अजब गजब लग्न भाग -12
राज एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बसला होता. समोर क्लायंट्स, स्क्रीनवर प्रेझेंटेशन चालू होतं. अचानक त्याचा फोन व्हायब्रेट झाला.
त्याने नजर टाकली.
आजोबा…
क्षणभर त्याचा हात थांबला.
मीटिंग महत्त्वाची होती… पण हा कॉल दुर्लक्षित करता येणार नव्हता.
मीटिंग महत्त्वाची होती… पण हा कॉल दुर्लक्षित करता येणार नव्हता.
“एक्सक्यूज मी,” असं म्हणत तो बाहेर आला आणि कॉल रिसीव्ह केला.
“राज…” आजोबांचा थोडा कमजोर आवाज कानावर पडला.
“आजोबा, सॉरी… खूप बिझी होतो,” राज म्हणाला.
“माहित आहे बाळा,” आजोबा शांतपणे म्हणाले,
“काम महत्त्वाचं आहे. पण माणसांनाही वेळ द्यावा लागतो.”
“काम महत्त्वाचं आहे. पण माणसांनाही वेळ द्यावा लागतो.”
राज गप्प झाला.
“ त्या मुलीचा विचार कर, तिला एकटीला सोडून तू असा कसा निघून गेला.” आजोबा म्हणाले.
राजच्या मनात काहीतरी हललं.
तो काही बोलणार इतक्यात
तो काही बोलणार इतक्यात
“तू तिला कधी फोन केलास का?” आजोबांनी विचारलं.
राज थांबला.
काय उत्तर द्यावं, त्यालाच कळेना.
काय उत्तर द्यावं, त्यालाच कळेना.
“लग्न जबरदस्तीचं असलं तरी नातं दुर्लक्षित करू नकोस,”
आजोबांचा आवाज जरा गंभीर झाला.
आजोबांचा आवाज जरा गंभीर झाला.
“मी… बघतो आजोबा,” राज हळू आवाजात म्हणाला.
“ठीक आहे. काळजी घे,”
कॉल कट झाला.
कॉल कट झाला.
राज फोन हातात धरून उभा राहिला.
पहिल्यांदाच त्याला जाणवलं
पहिल्यांदाच त्याला जाणवलं
आपण कुठेतरी चुकतोय…
मीटिंग अजूनही चालू होती,
पण राजचं मन मात्र तिकडे राहिलंच नव्हतं.
पण राजचं मन मात्र तिकडे राहिलंच नव्हतं.
मला काम लवकर संपवावे लागेल. तो मनात विचार करतो.
---
पाखी आयुष्याची सगळी जबाबदारी एकटीने सांभाळत होती.
कॉलेज, कॉफी शॉपची नोकरी, आजोबांना भेटायला जाणं आणि अभ्यास, सगळं ती नीट मॅनेज करत होती. आता कॉलेजला सुट्या लागल्या होत्या आणि पंधरा आणी वीस दिवसांनी परीक्षा होणार होती.
कॉफी शॉपमध्ये पाखी मन लावून काम करत होती. ग्राहकांशी बोलणं, ऑर्डर घेणं, कॉफी सर्व्ह करणं सगळं ती आनंदाने करत होती.
रवी तिच्याकडे अनेकदा लक्ष देऊन पाहायचा. इतकी धावपळ असूनही पाखी कधी तक्रार करत नव्हती. तिची मेहनत, तिचा संयम… हळूहळू रवीला ती आवडायला लागली होती.
रवी तिच्याकडे अनेकदा लक्ष देऊन पाहायचा. इतकी धावपळ असूनही पाखी कधी तक्रार करत नव्हती. तिची मेहनत, तिचा संयम… हळूहळू रवीला ती आवडायला लागली होती.
रवी स्वतः कॉफी शॉप आणि ऑफिस दोन्ही सांभाळत होता. कामाच्या गडबडीतही पाखीसोबत थोडंफार बोलायचा. कधी एखादी गंमत, कधी साधीशी चौकशी करायचा.
पाखी नेहमी काहीतरी छान, सकारात्मक बोलायची.
तिच्या शब्दांत थकवा नव्हता, उलट एक वेगळीच उमेद होती.
तिच्या शब्दांत थकवा नव्हता, उलट एक वेगळीच उमेद होती.
रवी बोलायचा…
आणि पाखी शांतपणे सगळं ऐकून घ्यायची.
आणि पाखी शांतपणे सगळं ऐकून घ्यायची.
त्या दोघांमध्ये नकळत एक ओळखीची, समजुतीची नाळ तयार होत होती. त्यांच्यामध्ये छान मैत्री होत होती.
---
क्रमश
रविला पाखीच्या लग्नाचे समजेल का?....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा