Login

अजब गजब लग्न भाग -11

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
अजब गजब लग्न भाग -11



राज सलग मीटिंग्स अटेंड करत होता. एक मीटिंग संपली की लगेच दुसरी. वेळ कसा जात होता, त्यालाच कळत नव्हतं. आजोबांना कॉल करायचा विचार मनात येऊन गेला, पण वेळच मिळाला नाही.

तिकडे सगळं नीट चालू होतं. प्रोजेक्ट्स ट्रॅकवर होते, क्लायंट समाधानी होते. राज पूर्णपणे कामात गुंतलेला होता.

ऑफिसमध्ये अनेक मुली त्याच्याकडे पाहून हसत होत्या. त्याच्या एका स्माइलवरच त्या फिदा होत.
पण राजचं लक्ष कुणाकडेही नव्हतं.

त्याला फक्त काम महत्त्वाचं होतं.
भावना, नाती, माणसं  सगळं त्याच्यासाठी दुय्यम होतं.

तो पुन्हा फाइल्सकडे वळला.
कारण राज रणदिवेसाठी काम म्हणजेच सगळं होतं.


---

रात्र झाली होती.
दुबईच्या उंच इमारतींच्या काचांवरून शहराचे दिवे चमकत होते. राज आपल्या हॉटेलच्या खोलीत एकटाच उभा होता. खिडकीबाहेर नजर लावून तो शहराकडे पाहत राहिला.

दिवसभर मीटिंग्स, कॉल्स, फाइल्स…
आता सगळं शांत झालं होतं.

तो बेडवर बसला. मोबाईल हातात घेतला. अनेक नोटिफिकेशन्स होती  कामाच्या.
तो स्क्रीन स्क्रोल करत राहिला…

राजने फोन लॉक केला.

ती मुलगी आता काय करत असेल?, आजोबा मला तिच्याबदल विचारतील का? पण हे लग्न नव्हतंच माझ्यासाठी, तो स्वतःलाच म्हणाला.
तीही तिच्या आयुष्यात खुश असेल…

पण खोलीतली शांतता त्याला अस्वस्थ करत होती.
इतक्या मोठ्या शहरात, एवढ्या उंच मजल्यावर…
तो पूर्णपणे एकटा होता.

राजने लाईट बंद केली.
डोळे मिटले, पण झोप येईना.

पहिल्यांदाच त्याला जाणवलं कामाने भरलेलं आयुष्य असलं, तरीही कुठेतरी एक पोकळी आहे…

आणि त्या पोकळीचं नाव तो उच्चारू शकत नव्हता,
पण मनाला कळलं होतं…


---

राज पूर्णपणे कामात बुडून गेला होता.
मीटिंगमागोमाग मीटिंग, कॉल्स, प्रेझेंटेशन्स… दिवस कधी उजाडत होता आणि कधी मावळत होता, त्यालाच कळत नव्हतं.

इतका गुंतला होता की
आपलं लग्न झालं आहे,
हेसुद्धा तो विसरून गेला होता.

नातं, जबाबदारी, माणसं…
सगळं बाजूला पडलेलं.

राजसाठी एकच गोष्ट महत्त्वाची होती  काम.

हातात फाइल, डोक्यात आकडे, डोळ्यांसमोर टार्गेट्स.
कोर्टातला तो क्षण, सही केलेले कागद, ती शांत बसलेली मुलगी
हे सगळं जणू त्याच्या आयुष्यात घडलंच नव्हतं.

तो थकून रात्री उशिरा खोलीत येत असे,
पुन्हा सकाळी लवकर निघून जाई.

दुबईत तो यशस्वी होता…
पण आतून रिकामा होत होता.

आणि त्याला हेही कळत नव्हतं
ज्याला तो विसरतोय,
ती कुठेतरी त्याच्याच नावाचं नातं जपून ठेवते आहे…


---



क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all