अहिल्या...संघर्ष मातृत्वाचा भाग 30
या कथेतून मी स्त्रीच्या जीवनातील विविध पैलू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. स्त्रीच्या जीवनात येणाऱ्या समस्या, त्यातून त्यांना होणारा त्रास, त्यांचा संघर्ष, त्यातून त्या कश्या बाहेर पडतात, काहींना यश मिळतं तर काहींना नाही, अहिल्याच्या माध्यमातून त्यांना कशी मदत होते, आणि त्यातून अहिल्याच्या जीवनाला कस नवीन वळण मिळतं हे जाणून घेण्यासाठी ही कथा नक्की वाचा.
आधीच्या भागात आपण पाहिले की,
मालतीच्या मृत्यूनंतर अहिल्याने “मालती निवास” ची स्थापना केली.
अहिल्याला मालती बद्दल खूप वाईट वाटायचं, तिच्यासाठी काहीच करू शकले नाही ही सल मनात होतीच आणि म्हणून “मालती निवास” ची स्थापना झाली.
आता पुढे,
प्रतापच्या लग्नाची तयारी सुरू झाली.
लग्नाचे कपडे खरेदी करायला अहिल्या सोबत गेली होती.
तिथे गेल्यानंतर
प्रतापची आई दुकानदाराला बोलली,
“भाऊ, नवऱ्यामुलीसाठी कपडे दाखवा.”
दुकानदाराने कपडे दाखवायला सुरुवात केली. प्रतापच्या आईने काही नऊवारी निवडल्या.
“प्रताप तुला कश्या वाटल्या नऊवारी.” प्रतापची आई
“चांगले आहे की.” प्रताप
प्रताप अहिल्याकडे बघून,
“ अहिल्या तू सांग तुला कश्या वाटल्या.”
“चांगल्या आहेत की.”अहिल्या
ती समोर काही बोलणार तर मधात दुकानदार बोलला.
“ काय करताय, अहो कुणाला विचारताय, ज्यांनी संसार केला त्यांना यातलं कळतंय, हिचा संसार तरी झालाय का हिला कळायला.
हिला यातलं काही कळणार नाही” दुकानदार फसकन बोलला.
दुकानदाराचं बोलणं ऐकून प्रतापला राग आला
“अहो असं काय बोलताय? तुम्ही तिच्याबद्दल असं कसं बोलू शकता? यानंतर तिला अस काही बोलायचं नाही.” प्रताप
“माफ करा दादा.” दुकानदार
कपड्यांची निवड झाली.
सगळे अहिल्यांच्या पसंतीने कपडे खरेदी झाले. त्यानंतर अहिल्या झाशी आणि गौराई साठी कपडे खरेदी करायला गेली. तिने दोघींसाठी छान फ्रॉक घेतले.
प्रतापची खरेदी झाली त्यानंतर सगळे घरी गेले. घरी गेल्यानंतर काही वेळातच विठ्ठलच्या पत्नीची तब्येत खराब झाली आणि काही कळायच्या आतच तिचा मृत्यू झाला. कोणाला काहीच कळलं नाही. वैद्याने तपासणी केली पण त्यालाही काही कळलं नाही. विठ्ठलला खूप मोठा धक्का बसला पण त्याने स्वतःला कसंबसं सावरलं.
दोन दिवसांनी प्रतापच लग्न झालं. नवीन सून घरात आली. प्रतापच्या आईलाही खूप बरं वाटलं कोणीतरी हाताशी आली. आता आपण एकटे नाही आपल्याला एकटीला काम करावे लागणार नाही याच विचारात ती खुश होती.
अहिल्या संस्थेत गेली, तिथे एक नवीन मुलगी दिसली.
“काय रे संजय, ही कोण? कुठून आणलं?.” अहिल्या
“ताई सकाळी मी घरून निघालो ना थोडा दूर आलो, कचऱ्याजवळ काहीतरी कुंकुं आवाज आला, बघण्यासाठी म्हणून जवळ गेलो तर तिथे ही दिसली. खूप रडत होती मला काय करावं काही कळतच नव्हतं. थोडा वेळ तिला पकडून राहिलो तर ती शांत झाली. आता तुम्हीच बघा तिचं काय करायचं.” संजय
अहिल्याने तिला जवळ घेतलं तिचा एक मुका घेतला आणि संजयला वाटीमध्ये दूध आणायला सांगितलं.
“संजय, दूध घेऊन ये हिच्यासाठी.” अहिल्या
संजय दूध घेऊन आला, अहिल्याने चमचाने तिला दूध पाजलं.
