दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग -1
कोर्टात आज लग्न होणार होते.
वकीलाने पुढील नंबर हाक मारली. दोघे आतमध्ये आले. ती खाली बसली, तो उभा राहिला.
वकीलने काही कागद त्याला दिले. त्याने सही केली.
तिने पण सही केली.
तिने पण सही केली.
“तुमचे लग्न झाले आहे. आता तुम्ही दोघेही नवरा आणी बायको आहात,” वकील म्हणाला.
त्याने तिच्याकडे बघितले नाही , आणी काहीच बोलला नाही. थोडा वेळ तिथे उभा राहून, निघून गेला.
ती त्याला जाताना पाहत राहिली, पण नंतर तीही हळूहळू बाहेर गेली.
ती त्याला जाताना पाहत राहिली, पण नंतर तीही हळूहळू बाहेर गेली.
तो गाडीत बसला, एअरपोर्टकडे निघाला. त्याला दुबईला जायचे होते. त्यांच्या प्रोजेक्टसाठी तिथे त्याला काम करायचे होते. लग्न झाले होते, पण तो तिथे थांबला नाही. त्याला प्रत्यक्षात लग्न करायचे नव्हते; फक्त आजोबांसाठी त्याला करावे लागले होते.
तो म्हणजे राज रणदिवे ,अठ्ठावीस वर्षांचा, उचं, हँडसम, डॅशिंग, स्मार्ट. त्याच्या आयुष्यात फक्त एकच प्राथमिकता होती: काम कोणाकडेही त्याचे लक्ष गेले नव्हते.
---
ती तिथून हळूहळू निघून गेली.
ती कॉलेज करत होती आणि जॉबसुद्धा करत होती. दोन, तीन महिने कॉलेजचे राहिले होते, त्यानंतर आता ती घरी निघाली होती.
तिचे आजोबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. त्यांच्यासाठी तिने हे लग्न केले होते कर्तव्य आणि प्रेम समजून .
ती म्हणजे पाखी कुलकर्णी, सुंदर, गोरी पान, लांब केस, मनमिळावू आणि प्रेमळ. ती सगळ्यांना मदत करणारी, सतत चेहऱ्यावर हसरी स्माईल असलेली. तिच्या नजरेत एक हलकासा उजळलेला भाव असायचा, पण आज तिच्या मनात एक वेगळीच भावना होती, हलकी रिकामीपणा आणि प्रश्नांची कळी होती
पाखी घरात बसली होती. आजोबांना हॉस्पिटलमध्ये बघायला जावे लागेल, ती सगळं लक्षपूर्वक पाहत होती. आजोबांनी बऱ्यापैकी पैसे कमवले होते, आणि हॉस्पिटलची जबाबदारी त्यांच्यासाठी काहीशी सुलभ झाली होती.
तिच्या मनात विचारांची गोंधळ उडाला होता.
“पाखी, काय विचार करत आहेस?” राशीने विचारले. पाखीची मैत्रीण तिला भेटायला आली होती.
पाखी हळूहळू उत्तरली, “आजोबांचा विचार करत होते.”
राशीने हसत म्हटले, “अरे! आजोबांवरून आठवलं… आज तुझे लग्न झाले ना? त्यांचे काय झाले?”
पाखीने सगळं सांगितलं, लग्न केल्याचं, पण राज थोडा थंडपणे निघून गेला आणि लग्नानंतरही त्याने काहीही भावना दाखवली नाहीत.
“काय!?” राशी शॉक झाली. तिच्या चेहऱ्यावर विश्वास न ठेवणारा भाव दिसला.
क्रमश
पाखी आणी राज एकत्र येतील का? पाखी आणी राजच्या आजोबांना त्यांच्या लग्नाबदल आणी ते वेगळे राहतात. हे माहिती होईल का? .....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा