अहंकाराचा फुगा
भाग -3 अंतिम
भाग -3 अंतिम
तू जे काल म्हणालीस ना कशाला गेला होतास ?
आई, अगं बाबांना दोन दिवसापासून बरे नाही ते ऍडमिट होते दवाखान्यात .मला काल समजले. मी दवाखान्यात भेटायला गेलो. त्यांना मला काय काय सांगू असे होवून गेले. तिथे त्यांच्याशी जे माझे जे बोलणे झाले त्यातून मात्र मी पुरता हादरलो.
अगं आई, ते पूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेले आहेत गं. त्यांनाही तुझ्याशी बोलावसं वाटतं, तुझ्यासोबत राहावं असं वाटतं .
आणि आई खरं सांगू तुला पण मी कितीतरी वेळा एकांतात रडताना बघितले आहे. एक दोन वेळा मी तुला विचारले सुद्धा आहे," तुला काय झाले तू का रडते आहेस?" तर तू काही नाही म्हणत उत्तर देण्याचे टाळले.
"आई खरे सांग तुलाही बोलावेसे वाटते ना त्यांच्यासोबत ?राहावे वाटते ना त्यांच्यासोबत?"
विधीच्या डोळ्यातील अश्रूच सगळं काही बोलून गेले.
"आई, क्षमेत वादविवाद क्षणात मावळून टाकण्याची शक्ती आहे. इगो आणि अहंकाराच्या उधळलेल्या अश्वाला लगाम घालण्याची ताकद क्षमा या दोन अक्षरी शब्दात आहे. तडजोडीचे पाऊल कुणालातरी प्रथम उचलावेच लागेल नाहीतर पहिले आप...म्हणत वेळ निघून जाईल.

विधीला आपल्या चुकीची जाणीव झाली. आपला मुलगा समजदार तो आपल्याला शहाणपण शिकवतोय. आपण कसे भरकटलो?
छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवून आपण आपलाच संसार उधळला.
फायदा काय झाला? त्याचे चटके मी तर भोगतेच आहे वेदलाही ते चटके बसत आहेत आणि त्याच्या बाबांना सुद्धा.

विधीची आई विधीला प्रत्येक वेळी किती समजवायची. विधीने तिच्या आईचे पुर्वी कधीतरी आलेले पत्र परत एकदा वाचायला घेतले.
आईने लिहिले होते,
" अगं वेडे, संसार प्रत्येकच वेळी बुद्धी किंवा अहंकाराच्या तराजूत तोलता येत नाही तर तो प्रेम, जिव्हाळ्याच्या पारड्यात तोलला जातो. विश्वासाचं पासंगही जरुरी असतं.
या संसाराच्या रंगमंचावर स्त्रीला पत्नी, गृहिणी, सासू,सून, आई तर पुरुषाला पती ,पुत्र, पिता अशा सगळ्याच भूमिका जीव ओतून वठवाव्या लागतात. प्रत्येकाने एकमेकाला त्याच्या त्याच्या भूमिकेतून समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून संघर्षाची ठिणगी पडणार नाही.
समजदारीच्या जलाने ठिणगी विझवायची की अहंकाराचे तेल टाकून ठिणगीचा वणवा करायचा हे तुझे तुलाच ठरवावे लागेल.

कोण चुकतंय यापेक्षा काय चुकतंय दोघेही जण शोधून बघा. मला विचारलं नाही ,मला सांगितलं नाही, मीच का नमतं घेऊ? मीच का क्षमा मागू? यापेक्षा एकमेकांना समजून घ्या त्यामुळे एकमेकातली आपुलकी नक्कीच वाढेल.
कुटुंबाचं गणित एकमेकांना गृहीत धरून गृहीतकाने सुटत नाही तर प्रत्येकाने दोषांची वजाबाकी, गुणांची बेरीज , प्रेमाचा गुणाकार आणि अहम् चा भागाकार केला तर लवकर सुटते.
परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदला. परिस्थिती आपोआप अनुकूल होऊन जगण्याचा उत्सव होईल.

संघर्षाचे काटे दूर करा की हलकेच कौटुंबिक नात्यांचा सुगंधित सुंदर गुलाब पुष्पाचा गुच्छ हाती येईल. त्याचा दरवळ परत पूर्वीसारखं घर भारून टाकेल याची खात्री ठेव. छोट्या-छोट्या गोष्टी विसरून जायला जमलं की घर विस्कटत नाही.
तू तर शिकली सवरलेली आहेस. Stitch in time saves nine असं म्हणतात .अगं वेळीच एक टाका घाल .आज तुझ्या संसाराला तू धागा बनून जोडण्याची आवश्यकता आहे.
विधी एकदम झोपेतून जागं व्हावं तशी सजग झाली.
तिला जाणवलं आपल्या या कुटुंबरुपी गुलदस्त्यातील प्रत्येक फूल ताजं ,टवटवीत, सुगंधित व सुंदर आहे. त्याचं सौंदर्य अबाधित राहावं आणि त्याचा दरवळ सगळ्यांच्याच मनात पसरावा.
विधी वेदला म्हणाली,"चल मी पण येते बाबांना आणि आजी आजोबांना भेटायला."
वेदच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
समाप्त.
©®शरयू महाजन

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा