अहंकाराचा फुगा
भाग- 2
भाग- 2
तू पुढेही बरंच काही सांगत होतीस. पण माझे लक्षच नव्हते. माझे विचार चक्र आई-बाबा विभक्त का? या प्रश्नाभोवतीच फिरत राहिले.
त्यात तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. मी आणि अंशूल शाळेतून येत होतो. आणखी दोन-तीन मित्र होते माझ्यासोबत. येताना आजी भेटली .आजी मला म्हणाली,
" वेद ,अंशुल सोबत येत जा ना एखाद्यावेळी घरी. तुला भेटून तुझ्या बाबांनाही बरे वाटेल.
त्या दिवशी आजी मला बळेच घरी घेऊन गेली. मला पाहून बाबांना केवढा आनंद झाला म्हणून सांगू माझ्याकडे शब्द नाहीत वर्णन करायला.
बाबाही म्हणाले,
" छान वाटले रे तुला भेटून, येत जा असाच."
आजी आबा तर इतके खूष होते की काय सांगू.
काकूंनीही अंशुलला आणि मला नाश्त्याची प्लेट दिली. थोडं थांबून मी निघालो.

नंतर असेच एक दोन दिवसात अंशुल सोबत मी जात राहिलो पण तुला कळू दिले नाही. माफ कर मला, पण मलाही वाटायचे आजीला भेटावं आबांना भेटावं बाबांना भेटावं. आई ,अगं मुलं शाळेत गोष्टी करतात ते त्यांच्या आई-बाबांविषयी सांगतात, आजी आजोबांविषयी सांगतात तेव्हा मलाही वाटतं की आपल्या बाबांना आजी-आजोबांना आपण भेटावं
आपणही मित्रांना आपल्या आई-बाबांच्या आजी आजोबांच्या गोष्टी सांगाव्यात.
आपणही मित्रांना आपल्या आई-बाबांच्या आजी आजोबांच्या गोष्टी सांगाव्यात.
त्या भेटीदरम्यान मला आजी कडून काही कळले, आजोबांकडून काही कळले ,काही बाबांकडून कळले. मलाही जाणून घ्यायचे होते.
आजी एकदा बोलता बोलता म्हणाली होती,
आजी एकदा बोलता बोलता म्हणाली होती,
"पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. कुठे काही थोडे जरी वादविवाद झालेत तर घरातील ज्येष्ठ व्यक्ती हस्तक्षेप करून परत परिस्थिती सुरळीत करण्यात पुढाकार घेत. आज कालानुरूप कुटुंब विभक्त झालेत. कुटुंब काय विभक्त झालेत मनेही विभक्त झालीत. कुटुंबातील व्यक्ती एकमेकांपासून दुरावलेत. पूर्वी घरासाठी वापरला जाणारा शब्द 'गोकुळ' तोही कधीच इतिहास जमा झाला.
एकत्र कुटुंबात राहताना आपोआपच संयम सहनशीलता कर्तव्य या गुणांची जोपासना व्हायची.पण आज काल माझ्या जोडीदारावर फक्त माझाच हक्क आहे माझ्याशिवाय अन्य म्हणजे आई- वडील ,बहिण -भाऊ ,मित्र आदींचाही हक्क आहे हे सारासार विसरल्या जात आहे परिणामी मग माझ्या जोडीदाराने माझेच फक्त ऐकावे, माझे सगळे म्हणणे त्याने ग्राह्य म्हणावे हा दुराग्रह वाढत गेला. छोट्या छोट्या गोष्टींना अवाजवी महत्त्व दिल्या गेलं .राईचा पर्वत व्हायला लागला .अशात माघार कोणी घ्यायची? आणि का घ्यायची? असे प्रश्न निर्माण व्हायला लागलेत.
' इगो', ' मी पणा ' हे असे खलनायक आहेत की ज्यांनी दोघांच्या सुखी संसारात आणि त्यातील अन्य अमृतोपम नात्यात विष कालवले.
मी कमावते. मी माझा पैसा माझ्या मनाप्रमाणे खर्च करेल. मला कोणी काही बोलायचं नाही. असं बोललेले एकत्र कुटुंबात राहून चालेल का?
मला एवढ्यांचं करणं जमणार नाही आपण वेगळं राहू आपल्या मनाप्रमाणे जगता येईल.

तुझ्या बाबांना मान्य नव्हतं ते. आज आई-बाबांपासून वेगळं राहायचं म्हणते. उद्या काय भरोसा माझ्यापासूनही वेगळे राहायचं म्हणेल.
वेद ,तुला आईने काय सांगितले मला माहिती नाही. मी विचारणारही नाही. पण आई-बाबांना तूच एकत्र आणू शकतोस.
अरे! आम्ही पिकली पानं, कधी गळून पडतील भरवसा नाही. तुझा बाबा एकटा पडेल रे.
इतका हसता खेळता सगळ्यांची मजा घेणारा. त्याच्या चेहऱ्यावरचं हसूच लपलं रे.
तूच एक दुवा आहेस सांधणारा.
क्रमशः
बाकी पुढील भागात वाचा .
भाग- 3 मध्ये
©®शरयू महाजन

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा