अहो आई आणि आई भाग -२

Story about daughter-in-law and mother-in-law sharing Love, bonding, understanding in their relationship..

अहो आई आणि आई

भाग -2 (अंतिम भाग)

पहिल्या भागात आपण प्रीती च तिच्या सासू सासऱ्यांसोबतच वागणं बोलणं बघितलं.
त्यांनतर अचानक एक दिवस घरी फोन येतो आणि सरला ताईंना कळत की प्रीती चा अपघात झाला आहे हे ऐकल्यावर त्यांना भोवळ येते, यशवंतराव जवळ असतात म्हणून ते त्यांना सांभाळतात आणि फोन वर बोलतात, यशवंतराव हो म्हणून फोन ठेवतात... ते दोघं रुग्णालयात येतात. ते दोघं पण खूप घाबरलेले असतात आणि काळजीत असतात, अस अचानक फोन वरून, कारण सूरज म्हणजे त्यांचा मुलगा ऑफिस च्या कामाने बाहेरगावी गेलेला असतो, त्याला यायला अजून 8 दिवस तरी लागणार होते...,  हे ओपीडी वॉर्ड जवळ येतात तेव्हा प्रीती ला डॉक्टर तपासत असतात, ओपीडी वॉर्ड च्या बाहेर दोन माणसे उभे असतात, त्यांनी प्रीती ला रुग्णालयात आणले असते. सरला ताई त्यांच्या सोबत बोलतात, आणि त्यांचे आभार मानतात.. ते दोघं काळजी घ्या बोलून निघून जातात. डॉक्टर बाहेर आल्यावर सरला ताई विचारतात कशी आहे माझी मुलगी, फार लागलं आहे का?? काही काळजीचे कारण नाही ना....
डॉक्टर: नाही!! काळजीचे कारण नाही, थोड पायाला दुखापत झालीय, आणि हाताला फॅक्चर झालंय पण लवकरच त्या ठिक होईल....ऐकुन सरला ताई आणि यशवंतरावांची थोडी काळजी कमी होते...  डॉक्टर प्रीती ला आराम करायला सांगून निघून जातात...

सरला ताई आतमध्ये प्रीती जवळ बसतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणतात फार दुखतयं का बाळा, ठिक होईल लवकरच,  आराम कर.... कसा काय अपघात झाला बेटा, तर प्रीती सांगते की ती रस्ता ओलांडताना एका दुचाकी वाहनाने धडक दिली, माझी काहीच चूक नव्हती, सरला ताई तिला शांत हो बोलतात, आणि आराम कर असे म्हणतात...

संध्याकाळीच डॉक्टर तिला सुट्टी देतात, तिघे पण घरी येतात... सरला ताई प्रीती ला तिच्या रूम मध्ये नेतात .. आणि सांगतात आता इथून उठू नको..., काही लागलं आवाज दे... मी येईल...
आराम कर... ती ठिक आहे बोलते...त्यांची तीच्याबद्दलची काळजी बघून तीच अंतर्मन तिला खात, की अस का केलं मी...,
सरला ताई तिला हवं नको सगळ बघतात, तिची पूर्ण काळजी घेतात.. हे बघून प्रीती ला मनातल्या मनात कुठे तरी कळतं की आपली सासू इतर सासू प्रमाणे नाही, खूप प्रेमळ आणि शांत आहे...
तिला कुठे तरी तिच्या चुकीची जाणीव होते., तिला रडायला येत,  तिला वाईट वाटत की आपण या इतक्या मोठ्या मनाच्या व्यक्ती सोबत इतकं वाईट वागलो तरी त्या आपली एवढी काळजी घेत आहेत... इतकं प्रेम देत आहेत?
आठ दिवसांनंतर प्रीती ला थोड बर वाटत, तिचा पाय बरा होतो, हाताला पट्टी असतेच पण डॉक्टर म्हणाले की लवकर च बर होईल .....

