दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 4
दुबईत सकाळ झाली होती.
राज नेहमीप्रमाणे अलार्मच्या आधीच उठला.
खिडकीतून येणारा सूर्यकिरण, समोरची उंच इमारती, आणि शहराची धावपळ, सगळं जणू त्याच्याप्रमाणेच व्यस्त होत आहे.
त्याने पटकन शॉवर घेतला, फॉर्मल कपडे घातले आणि कॉफी मशीन सुरु केली.
कॉफीचा सुगंध खोलीत भरत होता… पण त्याचा चेहरा मात्र निर्विकार होता
कॉफीचा सुगंध खोलीत भरत होता… पण त्याचा चेहरा मात्र निर्विकार होता
टेबलावर लॅपटॉप उघडलेला होता, फाईल्स, मीटिंग टाइम्स, प्रोजेक्ट रिपोर्ट
सगळं परफेक्टली सेट होत.
सगळं परफेक्टली सेट होत.
पण तरीही, एखादा लहानसा विचार जणू त्याच्या मनात अडकून बसला होता.
तो कॉफीचा पहिला घोट घेत असताना अचानक कोर्टातील दृश्य डोळ्यासमोर आलं
पाखी टेबलाजवळ बसलेली…
शांत, साधी, सोज्वळ,
पाखी टेबलाजवळ बसलेली…
शांत, साधी, सोज्वळ,
त्याने लगेच तो विचार दूर ढकलला.
“फोकस , राज . काम महत्त्वाचं आहे. ”
“फोकस , राज . काम महत्त्वाचं आहे. ”
तो ऑफिसमध्ये पोहोचला.
स्टाफ त्याला “Good morning, sir” म्हणत होता.
तो नेहमीसारखाच कडक दिसत होता.
स्टाफ त्याला “Good morning, sir” म्हणत होता.
तो नेहमीसारखाच कडक दिसत होता.
मीटिंग्स सुरू झाल्या.
प्रोजेक्ट प्लॅन्स, बजेट, क्लायंट कॉल्स, सगळं स्मूथली चाललं होतं…
पण मन मात्र पुन्हा पुन्हा विचित्रपणे भटकत होतं.
प्रोजेक्ट प्लॅन्स, बजेट, क्लायंट कॉल्स, सगळं स्मूथली चाललं होतं…
पण मन मात्र पुन्हा पुन्हा विचित्रपणे भटकत होतं.
दुपारी जेवायला बसल्यावर त्याने नकळत फोन हातात घेतला…
काही मेसेज नाही. काही कॉल नाही. आजोबाला समजले असेल का? तो मनात म्हणाला..
काही मेसेज नाही. काही कॉल नाही. आजोबाला समजले असेल का? तो मनात म्हणाला..
फोन बाजूला ठेवून तो पुन्हा कामात गुंतला.
पण हा पहिला दिवस जरा वेगळाच होता…
पहिल्यांदाच त्याचं लक्ष 100% कामावर नव्हतं.
पण हा पहिला दिवस जरा वेगळाच होता…
पहिल्यांदाच त्याचं लक्ष 100% कामावर नव्हतं.
संध्याकाळी तो ऑफिसमधून बाहेर पडला तेव्हा शहराची लाईट्स चमकत होत्या.
पण त्याच्या मनात मात्र एक शांत, न सांगता येणारा रिकामा कोपरा तयार होत होता.
पण त्याच्या मनात मात्र एक शांत, न सांगता येणारा रिकामा कोपरा तयार होत होता.
त्याने लग्न केले… पण त्याची बायको कशी आहे? काय करते? कशी असेल?
हा विचार त्याने पहिल्यांदाच थोडा जास्त वेळ मनात ठेवला.
हा विचार त्याने पहिल्यांदाच थोडा जास्त वेळ मनात ठेवला.
आणि त्याच क्षणी त्याने स्वतःलाच आदेश दिला
“No attachments. No emotions. फक्त काम.”
“No attachments. No emotions. फक्त काम.”
पण मन ऐकणार होतं का?
---
पाखी सकाळी जागी झाली. तिने पटकन खोली आवरली, केस बांधले, अंघोळीला गेली. तिचे आवरले आणि देवाजवळ दिवा लावून शांतपणे दोन मिनिटे बसली.
त्या शांत उजेडात तिचं मन थोडं स्थिर झालं.
त्या शांत उजेडात तिचं मन थोडं स्थिर झालं.
तिने स्वतःसाठी कॉफी केली. गरम कॉफीचा कप हातात घेत खिडकीत बसून ती क्षणभर शांततेचा आस्वाद घेत होती.
"आजचा दिवस चांगला जाईल…" तिने स्वतःलाच मनात म्हटलं.
"आजचा दिवस चांगला जाईल…" तिने स्वतःलाच मनात म्हटलं.
थोड्या वेळाने ती उठली आणि आजोबांसाठी दुपारच्या जेवणाची तयारी करू लागली.
नाश्ता हॉस्पिटलमध्ये मिळत असल्याने तिने फक्त स्वादिष्ट, हलकं जेवण बनवलं.
डब्बा नीट भरून ठेवला, आणि उरलेलं अन्न स्वतःसाठी झाकून ठेवलं.
नाश्ता हॉस्पिटलमध्ये मिळत असल्याने तिने फक्त स्वादिष्ट, हलकं जेवण बनवलं.
डब्बा नीट भरून ठेवला, आणि उरलेलं अन्न स्वतःसाठी झाकून ठेवलं.
तयार होऊन ती हॉस्पिटलमध्ये पोचली.
आजोबा तिला पाहताच हसले.
आजोबा तिला पाहताच हसले.
"हे घ्या डब्बा, आणि औषधं वेळी घेत जा," ती प्रेमाने म्हणाली.
दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या. पाखीने त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून हायसं वाटलं आणि मग ती कॉलेजकडे निघाली.
दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या. पाखीने त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून हायसं वाटलं आणि मग ती कॉलेजकडे निघाली.
कॉलेजच्या गेटवर पोचताच तिला राशी दिसली.
पाखी तिच्याकडे गेली.
पाखी तिच्याकडे गेली.
"हॅलो राशी, गुड मॉर्निंग," पाखी आनंदाने म्हणाली.
"हॅलो पाखी! गुड मॉर्निंग," राशीही हसत म्हणाली.
पाखी थोडा संकोच करत विचारते,
"लेक्चर आहे का? मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं."
"लेक्चर आहे का? मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं."
राशीने पुस्तक बंद करत म्हणाली,
"हा बोल ना, काय झालं?"
"हा बोल ना, काय झालं?"
---
क्रमश
पाखीला राशीसोबत काय बोलायचे असेल?...
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा