Login

अजब गजब लग्न भाग - 8

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 8



मंदिरातून बाहेर पडताना पाखीच्या मनात अपूर्व शांतता होती.
रात्रीची हलकी हवा तिच्या केसांशी खेळत होती…
तिच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आली होती.

ती रस्ता ओलांडून हळूहळू घराकडे चालत होती.
आज तिचे पाऊल जरा हलके होते…
जणू मनावरचा भार कमी झाला होता.

घरी पोहोचताच तिने दरवाजा उघडला.
घरात शांतता होती.
ती सरळ देवघरात गेली, प्रसाद ठेवला आणि धन्यवाद म्हंटले.

नंतर ती फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेली.
चेहऱ्यावर थंड पाणी मारून ती आरशात स्वतःकडे पाहते…

आज पहिल्यांदा तिला स्वतःकडे पाहून समाधान वाटलं.
एक छोटंसं हसू तिच्या ओठांवर उमटलं होते.

स्वयंपाकघरात जाऊन तिने पाण्याचा ग्लास घेतला,
आणि टेबलाजवळ बसली.

राशी, रवी, कॉफी शॉप…  जॉबची संधी…  आजोबांची तब्येत सुधारणे…  सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होते.

“देव खरंच माझ्यासाठी दारं उघडतोय आहे…”
ती हळूच पुटपुटली.

थोडं स्वतःला सावरून तिने अभ्यासाचे पुस्तक उघडले.
एकाग्रता तितकी नव्हती, पण आज तिच्या मनात विश्वास होता
सगळं नीट होणार आहे.

थोडावेळ अभ्यास करून ती आजोबांसाठी जेवण घेऊन हॉस्पिटलला जाण्याची तयारी करू लागली.


---


पाखी जेवण बनवलं, आजोबांचा डबा भरला, स्वतःचा डबा पॅक केला आणि हॉस्पिटलसाठी तयार झाली.

पाखी  हॉस्पिटलमध्ये गेली.  आजोबांच्या रूममध्ये  गेली
आधी तिनं आजोबांना जेवण भरवलं.
दोघांनी थोड्या गप्पाही मारल्या… तेव्हाच आजोबांनी हलकंसं विचारलं

“पाखी, आज तू खूप खुश दिसतेस… कॉलेजमध्ये काही खास झालं का? आणि राज फोन करतो ना? तो भेटायला आला नाही आज?” आजोबा  म्हणाले

पाखीचा क्षणभर चेहरा ताणला. ती हसली, पण ते हसू खोटं होतं…
तिला खूप खोटं बोलावं लागत होतं.

“आता कॉलेजला सुट्ट्या लागणार आहेत आजोबा…
राज रोज फोन करतात. तुमच्या तब्येतीबद्दलही विचारत होते.
त्यांना ऑफिसमध्ये खूप काम आहे… म्हणून भेटायला आले नाही.”  पाखी म्हणाली

आजोबा समाधानानं मान हलवतात.
पण पाखीच्या मनात मात्र गोष्टींचा भार वाढत असतो.
तिनं स्वतःला सावरलं… कारण आजोबांना काहीही कळायला नको होतं.

आणि तिनं निघताना हसतच म्हटलं
“ठीक आहे आजोबा, मी घरी जाते.”

त्यांचं आशीर्वाद घेऊन पाखी घराबाहेर पडली…
पण मनात मात्र एक वेगळाच ताण आणि त्यावर चढलेलं खोटं हसू  होते.
  किती दिवस  खोटं  बोलावे लागेल. ती विचार करते.




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all