Login

अजब गजब लग्न भाग - 16

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न  भाग -16



पाखी मन लावून कॉफी शॉपमध्ये काम करत होती.
प्रत्येक कप, प्रत्येक ऑर्डर तिच्या लक्षात होता.
पण मनात सतत एकच विचार चालत होता  निकाल कधी लागेल?

आजोबांना भेटायला तिला वेळच मिळत नव्हता.
सकाळी उठायचं, नाश्ता, जेवण, डब्बा बनवून देणं, हॉस्पिटलमध्ये भेटणं
आणि मग संध्याकाळी शॉपमध्ये काम.

पैसे येत होते, पण मन शांत नव्हतं.
निकाल लागेल तर… मी चांगल्या कंपनीत जॉब करू शकेन.
ह्या विचारात ती स्वतःला ढसडत होती.

तिला जाणवत होतं की मेहनत फळ देणार आहे,
पण प्रतीक्षा ही अवघड होती.
सगळं व्यवस्थित होईल,
पण थोडं धैर्य हवं…

तिच्या डोळ्यांत हलकी आशेची चमक होती,
आणि हात मात्र कामावर गतीने हलत होता.

तिच्या चेहऱ्यावर हलकं स्माईल आले होतं
आजचा दिवस पार पडेल, आणि उद्याचा दिवस नक्की उजळेल…


---

पाखीचा निकाल लागला होता.
ती छान मार्क्सने पास झाली होती.
तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही केल्या कमी होत नव्हता.
डोळ्यांत समाधान, ओठांवर सतत हसू होते… आज तिचा दिवस होता.

हा आनंद सगळ्यात आधी कुणाला सांगायचा तर आजोबांना.
ती थेट हॉस्पिटलमध्ये आजोबांना भेटायला गेली.

“आजोबा… मी पास झाले!”
हे ऐकताच आजोबांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलला.

“माझी पाखी हुशार आहेच,”
म्हणत त्यांनी तिचा हात घट्ट धरला.

क्षणभर थांबून आजोबा म्हणाले,
“पाखी… राजला सांगितलंस का? तो खूप खुश होईल.”

हे ऐकताच पाखीचा चेहरा उतरला.
तिच्या डोळ्यांतली चमक क्षणात विझली.

आजोबांनी ते लगेच ओळखलं.
“पाखी… तुझं आणि राजचं भांडण झालंय का?”

पाखीने मान खाली घातली.
थोडा वेळ शांत राहिली…
आणि मग हळूच म्हणाली,

“आजोबा… आजपर्यंत मी तुमच्याशी खोटं बोलत आले.
पण आता मला सगळं सांगायचं आहे.”

आजोबा नुसते तिच्याकडे पाहत राहिले.

पाखी बोलू लागली…
“लग्न झालं, तेव्हाच ते तिथून निघून गेले.
मी त्यांना नीट पाहिलंसुद्धा नाही.
मला वाटतं त्यांनी पण मला पाहिलं नसणार.
फक्त सह्या झाल्या… आणि ते गेले.”

तिचा आवाज थरथरत होता.

“मला त्यांचं घर माहिती नाही,
त्यांचं कोण आहे हेही माहिती नाही.
मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता म्हणून काहीच सांगितलं नाही.
आता दोन–तीन महिने झाले…
आता ते समोर आले तरी आम्ही एकमेकांना ओळखू की नाही,
मला तेही माहीत नाही.”

क्षणभर शांतता पसरली.

आजोबा हळूच म्हणाले,
“मी त्यांच्या आजोबांना कॉल करतो.”

पाखी लगेच म्हणाली,
“ते नंतर करूया. आधी पेढा खा.
आता मी जॉब करणार आहे.”

आजोबांनी हसत पेढा घेतला.
पाखीला स्वतःच्या हाताने खाऊ घातला.

त्या दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या.
त्या क्षणी हॉस्पिटलची खोली जरी लहान होती,
तरी तिथे मायेचा, विश्वासाचा आणि नव्या सुरुवातीचा गोड सुगंध भरून राहिला होता…


---



क्रमश

पाखी रविला निकालचे सांगेल का? नवीन जॉब शोधण्यात रवी पाखीला मदत करेल का,? .....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all