दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 5
अजब गजब लग्न भाग - 5
राशीने हातातील पुस्तक बंद केले.
"हो बोल ना… काय झालं?" ती काळजीने पाखीकडे पाहत म्हणाली.
"हो बोल ना… काय झालं?" ती काळजीने पाखीकडे पाहत म्हणाली.
पाखी थोडा श्वास घेत शांत आवाजात म्हणाली,
"काल मी खूप टेन्शनमध्ये होते… लग्नाबद्दल. खूप प्रश्न डोक्यात होते. पण आज थोडं बरं वाटतंय. फक्त… एक गोष्ट खटकते."
"काल मी खूप टेन्शनमध्ये होते… लग्नाबद्दल. खूप प्रश्न डोक्यात होते. पण आज थोडं बरं वाटतंय. फक्त… एक गोष्ट खटकते."
"काय?" राशी पुढे सरकून विचारते.
पाखी एक क्षण थांबून म्हणाली,
"आमचे लग्न… त्यांनी माझ्याशी का केलं असेल? मला काही मजबुरी होती, पण त्यांना? त्यांनाही का स्वीकारलं? कोणीतरी त्यांना जबरदस्ती केली असेल का?… अशी भीती वाटते."
"आमचे लग्न… त्यांनी माझ्याशी का केलं असेल? मला काही मजबुरी होती, पण त्यांना? त्यांनाही का स्वीकारलं? कोणीतरी त्यांना जबरदस्ती केली असेल का?… अशी भीती वाटते."
राशी शांतपणे तिचा हात पकडते.
"पाखी, तू ओव्हरथिंकींग करते आहेस. काही वेळा परिस्थितीच माणसांना निर्णय घ्यायला लावते. आणि तू इतकी चांगली, जबाबदार आहेस… कुणीही तुला बायको म्हणून स्वीकारेल यात काही संशय नाही."
"पाखी, तू ओव्हरथिंकींग करते आहेस. काही वेळा परिस्थितीच माणसांना निर्णय घ्यायला लावते. आणि तू इतकी चांगली, जबाबदार आहेस… कुणीही तुला बायको म्हणून स्वीकारेल यात काही संशय नाही."
पाखी हलकेसे हसते.
"ह्म्म… पण माहितेय, मी कॉलेजला येते तेव्हा थोडं मन हलकं होतं."
"ह्म्म… पण माहितेय, मी कॉलेजला येते तेव्हा थोडं मन हलकं होतं."
"अगं, आणि आज तर आपल्या फेव्हरेट सरांचा लेक्चर आहे. त्यात थोडा मूडच चेंज होईल!" राशी म्हणाली.
दोघी हसल्या.
तेवढ्यात बेल वाजली.
"चल, क्लासला जाऊ या. नंतर व्यवस्थित बोलू," राशी म्हणाली.
"हो चल," पाखीने बॅग खांद्यावर घेतली.
दोघीही एकत्र क्लासकडे निघाल्या…
नवा दिवस, नवी भीती, पण सोबत एखादी चांगली मैत्रीण असेल तर सगळं हलकं वाटतं पाखीलाही तसंच वाटत होतं.
नवा दिवस, नवी भीती, पण सोबत एखादी चांगली मैत्रीण असेल तर सगळं हलकं वाटतं पाखीलाही तसंच वाटत होतं.
लेक्चर संपलं आणि दोघी कॅन्टीनमध्ये नेहमीच्या जागेवर येऊन बसल्या.
दुपारची थोडी गडबड चालू होती, पण पाखी आणि राशीच्या चेहऱ्यावर मात्र त्यांची स्वतःची शांत मैत्री उमटलेली होती.
कॉफीचा कप हातात घेत पाखी थोडं संकोचून म्हणाली,
"राशी… मला जॉब करायचा आहे.
तुझ्या दादासोबत बोलशील का?
कोणताही काम चालेल… प्लीज."
"राशी… मला जॉब करायचा आहे.
तुझ्या दादासोबत बोलशील का?
कोणताही काम चालेल… प्लीज."
राशी लगेच तिच्याकडे वळली,
"अरे पण अचानक का? कॉलेजचं एवढं कमी राहिलंय…"
"अरे पण अचानक का? कॉलेजचं एवढं कमी राहिलंय…"
पाखीने खोल श्वास घेतला.