एके दिवशी सायंकाळच्या वेळेस प्रीती तिच्या सासू ला आवाज देते, त्या आत येतात आणि विचारतात, काय ग, काही पाहिजे का??? काही दुखतयं का???
त्यावर प्रीती म्हणते तुम्ही बसा ना इथे, तुमच्यासोबत थोड बोलायचं आहे.
मी तुम्हाला एवढं घालून पाडून बोलले तुमचा एवढा अपमान केला तरी तुम्ही माझी किती काळजी घेत आहात, खरंच आई मला क्षमा करा, माझं चुकल, मी तुमच्याशी आणि बाबांशी अस वागायला नको होत....
मी माझ्या खूप मैत्रिणीनं कडून ऐकल होते की त्यांच्या सासू त्यांच्यासोबत कशा वागतात, त्यांना कसं टोमणे मारतात, त्यांना किती त्रास देतात, म्हणून त्यांनी सांगितलं होत की सासू ला आधीच धाकात ठेवायचं, स्वतः घराचे सगळे सूत्र आपल्या हातात घ्यायची, मग सासू ला बोलायला जागाच शिल्लक राहत नाही. आपल्या घरात आपल्याच वर्चस्व स्थापित करायचं.., त्यामुळे मी घाबरले होते,  आणि लग्नापासून आता पर्यंत  मी तुमच्या सोबत अस वागले... तुम्हाला स्वतः च्या घरातच पाहुणे म्हणून वागवलं,  पण आई तुम्ही खरचं खूप प्रेमळ आहात... तुमचा स्वभाव पण छान आहे...  मला क्षमा कारण.....आणि प्रीती खूप रडायला लागली... सरला ताईंनी तिची समजूत काढली.... तिला शांत केलं.... प्रीती ने त्यांच्या कुशीत डोक ठेवलं, आणि शांत त्यांचं ऐकत होती, त्या तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत तिला म्हणाल्या, हे बघ प्रीती, तु मला माझ्या मुलीसारखी, मी कधीही माझ्या मुलीत आणि तुझ्यात भेदभाव केला नाही, नेहमी तुम्ही आनंदात राहावं म्हणून आम्ही शांत असायचो..  शेवटी संसार हा तुमचा होता. .  आम्ही काय आज आहोत उद्या नाही...  प्रीती उठली आणि म्हणाली नाही आई तुम्ही अस नका बोलू, मी पुन्हा अस नाही वागणार, तुम्हाला त्रास नाही देणार...  मला क्षमा करा.... तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात आई, तुम्ही मला नक्की क्षमा कराल....
सरला ताई: हो ग बाळा.... मी तुला क्षमा केव्हाच केलं....  आणि हो मला आज पासून अहो आई नाही म्हणायचं हं, फक्त आई म्हण..... प्रीती  हो आई म्हणाली.. सरला ताई म्हणाल्या आज मी तुझ्या आवडीची भाजी बनवते.., त्यावर प्रीती म्हणाली नको अग आई.., असू देत.. त्यावर सरला ताई हलकेच प्रीती च्या गालावर मारत म्हणाल्या का ग? मला माझ्या मुली साठी बनवायचं आहे बनवू दे मला..., तु नको मध्ये पडू... त्या वर दोघी हसल्या आणि हसत हसत बाहेर आल्या..., .. यशवंतरावांना आधी नवलच वाटल की या दोघी सोबत ते ही हसत हसत बाहेर येतायेत, आणि ते म्हणाले की काय आज काही बदलल का?? सरला ताई म्हणाल्या हो आज मला माझी मुलगी परत मिळाली.., म्हणून मी खूप आनंदात आहे... आणि त्या किचन मध्ये गेल्या, यशवंतराव आणि प्रीती टीव्ही बघत हॉल मध्ये बसले..., सरला ताईंनी स्वयंपाक झाल्यावर दोघांना जेवायला आवाज दिला..., तिघांनी छान गप्पा मारत जेवण केले.., प्रीती हे म्हणायला विसरली नाही की आई भाजी खूप छान झालीय.. त्यावर यशवंतराव म्हणाले कुठे ग प्रीती मला तर अजिबात आवडली नाही, तुझ्या सासूची स्वयंपाकाची सवय मोडली आता...,त्यावर सरला ताई म्हणाल्या की काय हो माझ्या हातचं गोड लागत नाही ना आता, त्यावर ते हसले आणि प्रीती सुद्धा.....,आणि म्हणाले नाही अग मी गम्मत करत होतो.... आणि तिघे मग तिघे ही हसायला लागले.....

2 दिवसात सूरज काम संपवून आला, आणि घरचे आनंदी वातावरण बघून अगदीच सुखावला ..... प्रीती ने त्याला सगळ सांगितलं त्याने सुद्धा त्याच्या आई वडिलांची क्षमा मागितली आणि त्यांना नमस्कार केला..... 

आणि मग काय...? प्रीती चा खरा सुखाचा संसार सुरू झाला.... सगळे अगदी आनंदात होते.....

एका अहो आणि अग या हाकेने आयुष्य किती बदलून जात ना, आणि घरातील वातावरण सुद्धा...... मी अस म्हणत नाही की सगळ्याच सासू प्रेमळ असतात, काही असतात कडक, पण त्यामागे काहीतरी कारण ही असेलच.... कदाचित त्यांनी सुद्धा असच अनुभवले असेल जसे त्या तुमच्याशी वागतात, काही कारणं सांगता येत नाही आणि काही गोष्टी बोलून सुद्धा दाखवता येत नाही.... पण आता जग बदलले आहे... ही आजची तरुण पिढी फारच पुढे आहे, त्यांचे विचार वेगळे आहेत.... असो..... या महत्त्वाच्या विषयावर मी नंतर नक्की लेख लिहिणार आहे.....

काय मग मैत्रिणींनो...., कळला ना अहो आणि फक्त आई मधला फरक..... प्रेमाने सगळेच प्रश्न सुटतात..... गरज फक्त एवढीच असते की आपण ते कोणत्या पद्धतीने बघतोय आणि अनुभवतोय.... आणि त्यावर कशी प्रतिक्रिया देतो...

माझा स्वतः चा एक कानमंत्र आहे, तुम्हाला पटला तर बघा..... स्वतः आनंदी राहण्याचा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा.. . हवं तर तुम्ही तो माझा दृष्टिकोन म्हणा..... चालेल....
*एका कानाने ऐका, आणि एका कानाने सोडा*.... हसत रहा आणि हसवत रहा....♥️

काही चुकलं असेल तर क्षमा करा....

🎭 Series Post

View all