अहिल्या संघर्ष मातृत्वाचा भाग 35
आधीच्या भागात आपण पाहिले की,
गायत्रीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अहिल्याने गोडाचा शिरा भरवून गायत्रीचं कौतुक केलं. विठ्ठल, त्याची पत्नी आणि त्यांची दोन मुले पण वाढदिवस साजरा करायला आले.वाढदिवस साजरा केल्यानंतर सगळे मंदिरात गेले.
मंदिरात गायत्रीच्या हस्ते कापड वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. पंडितजीने गायत्रीला बघितलं आणि अहिल्याला विचारलं की ही तिच मुलगी आहे ना जिला तू नेलं होतं.
“किती मोठी झाली बघ.”
पंडितजीने गायत्रीचं कौतुक केलं.अहिल्याला पण खूप अभिमान वाटला. अभिमानाने तिची छाती फुलली.
आता पुढे,
मंदिरातून सगळे घरी परतले. विठ्ठलही त्याच्या घरी गेला. आता अहिल्या, गायत्री आणि गोजिरी तिघींनी जेवण केलं आणि अहिल्या तिच्या कामाला गेली.
गायत्री समाज मंदिरात गेली तिथे ती लहान लहान मुलांना शिक्षण द्यायची. दिवसभर त्यांच्यात रमायची आणि संध्याकाळी घरी परत यायची.
आजही ती नेहमीप्रमाणे समाज मंदिरात गेली. तिथून परतत असताना तिला एक जखमी बाई दिसली. तिच्या शरीरावर खूप व्रण पडले होते आणि रक्तही निघत होतं.
गायत्री त्या बाईला हळूहळू घरी घेऊन गेली. आणि गोजिरीच्या हातून अहिल्यासाठी निरोप पाठवला. गोजिरी धावत धावत संस्थेत गेली आणि आईला सगळी घटना सांगितली.
थोड्यावेळाने अहिल्या आणि गोजिरी परत आल्या. अहिल्याने तिच्या जखमांवर लेप लावून दिला. तिला थोडं खायला दिलं. त्यानंतर ती बाई झोपली. सकाळी जाग आली तेव्हा
“मला मारू नका, मला मारू नका. मी तुमचं सगळं ऐकेन पण मला मारू नका. मला जगायचे आहे, माझ्या बाळासाठी जगायचय. मला मारू नका.”
त्या बाईची बडबड सुरू होती.
तिच्या बोलण्याचा आवाजाने अहिल्या तिच्याजवळ गेली.
“अहो ताई, तुम्ही शांत रहा. इथे तुम्ही अगदी सुरक्षित आहात. कोणी मारलं तुम्हाला? मला सांगा.
सांगा ना कोणी मारले? हे बघा घाबरू नका. कोणालाही घाबरायची गरज नाहीये. मी आहे तुमच्यासोबत तुम्ही तुमचं मन मोकळं करू शकता.” अहिल्याने तिला शांत केलं.
आता ती बोलायला लागली.
“नवऱ्याने मारलं.” तिने सांगितलं.
“काय? इतकं?”
“हो, दारू पिऊन येतो आणि मला असाच मारतो. माझी काही चूक नव्हती तरी सगळं चुकीचं खापर माझ्या डोक्यावर फोडून मोकळा झाला आणि मला जनावरासारखं मारलं. हे आजचचं नाही आहे, रोजचंच आहे. आता मला कंटाळा आला असं वाटतं कुठेतरी जाऊन आत्महत्या करावी. पण काय करणार पदरात दोन दोन पोर आहेत. मी जर हे जग सोडून गेले तर त्यांना कोण बघणार?. त्यांच्या सांभाळ कोण करणार? म्हणून सगळं सहन करते."
अहिल्याने समजावून त्या बाईला घरी पाठवलं आणि काही बायांना गोळा करून दारूबंदीसाठी मोर्चा काढला.
गावातली काही माणसे इतकी तापट होती की त्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली.
त्यातला एक दगड अहिल्याच्या डोक्याला लागला आणि तिच्या डोक्यातून रक्ताची धार निघाली. सगळ्यांनी मोर्चा थांबवून अहिल्याला आधी घरी नेलं.गायत्रीने लेप लावून दिला.
त्यानंतर काही दिवस अहिल्या शांत राहून पुन्हा हळूहळू तिने दारूबंदीसाठी महिलांच्या जमाव सुरू केला.
अहिल्याच्या विरोधात खूप माणसे उभी झाली. काही जणांनी अहिल्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण अहिल्या घाबरट मुळीच नव्हती. तिने धीराने सगळ्या प्रसंगाला तोंड दिले.
सगळ्या स्त्रिया एकत्र आल्यामुळे आता माणसांची ताकद कमी पडली आणि दारूबंदीसाठी घातलेला हा सगळा घाट यशस्वी झाला. अहिल्यामुळे गावात दारूबंदी झाली आणि संपूर्ण गाव दारूच्या व्यसनापासून मुक्त झाला. त्यांच्या या कार्यासाठी अहिल्याचा सन्मान करण्यात आला.
आता अहिल्याच्या या गावाला पाटणगावाला व्यसनमुक्त गाव असं नाव देण्यात आलं.
अहिल्याच्या पावलावर पाऊल ठेवत गायत्री पण समाजकार्यात हातभार लावायची. अहिल्या तिच्यासाठी अगदी रोल मॉडेल होती. अहिल्याच्या कार्याकडे बघूनच गायत्री लहानाची मोठी झाली. त्यामुळे तिला नेहमी अहिल्याचा खूप अभिमान वाटायचा. ती नेहमी म्हणायची मला माईसारखं बनायचं आहे. तिच्यासारखं कार्य करायचं आहे. तिला समाज कार्यात खूप आवड निर्माण झाली होती.
गावातल्या छोट्या छोट्या मुलांना ती शिक्षण द्यायची. त्यांना धार्मिक कार्य शिकवायची. अहिल्यासोबत आता सगळे गायत्रीच पण कौतुक करायला लागले होते.
गायत्री गोजिरीचा सांभाळ करून इतरही काही छोटी-मोठी कार्य करायची. तिची ही आवड बघता अहिल्याने तिला तिच्यासोबत संस्थेत न्यायला सुरुवात केली. असे छान छान दिवस सरत गेले.
एक दिवस संस्थेच्या कागदोपत्री कामासाठी अहिल्या आणि गायत्री शहराच्या ठिकाणी गेले.
तिथे गायत्रीची ओळख अजय नावाच्या मुलाशी झाली. अजय हा कार्यालयात कारकून या पदावर होता. कार्यालयाच्या कामासाठी अहिल्या नेहमी गायत्रीला शहराच्या ठिकाणी पाठवायची आणि त्यातून आता अजय आणि गायत्रीची भेट व्हायला लागली.
हळूहळू दोघात बोलणं सुरू झालं आणि काही महिन्यात दोघांमध्ये छान मैत्री झाली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा