दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 2
“पाखी, तू आता काय करणार? कॉलेज आणि जॉब दोन्ही कसे मॅनेज होईल?” राशीने काळजीने विचारलं.
पाखी शांतपणे म्हणाली, “जास्त कॉलेज राहिलेलं नाही. आता एक्साम चांगल्या जायला हव्यात. तोपर्यंत छोटे-मोठे जॉबचं काम करेन. दोन्ही मॅनेज होईल. तू माझ्यासोबत आहे ना.”
राशीने तिचा हात धरला, “ठीक आहे मग… मी निघते. आपण उद्या कॉलेजला भेटू. मी तुझ्यासोबत आहे. मी दादासोबत बोलते. तो जॉब बघेल” राशी म्हणाली.
हे म्हणत ती निघून गेली.
राशीच्या दादाने मदत केली तर चांगलेच होईल, पाखी विचार करते.
राशी गेल्यावर पाखीने खोल श्वास घेतला. काही क्षण शांत बसून तिने मोबाईल हातात घेतला आणि आजोबांना कॉल लावला.
“हॅलो पाखी… आलीस का रे घरी?” आजोबांचा थोडासा कमजोर पण माया भरलेला आवाज कानावर आला.
पाखी हसून म्हणाली, “हो आजोबा… आणि लग्नही छान झालं.”
आजोबांनी समाधानाने श्वास घेतला. “छान… मला माहिती होतं माझी पाखी सगळं नीट संभाळेल. तू ठीक आहेस ना?” सखाराम होता का? आजोबा म्हणाले.
“हो आजोबा, मी एकदम ठीक आहे, फक्त राज होते, बाकी कोणी नव्हते.” ती हळू आवाजात म्हणाली.
“बरं, संध्याकाळी मला भेटायला येशील का? तुझी वाट बघतोय मी,” आजोबा म्हणाले.
“हो येते. तुम्ही औषधं वेळेवर घ्या,” पाखीने प्रेमाने सांगितले.
कॉल कट झाला, पण पाखीची मनस्थिती जरा हलकी झाल्यासारखी वाटली. तिला माहित होतं आजोबांसाठी तिने जे केलं ते बरोबर होतं… पुढे काय होईल यापेक्षा, त्यांची खुशी तिला जास्त महत्त्वाची होती. आजोबा जवळ जास्त दिवस नाही आहे. पण काय माणूस आहे? एक शब्द पण बोलला नाही. त्यांचा चेहरा पण आठवत नाही. परत भेटेल की माहिती नाही. पाखी विचार करत होती.
कॉल संपला. पाखीने हळूच मोबाईल बाजूला ठेवला. मनात शांतपणा आला, पण अजूनही काहीतरी रिकामं वाटत होतं.
ती उठली, घरात थोडंसं आवरलं, कपडे घडी करणे, किचनमध्ये दोन-चार गोष्टी लावणे, आणि खोली नीट करणं. काम करता करता तिचे विचार आजोबांकडेच फिरत होते.
“आजोबा खुश राहिले पाहिजेत… बाकीचं मी बघून घेईन,” ती स्वतःशीच म्हणाली.
सगळं आवरून पाखीने पर्स घेतली आणि घर लॉक करत हॉस्पिटलच्या दिशेने निघाली.
हॉस्पिटलची इमारत दिसू लागताच तिच्या मनात थोडी भीती आणि थोडी ओढ निर्माण झाली.
ती आजोबांच्या रूमकडे चालत गेली, प्रत्येक पावलागणिक तिच्या चेहऱ्यावरची काळजी वाढत चालली.
ती आजोबांच्या रूमकडे चालत गेली, प्रत्येक पावलागणिक तिच्या चेहऱ्यावरची काळजी वाढत चालली.
दरवाजा हलकेच ढकलून ती आत गेली.
आजोबा बेडवर बसलेले होते, डोळ्यांत माया आणि चेहऱ्यावर मंद हसू होते.
“आलीस माझी पाखी,” त्यांनी हळू आवाजात म्हटलं.
पाखी लगेच पुढे जाऊन त्यांच्या बाजूला बसली.
“कशी नाही येणार? तुम्हाला बघायला तर मी रोजच येणार आहे,” ती प्रेमाने म्हणाली.
“कशी नाही येणार? तुम्हाला बघायला तर मी रोजच येणार आहे,” ती प्रेमाने म्हणाली.
आजोबांनी तिचा हात हातात घेतला.
“तू खूप मोठं पाऊल उचललं रे… तुझ्यासाठी योग्य असेल ना?” सखाराम खूप चांगला आहे. त्यांचा नातू पण छान असेल, आजोबा म्हणाले.
“तू खूप मोठं पाऊल उचललं रे… तुझ्यासाठी योग्य असेल ना?” सखाराम खूप चांगला आहे. त्यांचा नातू पण छान असेल, आजोबा म्हणाले.
पाखीने त्यांना थोपटत उत्तर दिलं,
“तुम्ही बरे व्हा… बाकी सगळं मी सांभाळीन.”
“तुम्ही बरे व्हा… बाकी सगळं मी सांभाळीन.”
आजोबांनी डोळे मिटले, पाखीच्या शब्दांमध्ये त्यांना समाधान होतं.
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा