Login

एक रात्र मंतरलेली..भाग ५

रहस्यमय भयकथा
एक रात्र मंतरलेली ५

समोर ठेवलेल्या पत्रावळीवरचे कुंकू आणि भस्माचे टिळे लावले जात होते. मंत्रांचे जयघोष केले जात होते. राघवच्या घशाला कोरड पडली होती. मन बोलत होते पण शब्द फुटत नव्हते. काय करू आणि काय नको. अशी त्याची  अवस्था झाली होती.

आज जिवंत पणी तो त्याच्याच मरणाचा सोहळा बघत होता.

पाहुया पुढे... तो जिवंत राहतो की नाही.

तेवढ्यात अचानक ढोल‌ वाजवत काही लोक आले. त्यांचा अवतार तर वेगळाच होता ‌ झाडांची वल्कले गुंडाळून ते हातात ढोल घेऊन राघवच्या भोवताली फिरत होते. त्याच्या कानात आवाज घुमू लागला. त्याच्या डोक्यात घाव घातल्या सारखे वाटत होते.

काही क्षणातच राघवला दुधाने न्हाऊ घातले गेले. मग पाण्याने सुगंधी उटणे लावून आंघोळ घातली गेली. या सर्व प्रकारात  त्यांचे शरीर क्षीण झाले होते. त्याच्या अंगात त्राण उरले नव्हते. परत त्याला नवीन कपडे घालून तयार केले आणि टिळा लावून त्याच्या मानेवर एक धारदार तलवार ठेवली गेली. मंत्राचा उच्चार चालूच होता आणि अचानक तलवारीने त्यांचे शिर धडावेगळे केले गेले. त्याने खूप  जोरात किंकाळी फोडली. रक्ताची चिंगारी उडाली. तसा बाजुला झोपलेला साकेत उठून बसला.

त्याने बघीतले तर सकाळचे पाच साडेपाच वाजत आले होते. त्याच्या बाजुला झोपलेला राघव घामाने  अतिशय ओलांचिंब झाला होता. त्याला बघून साकेतला भिती वाटली.

त्याने ताबडतोब निखील,राज आणि विजयला फोन केला. ते चौघेही लगेच आले.

"अरे, याला कालपासून काय झाले? याला इतका कसा घाम आला. " निखिल

"हो ना, नक्कीच काहीतरी झोल झाला आहे." राज

"साकेत आधी राघवला उठवू या. त्याला जागे करू या. "

"राघव राघव, उठ. काय झाले तुला. "

साकेतने त्याच्या डोळ्यावर पाणी मारले. राघव कसाबसा जागा झाला.

"राघव उठून बसला. मी कुठे आहे ?  तो स्वतः ला बघत होता. मी जिवंत कसा आहे ? ती मुलगी कुठे आहे? ते लोक कोण होते?  ती गुहा कुठं आहे? ते जंगल..."

राघव स्वतः कडे आणि मध्येच आजुबाजुला बघत बोलू लागला.

"राघव काय झाले? कोणती मुलगी? कोणते लोक?" साकेत

"मी इथे कसा? मी तर जंगलात होतो."

"अरे, राघव. काय झाले तुला? " राज

अचानक राघव जागेवरून उठला आणि दार उघडून बाहेर गेला. बाहेर लाॅबी मध्ये शांतता होती. अजुनही पहाट व्हायची होती. त्यामुळे सगळीकडे शांतता होती. तो अजून थोडा बाहेर गेला. पायऱ्या उतरून खाली आला. तर हाॅटेलचे मेन गेट अजुनही बंदच होते.

"राघव अरे कुठे निघालास?  चौघेही त्यांच्या मागे मागे गेले.

"अरे ,राघव." साकेत

"ओ साहेब, काय गडबड आहे एवढ्या सकाळी. झोपा गुपचुप." वाॅचमन

"नाही, काही नाही. साॅरी." साकेत

सगळेजण त्याला जबरदस्तीने रुममध्ये घेऊन आले.

"राघव काय चाललंय तुझं? असा पॅनिक का होतो आहे. काही सांगाणार आहेस का?"

"नाही काही नाही  झाले. बहुतेक मी फार भयानक स्वप्न पाहिले. साॅरी सगळ्यांना. माझ्या मुळे तुमची झोपमोड झाली." राघव

"राघव जास्त स्ट्रेस घेऊ नको. कालची घटना आठवू नकोस.  तू झोप थोडावेळ. ए, तुम्ही पण  सगळे झोपा थोडावेळ. मग आपल्याला फिरायला जायचे आहे." साकेत बोलला. चौघेही निघून जातात.

"राघव काही बोलणार आहेस का?" तुला काय होतंय ते. अरे, तू जर काही सांगितले नाही. तर आम्हाला कसे कळणार. त्यावर  काहीतरी सोल्युशन काढू आपण."

पण राघव काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हता.

"राघव, बघ घाबरू नको. मला सांगू शकतो तू."

पण राघव काही न बोलता मान वळवून झोपण्याचा प्रयत्न करू लागला.

"ठीक आहे. तुला जेव्हा वाटेल तेव्हा नक्की सांग."

राघव मात्र अस्वस्थ झाला होता. त्याची झोप पुर्णपणे उडाली होती. मी खरंच कुठे गेलो होतो. माझा काही गैरसमज तर नाही होत ना. मलाच का असे अनुभव येत आहे?
मी मरणार तर नाही ना !

"अरे, राघव  किती प्रश्न पडत आहे तुला, झोप निवांत. नंतर बोलू." साकेत

साकेतला त्याची चुळबुळ जाणवत होती.

"हो, झोपतो. तू नको काळजी करू."

एवढं बोलून राघव परत विचारात दंग झाला. पण त्याची झोप पुर्णपणे उडाली होती. आपण तर जिवंत आहोत. मग ते भयानक स्वप्न तर नव्हते. की खरंच कुणीतरी आपला पाठलाग करत आहे असे त्याला वाटत होते? त्याला आपल्या मनातलं कोणाला तरी सांगावेसे वाटत होते. पण आपल्यावर कोणी विश्वास ठेवेल की नाही. त्यामुळे आपणच या गोष्टीचा छडा लावायचे ठरवले.
पाहुया पुढे.... राघव स्वतः जंगलात जातो का?
©® अश्विनी मिश्रीकोटकर


🎭 Series Post

View all