Login

अजब गजब लग्न भाग -10

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 10


कॉफी शॉपमधली शिफ्ट संपली.
पाखीने एप्रन काढून बाजूला ठेवला. पाय थोडे दुखत होते, हातांना थकवा जाणवत होता. दिवसभर उभी राहून काम केल्यामुळे अंगावर हलकासा शीण चढला होता.

ती खुर्चीवर बसली आणि डोळे मिटले.

आजचा दिवस डोळ्यांसमोर तरळून गेला
पहिली ऑर्डर, थरथरलेले हात, कॉफीचा दरवळ, ग्राहकांचे स्मित, “थँक यू” म्हणणारे शब्द…

थकवा होता, पण त्याहून जास्त समाधान होतं.

मी करू शकले…
स्वतःच्या पायावर उभी राहिले…

रवी जवळ आला.
“खूप छान केलंस पाखी. पहिल्या दिवसासाठी परफेक्ट.”

पाखी हसली.
“थकले आहे… पण खूप बरं वाटतंय.”

“असाच थकवा माणसाला मजबूत करतो,” रवी म्हणाला.

कॉफी शॉपमधून बाहेर पडताना पाखीने आकाशाकडे पाहिलं. संध्याकाळचा मंद प्रकाश, थंड हवा…
मनात एक शांतता होती.

आज दिवसभरात तिने स्वतःसाठी काहीतरी केलं होतं.
कोणासाठी नव्हे स्वतःच्या आत्मसन्मानासाठी.
ती मनातच म्हणाली,
आजोबा, मी मजबूत होत आहे… हळूहळू, पण नक्की.

पाखी पावलं उचलत घरी निघाली
थकलेल्या शरीराने, पण समाधानी मनाने…


---


पाखी थकलेल्या पावलांनी घरी आली. दरवाजा उघडताच घरातली शांतता तिला कवेत घेत होती. बॅग बाजूला ठेवली, हातपाय धुतले आणि थोडा वेळ सोफ्यावर बसली. शरीर थकलं होतं, पण मन समाधानाने भरलेलं होतं.

तिने घड्याळाकडे पाहिलं.
आजोबांकडे जायचंच आहे…

थोडा फ्रेश होऊन पाखी पुन्हा बाहेर पडली. हातात आजोबांसाठी घेतलेलं छोटंसं फळांचं पॅकेट होतं. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर नेहमीसारखीच औषधांचा वास आणि शांतता होती.

ती हळूच आजोबांच्या खोलीत शिरली.

“आजोबा…” पाखी हळू आवाजात म्हणाली.

आजोबांनी तिच्याकडे पाहिलं आणि लगेच हसले.
“आलीस? आज उशीर झाला वाटतं.”

पाखी त्यांच्या शेजारी बसली.
“हो… आज जरा जास्त अभ्यास होता.”

“थकलेली दिसतेस,” आजोबा म्हणाले.

“थकले आहे… पण छान थकवा आहे. कॉलेजमध्ये उभी होती.” पाखी खोटं म्हणाली..

आजोबांनी तिचा हात हातात घेतला.
“मेहनतीचं फळ नक्की मिळतं, बाळा. तुझ्या चेहऱ्यावरच दिसतंय.”

त्या शब्दांनी पाखीचे डोळे पाणावले.
ती काही क्षण शांत बसली. त्या शांततेत एक वेगळंच समाधान होतं.

थोडा वेळ आजोबांजवळ बसून, त्यांना बरं वाटतंय याची खात्री करून पाखी उठली.

“उद्या पुन्हा येईन,” ती म्हणाली.

“जा… काळजी घे,” आजोबा हळूच म्हणाले.

पाखी बाहेर पडली
मन हलकं झालेलं,
आणि स्वतःवरचा विश्वास आणखी मजबूत झालेला…


---




क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all