हणजे शय्या सोबत आणि वंशवृद्धी एवढा संकुचित अर्थ निश्चितच नाही. ते तर पशुपक्षीही करतात .मानवाला मन, बुद्धी दिली आहे निसर्गतःच . सुखाचे तर सारेच सोबती असतात पण दुःखाच्या काळात कसोटीच्या क्षणी सोबत करणे म्हणजे साहचार्य. वपु वाचता वाचता मीही विवाहाची माझी व्याख्या करून टाकली,' विवाह म्हणजे विश्वासाने (सह) वाटचालीची हमी."

आई,तुझे हे वाक्य ऐकले आणि माझे विचार चक्र सुरू झाले. असे विचार असूनही आई आणि बाबा विभक्त का?
क्रमशः
बाकी पुढील भागात.
भाग २ मध्ये वाचा.
©®शरयू महाजन
क्रमशः
बाकी पुढील भागात.
भाग २ मध्ये वाचा.
©®शरयू महाजन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा