Login

अजब गजब लग्न भाग -14

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न  भाग - 14


पाखीची परीक्षा संपली होती.
कॉलेजचा एक टप्पा पूर्ण झाला होता. आता आयुष्याच्या पुढच्या वळणाकडे तिला पाहायचं होतं.

ती थेट कॉफी शॉपमध्ये रवीला भेटायला आली.

“रवी सर… येऊ का?” पाखीने हलक्या आवाजात विचारलं.

रवीने मान वर करून पाहिलं.
“ये ना पाखी… काय काम काढलंस?” तो म्हणाला.

पाखी थोडी संकोचत म्हणाली,
“आता परीक्षा संपली आहे. मी फुल टाइम येत जाईन. निकाल लागेपर्यंत इथेच काम करेन… नंतर दुसरा जॉब बघेन.”

रवी क्षणभर गप्प झाला.
तो फक्त पाखीकडे पाहत राहिला.

आता ती रोज समोर असेल… तिला न पाहणं शक्य होणार नाही… हा विचार त्याच्या मनात येऊन गेला.

पण तो बाहेरून शांत दिसत होता.

“ठीक आहे,” तो म्हणाला,
“माझा एक मित्र आहे. तो लवकरच येणार आहे. त्याच्याशी बोलून बघूया. तुझ्यासाठी योग्य काय ते ठरवू.”

पाखीच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान आलं.
“ठीक आहे… धन्यवाद,” ती म्हणाली.

रवी तिच्याकडे पाहत राहिला.
ती निघून गेल्यावरही त्याची नजर दाराकडेच अडकून राहिली.

कधी आणि कसं… माझ्या मनात जागा करून गेलीस, पाखी… हे त्यालाच कळत नव्हतं.


---



राशी आज कॉफी शॉपमध्ये रवीला मदत करायला आली होती.
ती काउंटरजवळ उभी होती, पण तिची नजर वारंवार रवीकडे जात होती.

रवी… नकळत पाखीकडे पाहत होता.
ती कुठे उभी आहे, काय करते आहे  हे सगळं त्याचं लक्ष तिकडेच होतं.

राशीच्या लक्षात आलं.

दादाला पाखी आवडतेय का?
आता हे लपवून चालणार नाही…
असं म्हणत राशी थेट रवीजवळ गेली.

“दादा…” ती थोडी थांबली,
“तुला पाखी आवडते का?” तिने सरळ विचारून घेतलं.

रवी क्षणभर गप्प झाला. तिच्याकडे पाहत राहिला.

काही क्षण शांतता होती.

मग हळू आवाजात तो म्हणाला,
“हो… मला पाखी आवडते.”

राशीचा श्वास थोडा अडखळला.

“दादा… पाखीचं लग्न झालं आहे,” ती गंभीरपणे म्हणाली.

हे ऐकताच रवीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
तो खुर्चीवर बसला. हात डोक्यावर गेला.

“लग्न…?”
“कधी? कसं? तिने कधी सांगितलंच नाही…”
तो गोंधळून गेला.

म्हणजे मी ज्या मुलीला मनात जागा दिली…
ती आधीच कुणाची तरी आहे…

रवी काहीच बोलत नव्हता.
फक्त विचार करत बसला होता.

राशी हळूच म्हणाली,
“ती परिस्थितीमुळे लग्न केलं आहे दादा… आजोबांसाठी.
पण ती खूप चांगली मुलगी आहे. तिला त्रास नको.”

रवीने मान हलवली.

“मी तिला कधीच त्रास देणार नाही,” तो शांतपणे म्हणाला.
“पण हे समजून घ्यायला मला थोडा वेळ लागेल…”

त्या क्षणी रवीला जाणवलं
काही नाती मनात तयार होतात…
पण आयुष्य त्यांना नाव द्यायला परवानगी देत नाही.


---



क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all