केवढीशी ही पोर, कोणी टाकलं असेल हिला? एक वर्ष झालंही नसेल मायबापांनी टाकून दिलं. कशाला जन्माला घालतात पोर काय माहिती पालन-पोषण करायचं नसतं तर. एवढ्याश्या जीवाचा काय गुन्हा? असं बाहेर कुठेही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकतात. अशा लोकांना चांगली शिक्षाच व्हायला पाहिजे.” अहिल्या
“हो ना ताई बघा ना, किती छोटी आहे ती आणि किती गोंडस. अशा नराधमांना शिक्षा व्हायलाच पाहिजे. माणसांच जाऊदे पण ती आई आईच्या मनाला काहीच वाटत नसेल. आपल्या मुलीला तस तिथे टाकून दिलं. कसे कसे लोक आहेत या जगात त्याच्या भावना मेलेल्या आहेत की काय? त्यांचे मातृत्व मेले की काय? नऊ महिने पोटात वाढवलं मरणयातना भोगून जन्म दिला, त्या मुलीला अशा कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यावं इतकी माणुसकी संपलेली आहे.” संजय
बोलता बोलता त्याचे डोळे पाणावले.
अहिल्याने दिवसभर बाकीच्या मुलांसोबत तिची काळजी घेतली आणि रात्री तिला सोबत घेऊन घरी गेली.
“ पणत्या भाऊ आले रे मी, पाणी आणतो का?” अहिल्या
“हे घे, पाणी घे. कोणाला घेऊन आलीस.?” विठ्ठल
“आज एक नवीन मुलगी आली आहे, संजय घेऊन आला हिला, वाटेत दिसली म्हणे. कोणाची पोर आहे कुणास ठाऊक. अशी कशी टाकतात मुलांना. नऊ महिने पोटात वाढवायचं मरणयातना भोगून त्यांना जन्म द्यायचा आणि मग असं टाकायचं. माणुसकी संपली.” अहिल्या
“अगदी बरोबर बोलतेस तू.” विठ्ठल
“तू पकड हिला थोडावेळ, मी पटकन स्वयंपाक बनवते.” अहिल्या
“चिंता करू नकोस, मी बनवले आहे.” विठ्ठल
“ अरे बनवलं असतं ना मी.” अहिल्या
“ का मी बनवलेलं तुला चालणार नाही.?” विट्ठल
“तसं नाही रे पणत्या भाऊ, तू दिवसभर काम करतो आणि घरी येऊन स्वयंपाक बनवायचा हे काही मला बरोबर वाटत नाही. वहिनी होती तर वहिनी बनवायची तर आता मी बनवत जाईल.” अहिल्या
“तु ही दिवसभर काम करत असतेस ना, एक दिवस मी बनवलं तर काही फरक पडत नाही जेवून घे तू.” विठ्ठल
“तू नाही जेवणार?.”अहिल्या
“मला भूक नाही.” विठ्ठल
“का? भूक का नाही? वहिनीची आठवण येते ना.” अहिल्या
“अहिल्या तू जेवून घे, मी मुलींना जेवण दिलंय. जेव आणि आराम कर.” विठ्ठल
अहिल्याने जबरदस्तीने विठ्ठलला बसवलं, दोघांनी जेवण केलं.
........................
प्रतापच्या घरी सकाळी सकाळी छान प्रसन्न वातावरण होतं. सूर्यास्ताआधी प्रतापची पत्नी उषाने उठून आंगण सडा करून आंघोळ करून छान तुळशीला पाणी घातलं. तिच्या आरतीच्या आवाजाने प्रताप आणि काकूला जाग आली. उषाने काकूला नमस्कार केला.
“सुखी राहा.” असा आशीर्वाद दिला.
उषाने छान स्वयंपाक बनवला, काकू आणि प्रतापला जेवण वाढलं.
“उषा खूप छान स्वयंपाक केलास ग आता माझी चिंता मिटली, आता मला आराम मिळणार. मला खात्री आहे बेटा सगळी कामं तू नक्की छान पध्दतीने करशील. आपलं घर छान सांभाळशील. घरच्यांची देखरेख करणे, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणे हे एका स्त्रीचं कर्तव्य असत आणि ते तू पार पाडशील.”
प्रतापची आई उषाला बोलली.
“हो मी सगळं खूप आवडीने करेल.” उषा
तिचं बोलणं सुरू असतानाच प्रताप बोलला.
“आणि तुझ्या आवडीनिवडीचा काय?.” प्रताप
“माझ्या आवडीनिवडी ? लग्नानंतर मुलीला आवडीनिवडी असतात का?.” उषा
“का? का नसतात लग्नानंतर तिच्या इच्छा नसतात का? तिला मन नसतं का? तिला भावना नसतात का? सगळ्यांच्या असतात तशा तिच्या आवडीनिवडी असतात. तू आमच्या आवडीनिवडी जपशील ना आम्ही तुमच्या आवडी-निवडी जपू. हे बघ हे तुझं सासर नाही, तुझ्या हक्काचं घर आहे आणि ही तुझी सासू नाही, तुझी हक्काची आई आहे. त्यामुळे काही लागलं केलं तर तिला हक्काने सांगायचं तुझ्या आवडीनिवडी जपण्याचा, तुझं मन जपण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू.” प्रताप
हे सगळ ऐकून खरंच उषाला बरं वाटलं तिच्या मनावरचा ताण हलका झाला. असा जोडीदार जर प्रत्येकाला मिळाला तर सासरी गेल्यानंतर त्यांच्या मनावर जो ताण असतो तो थोडा तरी कमी होईल.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा