Login

अजब गजब लग्न भाग - 20

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 20




राज फ्रेश होऊन बाहेर आला.

हॉलमध्ये आजोबा सोफ्यावर बसले होते. समोर टेबलवर गरम चहा ठेवलेला होता.

राज शांतपणे त्यांच्या समोर जाऊन बसला.

“प्रवास कसा झाला?”
आजोबा हळू आवाजात विचारतात.

“ठीक होता आजोबा,”
राज म्हणाला,
“काम पूर्ण झालं… मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला.”

आजोबांनी हलकीशी मान हलवली.
“मला माहिती होतं… तू काहीतरी करूनच येणार.”

थोडा वेळ शांतता पसरली.

राजच्या मनात बरेच शब्द होते,
पण ओठांपर्यंत काहीच येत नव्हतं.

“राज…”
आजोबा बोलायला लागले,
“कामात तू खूप पुढे गेला आहेस,
पण नात्यांपासून दूर जातोयस… हे मला खूप बोचत होतं.”

राज खाली पाहू लागला.

“मला राग होता तुझ्यावर,” आजोबा पुढे म्हणाले,
“लग्नाच्या दिवशी तू तिथून निघून गेलास…
एक शब्दही न बोलता.” तिला कसे वाटले असेल?, मी माझ्या मित्राला काय सांगू? आजोबा म्हणाले.

राजचा श्वास जड झाला.

“आजोबा… मला ते लग्न नको होतं,” तो शांतपणे म्हणाला,
“मी तयार नव्हतो… मला वाटलं तुम्ही मला समजून घ्याल.”

“मी समजलो असतो,” आजोबा म्हणाले,
“पण तू पळून गेलास, राज… जबाबदारीपासून.”

राजच्या डोळ्यांत पाणी तरळलं.

“मी चुकलो,” तो मान खाली घालून म्हणाला,
“पण त्या मुलीचं काय? तिचा दोष काय होता?”
आजोबा काही क्षण गप्प राहिले.

“ती खूप समजूतदार आहे,” ते म्हणाले,
“तिने आजपर्यंत
तुझ्याबद्दल एकही तक्रार केली नाही.”

राज दचकला.

“तिला… सगळं माहीत आहे?”
तो विचारतो.

“हो,”
आजोबा म्हणाले,
“आणि तरीही
ती तिचं आयुष्य नीट सांभाळते आहे.”

राजच्या मनात अचानक
एक रिकामी जागा भरून आली.

“आजोबा…”
तो हळू आवाजात म्हणाला,
“मला तिचं नाव हवं आहे…
मला तिला शोधायचं आहे.”

आजोबांच्या डोळ्यांत चमक आली.

“तुला खात्री आहे?”
ते विचारतात.

“हो,”
राज ठामपणे म्हणाला,
“या वेळी
मी पळणार नाही.”

आजोबा हसले
समाधानाने.

“तिचं नाव पाखी आहे,”
ते म्हणाले,
“पाखी कुलकर्णी.”

राजच्या ओठांवर
पहिल्यांदाच हळूशी स्माईल उमटली.

“उद्या,” आजोबा म्हणाले,
“तू तिला भेटशील.”

आणि त्या एका वाक्याने
राजचं आयुष्य वेगळी वळण घेणार होतं…




क्रमश


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all