दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 9
अजब गजब लग्न भाग - 9
पाखी आज खास खुशीत सगळी कामं करत होती. मनात कुठलाही ताण नव्हता, उलट एक वेगळीच उमेद होती. आज आधी कॉलेज आणि त्यानंतर कॉफी शॉपमध्ये जायचं होतं आज तिचा पहिला कामाचा दिवस होता.
तिने घर नीट आवरलं. सगळं करताना तिच्या ओठांवर हलकीशी हसू होते.
तयार होऊन ती आजोबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली. त्यांचा डब्बा दिला, स्वतःच्या हाताने जेवण वाढलं आणि थोडा वेळ त्यांच्या शेजारी बसून गप्पा मारल्या.
तयार होऊन ती आजोबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली. त्यांचा डब्बा दिला, स्वतःच्या हाताने जेवण वाढलं आणि थोडा वेळ त्यांच्या शेजारी बसून गप्पा मारल्या.
“आज खूप प्रसन्न दिसतेस,” आजोबा हसत म्हणाले.
पाखी फक्त हसली… काही न बोलता.
मनातली खुशी शब्दांत मावणारी नव्हती.
मनातली खुशी शब्दांत मावणारी नव्हती.
आजोबांचा निरोप घेऊन ती कॉलेजला निघून गेली
नव्या सुरुवातीच्या आशेने, नव्या जबाबदाऱ्यांना सामोरं जाण्यास तयार होत.
नव्या सुरुवातीच्या आशेने, नव्या जबाबदाऱ्यांना सामोरं जाण्यास तयार होत.
---
पाखी कॉलेजला पोहोचली. कॅम्पसमध्ये नेहमीचीच वर्दळ होती, पण आज पाखीला सगळं थोडंसं वेगळं वाटत होतं. ती क्लासरूमकडे जात असतानाच राशी तिला दिसली.
“अरे पाखी… आज खूपच फ्रेश आणि खुश दिसतेस!” राशी म्हणाली.
“हो ना… आज पहिला दिवस आहे ना, म्हणून जरा उत्साह आहे.” पाखी म्हणाली.
“कॉफी शॉपचा? मला माहित होतं, तुला नक्की जमणार. टेन्शन नाही वाटत का?” राशी म्हणाली.
“थोडंसं आहे… पण गरज आहे ना. आजोबांसाठी, आणि स्वतःसाठीही. काहीतरी करत असल्याचं समाधान वाटतं.” पाखी म्हणाली
“दादा खूप चांगला आहे, काळजी नको. आणि तू तर मेहनती आहेसच.” राशी म्हणाली.
“तुझ्यामुळेच शक्य झालं सगळं… खरंच थँक यू, राशी.” पाखी (हळू आवाजात) म्हणाली
“अगं दोस्तीमध्ये थँक यू नसतं. आज कॉलेज संपल्यावर सरळ कॉफी शॉपला जा. मी तुला मेसेज करेन.” राशी म्हणाली.
“हो, नक्की. आजचा दिवस लक्षात राहणार आहे.” पाखी म्हणाली.
दोघी हसल्या. लेक्चर संपलं आणि पाखीची पावलं आता नव्या दिशेने वळली.
---
कॉलेजमधून बाहेर पडताच पाखी थोडीशी घाईत होती. मनात उत्सुकता होती आणि थोडीशी भीतीही. नवं काम… नवं ठिकाण… नवी ओळख.
ती कॉफी शॉपसमोर येऊन थांबली. काचेतून आत पाहिलं. आत मऊ प्रकाश, हलकी संगीताची धून आणि कॉफीचा दरवळ दरवळत होता.
पाखीने एक दीर्घ श्वास घेतला आणि आत पाऊल टाकलं.
“यस… कम इन,” काउंटरमागून आवाज आला.
राशीचा भाऊ रवी समोर आला.
“ पाखी ?”
“ पाखी ?”
“हो,” पाखी थोडीशी संकोचत म्हणाली.
“घाबरू नकोस,” रवी हसत म्हणाला,
“आज पहिला दिवस आहे. हळूहळू सगळं शिकशील.”
“आज पहिला दिवस आहे. हळूहळू सगळं शिकशील.”
त्याने तिला एप्रन दिला.
“आधी काउंटर, ऑर्डर घ्यायची कशी, कॉफी कशी सर्व्ह करायची ते दाखवतो.”
“आधी काउंटर, ऑर्डर घ्यायची कशी, कॉफी कशी सर्व्ह करायची ते दाखवतो.”
पाखी लक्ष देऊन ऐकत होती. प्रत्येक गोष्ट मनात साठवत होती.
कॉफी मशीनचा आवाज, कपांची खणखण, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे चेहरे सगळं तिच्यासाठी नवं होतं.
कॉफी मशीनचा आवाज, कपांची खणखण, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे चेहरे सगळं तिच्यासाठी नवं होतं.
पहिली ऑर्डर आली.
“वन कॅपुचिनो, प्लीज.”
पाखीचा थोडा हात थरथरला… पण तिने स्वतःला सावरलं.
कॉफी दिल्यावर समोरच्या व्यक्तीने हसून म्हटलं,
“थँक यू.”
कॉफी दिल्यावर समोरच्या व्यक्तीने हसून म्हटलं,
“थँक यू.”
त्या दोन शब्दांनी पाखीच्या चेहऱ्यावर मोठं स्मित आलं.
आपण काहीतरी करू शकतो, याची जाणीव झाली.
आपण काहीतरी करू शकतो, याची जाणीव झाली.
रवी दूरून पाहत होता.
“छान करतेस पाखी… कॉन्फिडन्स ठेव.”
“छान करतेस पाखी… कॉन्फिडन्स ठेव.”
पाखी मनातच म्हणाली,
आजोबा, तुमच्यासाठी… आणि माझ्यासाठीही.
आजोबा, तुमच्यासाठी… आणि माझ्यासाठीही.
कॉफी शॉपमध्ये घड्याळाचे काटे पुढे सरकत होते,
आणि पाखीच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला होता.
आणि पाखीच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू झाला होता.
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा