Login

अजब गजब लग्न भाग -6

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 6



रात्री पाखी हॉस्पिटलहून घरी आली तेव्हा दिवसाचा थकवा तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
घरी येताच तिने शांतपणे स्वतःला फ्रेश केलं, केस गुंडाळले आणि साधं जेवण गरम करून घेतलं.
टेबलावर बसून ती हळूहळू जेवत होती… जणू प्रत्येक घासात ती स्वतःला शांत करत होती.

जेवण झाल्यावर तीने सगळं आवरलं.
घर नेहमीप्रमाणे स्वच्छ, नीटनेटके ठेवून ती आपल्या छोट्या बेडरूममध्ये आली.

खोलीत येताच ती इकडेतिकडे फेऱ्या मारत होती.
मनात विचार ओसंडून वाहत होते…

"राशीचा भाऊ रवी… तो मदत करेल का?
जॉब मिळाला तर किती चांगलं होईल…
कॉलेज संपायला दोनच महिने.
एक्सामच्या आधी सुट्या मिळतील…
माझा अभ्यासही ठीक सुरू आहे…"

तिने खोल श्वास घेतला आणि स्वतःला शांत करत स्टडी टेबलाजवळ बसली.
पुस्तक उघडलं… पेन हातात घेतलं…
आणि पुन्हा ती तिच्या ध्येयांत गुंतली.


---

त्या बाजूला… रवीच्या घरी

राशी आणि तिचा भाऊ रवी हॉलमध्ये बसले होते.
रवी लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता, तर राशी त्याला पाणी देत म्हणाली.

"दादा… पाखीला जॉब हवा आहे.
तिने मला सांगितलं होतं तुझ्याशी बोलायला.
थोडी मदत करशील?" राशी म्हणाली.

रवीने काम थांबवलं, चेहरा वर केला.
"पाखी? तुमची कॉलेज फ्रेण्ड?
हो… काही हरकत नाही."

रवीने विचार करून म्हटलं
"उद्या तिला कॉफी शॉपमध्ये जॉब देतो.
कॅशियर किंवा सर्व्हिस  ती जे करेल ते."

राशीचा चेहरा उजळला.
"खरंच दादा? छान!
उद्या मी तिला घेऊन येते." राशी म्हणाली.

"हो… सांग तिला वेळेवर यायला,"
रवी शांतपणे म्हणाला आणि पुन्हा कामात रमला.

दोघे भाऊ–बहिण गप्पा मारत बसले…
आणि तिकडे पाखी तिच्या स्वप्नांसाठी अभ्यास करत राहिली.


---


सकाळ झाली की पाखी सर्वात आधी स्वतःला आवरते.
हलकेच केस विंचरते, चेहऱ्यावर छोटासा पावडरचा स्पर्श करते, आणि देवाजवळ दिवा लावते.

आजोबांचा डबा तयार करून ती हॉस्पिटलला पोहोचते.
कॉरिडॉरमध्ये ती शांतपणे चालत असते… रोजचीच पण तिच्यासाठी आवश्यक अशी दिनचर्या.

"गुड मॉर्निंग, पाखी."
डॉक्टर तिला पाहत म्हणतात.

"गुड मॉर्निंग, डॉक्टर. आजोबांची तब्येत कशी आहे?"
पाखीची काळजी आवाजात स्पष्ट होती.

डॉक्टर स्माईल करून म्हणाले,
"आज बऱ्यापैकी सुधारणा आहे. प्रेशर स्थिर आहे.
आणखी दोन-तीन दिवस लक्ष ठेवू… पण तुम्ही काळजी करू नका."

पाखीने शांतपणे मान हलवली.
"थँक यू, डॉक्टर."

ती मग आजोबांच्या रूममध्ये गेली.
ते तिला पाहून हलका हसू दिले.
ती त्यांच्या शेजारी बसली, हात धरून काही मिनिटे बोलली
त्यांना जेवण आवडेल का, डॉक्टरांनी काय सांगितलं, कॉलेज कसं चाललं आहे…

थोड्या वेळाने ती उठली.
"आजोबा, मी निघते. परत दुपारी येते."

आजोबांनी डोळ्यांनीच आशीर्वाद दिला.


---

कॉलेजला जाताना तिच्या फोनवर कॉल आला.

"हॅलो पाखी…"
राशीचा आवाज उत्साही होता.

पाखी हसली,
"हो राशी, सांग?"

राशी जोरात म्हणाली,
"आज कॉलेजनंतर कुठे तरी जायचंय तुला.
महत्त्वाचं आहे… मी तुला भेटेन!"

पाखी आश्चर्याने म्हणाली,
"काय झालं? कुठे?"

राशी हसतच म्हणाली,
"ये ना आधी… मग सांगते!"

पाखीला क्षणभर काहीतरी जाणवलं…
कदाचित… तिचा भाऊ मला जॉब देणार असेल का?

ती मनातच स्माईल करत कॉलेजच्या गेटकडे वळली.


---




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all