"आजोबांना मी हॉस्पिटलमध्येच ठेवणार आहे.
घरी ते एकटे… मी त्यांना तसं सोडूच शकत नाही.
त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे, म्हणून लक्ष देणं गरजेचं.
इथल्या डॉक्टर आणि नर्सेस खूप चांगल्या आहेत… म्हणून मी निश्चिंत आहे."

राशीने तिचा हात हलकासा पकडला.
"ठिक आहे. घरी गेले की दादाशी बोलते.
पण पाखी… आता एक्साम येतायत.
जॉब आणि अभ्यास, दोन्ही कसं करशील तू?"
"ठिक आहे. घरी गेले की दादाशी बोलते.
पण पाखी… आता एक्साम येतायत.
जॉब आणि अभ्यास, दोन्ही कसं करशील तू?"
पाखी शांतपणे हसली.
"मी करेल. मला माहित आहे मी मॅनेज करू शकते.
आजोबांसाठी… आणि स्वतःसाठीही."
"मी करेल. मला माहित आहे मी मॅनेज करू शकते.
आजोबांसाठी… आणि स्वतःसाठीही."
दोघी कॉफी पीत पीत पुढचे प्लॅन्स बोलत बसल्या.
अभ्यास, हॉस्पिटल, जॉब… सगळ्यातून पाखी कशी उभी राहते?
अभ्यास, हॉस्पिटल, जॉब… सगळ्यातून पाखी कशी उभी राहते?
---
पाखी घरी आली तेव्हा दुपारची ऊन थोडी ओसरायला लागली होती. ती थकली होती, पण चेहऱ्यावरची शांतता तशीच होती.
घरी येताच तिने पटकन हात-पाय धुतले आणि टेबलावर ठेवलेलं जेवण गरम करून घेतलं.
हळूहळू, शांतपणे ती जेवत बसली. कॉलेज, हॉस्पिटल, आजोबा… सगळ्या गोष्टींचा भार तिच्या खांद्यावर होता, पण ती तक्रार करणारी मुलगी नव्हती.
हळूहळू, शांतपणे ती जेवत बसली. कॉलेज, हॉस्पिटल, आजोबा… सगळ्या गोष्टींचा भार तिच्या खांद्यावर होता, पण ती तक्रार करणारी मुलगी नव्हती.
जेवण झाल्यावर तिने थोडा वेळ फ्रेश करून स्वतःला रिलॅक्स केलं.
नंतर वही उघडून अभ्यासाला बसली.
दोन-तीन चॅप्टर्स वाचून झाले, नोट्स लिहून झाल्या… तेवढ्यात तिला वेळ आठवला.
नंतर वही उघडून अभ्यासाला बसली.
दोन-तीन चॅप्टर्स वाचून झाले, नोट्स लिहून झाल्या… तेवढ्यात तिला वेळ आठवला.
"आजोबांचं जेवण करायला हवं."
ती उठली, अॅप्रन घातला आणि किचनमध्ये गेली. शांतपणे, प्रेमाने आजोबांसाठी त्यांना आवडणारे हलके, पचायला सोपे पदार्थ बनवले. डब्बा भरताना तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच तिची स्माईल उमटली.
सगळं आवरून ती हॉस्पिटलला निघाली.
रस्त्यावरचा वारा गार होता, पण तिच्या मनात एकच विचार होता
रस्त्यावरचा वारा गार होता, पण तिच्या मनात एकच विचार होता
"आजोबा बरे झाले की… ते मला परत हसतील."
हॉस्पिटलमध्ये पोहोचून तिने डब्बा दिला, आजोबांच्या शेजारी बसली.
त्यांच्या कपाळावर हात फिरवला, दोन-चार गोष्टी बोलल्या… आणि मग शांतपणे ती घरी परतण्यासाठी बाहेर पडली.
त्यांच्या कपाळावर हात फिरवला, दोन-चार गोष्टी बोलल्या… आणि मग शांतपणे ती घरी परतण्यासाठी बाहेर पडली.
हा दिवसही पाखीने सुंदरपणे, जबाबदारीने सांभाळून नेला होता.
क्रमश
राशीचा भाऊ पाखीला काय काम मिळवून देतो?
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा