अहो आई आणि आई

Story about daughter-in-law and mother-in-law. How to treat our mother-in-law.

अहो आई आणि आई

सकाळच्या वेळी सरलाताई किचन मध्ये स्वतः साठी चहा करायला येतात, तेवढ्यात मागून आवाज येतो प्रीती चा, प्रीती म्हणजे सरला ताईंची सून, अहो सासूबाई तुम्ही सकाळच्या वेळेस किचन मध्ये काय लुडबुड करताय, काही लागलं तर मावशी ला सांगत जा, उगाच मध्ये मध्ये नका करत जाऊ. ते ऐकून सरला ताई बाहेर आल्या, बाहेर आल्यावर त्यांनी तिला बर म्हटल. ते ऐकून प्रीती चे सासरे लगेच सरला ताईंना म्हणाले की कशाला ग मध्ये मध्ये करते तिच्या.., उगाच आपला अपमान करून घेते, त्यावर सरला ताई म्हणाल्या नाही हो थोडा चहा प्यावासा वाटत होता म्हणून गेले, मावशी तिच्या कामात व्यस्त होती आणि आपली प्रीती सकाळी सकाळी ऑफिस च आवरत होती म्हणून म्हटल स्वतः जाऊन चहा करावा. त्यावर यशवंतराव म्हणाले नको जाऊ आता तिला जाऊ दे ऑफिस ला मग जाशील चहा करायला.. सरला ताईंचा स्वभाव खूप प्रेमळ आणि त्या प्रीती ला आपली मुलगीच समजत होत्या, पण प्रीती त्यांना सारखी घालून पाडून बोलायची.
सरला ताई आणि यशवंतराव स्वतः च्याच घरी पाहुणे म्हणून राहिले होते, जेव्हा पासून सूरज आणि प्रीती च लग्न झालं तेव्हापासून त्यांना स्वतः च्या घरात स्वतः बनवून खाण्याची पण उजागरी नव्हती. प्रीती जो स्वयंपाक मावशी ला सांगेल त्या प्रमाणे सगळ चालत होत. तरी पण प्रीती सतत आपल्या सासू सासऱ्यांचा अपमान करत असे. आणि सूरज च तर त्याच्या बायको समोर काही चालायचं च नाही.

सूरज आणि प्रीती दोघंही नोकरी करायचे. घरी सगळ्या कामाला बाई लावली होती. अगदी बागेत झाडांना पाणी देण्यापासून सगळ्या कामाला बाई होती..
एके दिवशी सरला ताई च्या मुलीचा म्हणजे अनघा चा त्यांना फोन आला, सरला ताईंनी अनघा ची विचारपूस केली, की कसे आहेत तुम्ही सगळे, जावई कसे आहेत?तर ती सांगत होती की सगळे मजेत आहोत आम्ही, आणि तुला काही सांगायचं आहे म्हणून फोन केलेला, माझ्या सासुंना वेगवेगळ्या विषयांवर लेखन करायची खूप आवड आहे, त्यांना त्यांचं पुस्तक प्रदर्शित करायचं आहे तर त्यांना माझी मदत हवी आहे, त्या वर सरला ताई म्हणाल्या कर ग त्यांची मदत, फार समजून घेतात त्या तुला. त्यावर अनघा म्हणाली हो आई अग खूप काळजी घेतात माझी, तुझी थोडी सुद्धा उणीव भासू देत नाही. माझं लग्न झालं न तेव्हा च त्यांनी मला म्हटल की मला अहो आई नाही म्हणायचं फक्त आई म्हणायचं.. अनघा ने सुद्धा आई ला विचारल, तुम्ही कसे आहात? दादा वहिनी कसे आहेत? त्यावर सरला ताई म्हणाल्या आम्ही पण मजेत.. तुझे दादा वहिनी पण मजेत आहेत.
तेवढ्यात सूरज आणि प्रीती आतमध्ये आले आणि सरला ताईंनी लगेच फोन कट केला.. प्रीती म्हणाली काय सासू बाई कोणाला काय सांगताय माझ्या विषयी, ते सरला ताई म्हणाल्या नाही ग अनघा चा फोन होता ती विचारत होती सगळ्यांची खुशाली मी म्हटल सगळे मजेत आहोत.
प्रीती : माझ्या चुगल्या केल्या की नाही मग की मी किती तुम्हाला त्रास देते, तुमचा अपमान करते, त्यावर सरला ताई म्हणाल्या नाही ग मी कशाला खोटं बोलेल, तु कुठे आम्हाला त्रास देते, तु पण मला माझ्या मुली सारखीच आहेस ग.
प्रीती: उगाच जबरदस्ती च नात मला आवडत नाही, मी तुमची सून आहे. आणि आई बाबा आहेत म्हटल माझे अजून.
सूरज: काय ग प्रीती, आताच आलीय जरा बस की थोडावेळ, कशाला उगाच आरडाओरड करतेय.
प्रीती: मी कशाला करू आरडाओरड, तुझी आईच बघ, शेजारी जाऊन सांगते की त्यांना आपण त्रास देतो, त्यांना त्यांच्या मनासारखं काहीही करून खाता येत नाही की करता येत नाही. शेजारच्या काकू मला सांगत होत्या.
सूरज: काय ग आई, अस कशाला बोलतेस तू, आम्ही तुला त्रास देतो का? काही कमी आहे का तुम्हाला??
सरला ताई: नाही रे सूरज, मी कधी तुला अस म्हटल का? मी कशाला बाहेर काही बोलणार आहे, सहजच गप्पा करत होतो आम्ही दोघी, यांचा आवाज ऐकुन यशवंतराव बाहेर आले आणि प्रीती ला म्हणाले सूनबाई अग शेजारी लोक दोन - चार गोष्टी वाढवून सांगतात त्यांच्या वर विश्वास नको ठेऊ, तर प्रीती त्यांना उलट म्हणाली तुम्ही आता यांची बाजू घेऊ नका तुम्हाला काय माहिती काय झालंय ते. त्यावर सूरज ने प्रीती ला म्हटल की जाऊ दे, लगेच प्रीती मोठ्या आवाजात म्हणाली तू आमच्यात बोलायचं नाही, मग सूरज तिला शांत करून रूम मध्ये घेऊन गेला. यशवंतराव सरला ताईंना म्हणाले की तु कशाला बाहेर कोणासोबत आपल्या घरच्या विषयी बोलतेस, तुला माहिती आहे ना प्रीतीचा स्वभाव, उगाच आपल्या घरी वादविवाद होतात. सरला ताई शांतच होत्या, त्यांनी फक्त हो म्हटल.

एके दिवशी अचानक दुपारी लांडलीने वर फोन आला, सरला ताईंनी फोन रिसिव्ह केला, फोन हॉस्पिटल मधून होता, समोरून एक व्यक्ती बोलत होती की प्रीती कारखानीस यांचा त्यांच्या ऑफिस जवळ अपघात झालाय, त्यांना जवळच सिटी रुग्णालयात भरती केलंय, तरी तुम्ही या.

अचानक काय झालंय प्रीती ला, कसा झाला अपघात??? हे सगळ आपण पुढच्या भागात बघुया...

पुढील भाग लवकरच येईल..

🎭 Series Post

View all