दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 21
अजब गजब लग्न भाग - 21
रवी आज खूप खुश होता.
सकाळपासूनच त्याच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक होती.
आज त्याचा जिवलग मित्र भारतात येणार होता ज्याची तो खूप दिवसांपासून वाट पाहत होता.
आज त्याचा जिवलग मित्र भारतात येणार होता ज्याची तो खूप दिवसांपासून वाट पाहत होता.
“आज तर पार्टी ठरलीच,” रवी स्वतःशीच हसत म्हणाला.
कॉफी शॉपमध्ये काम करता नाही
त्याचं लक्ष सारखं मोबाईलकडे जात होतं. घड्याळाकडे पाहत
“आता पोहोचला असेल,” असा विचार तो करत होता.
त्याचं लक्ष सारखं मोबाईलकडे जात होतं. घड्याळाकडे पाहत
“आता पोहोचला असेल,” असा विचार तो करत होता.
हा तोच मित्र होता ज्याच्यासोबत रवीने अनेक स्वप्नं पाहिली होती,
ज्याच्यासोबत त्याने काम, संघर्ष, यश सगळं शेअर केलं होतं.
ज्याच्यासोबत त्याने काम, संघर्ष, यश सगळं शेअर केलं होतं.
आज त्याच्या येण्याने, रवीला पुन्हा एकदा जुन्या दिवसांची आठवण येत होती.
कॉफी शॉपमधला गोंगाट,
ग्राहकांची ये-जा, कामाचा थकवा, सगळं असूनही
रवीचा उत्साह कमी होत नव्हता.
ग्राहकांची ये-जा, कामाचा थकवा, सगळं असूनही
रवीचा उत्साह कमी होत नव्हता.
आजचा दिवस त्याच्यासाठी खास होता…
कारण आज फक्त मित्र येत नव्हता,
तर त्याच्यासोबत , पुढच्या घडामोडींची
सुरुवातही होणार होती…
तर त्याच्यासोबत , पुढच्या घडामोडींची
सुरुवातही होणार होती…
---
रवीने बाजूला जाऊन मोबाईल कानाला लावला. मित्राशी थोडावेळ गप्पा झाल्या कधी भेटायचं, कुठे भेटायचं,
सगळं ठरवून घेतलं.
सगळं ठरवून घेतलं.
“ठीक आहे… भेटू लवकर,” असं म्हणत त्याने कॉल कट केला.
तो मागे वळून पाहतो, तर समोर पाखी काम करत होती.
रवीची नजर नकळत पाखीकडे थांबली.
तेवढ्यात पाखीचं लक्ष गेलं. तिला वाटलं, रविला काहीतरी बोलायचं आहे.
ती रत्याच्याजवळ आली.
“काही बोलायचं होतं का?” ती हसत म्हणाली,
“आज खूप खुश दिसताय.”
“आज खूप खुश दिसताय.”
“हो,”
रवी थोडासा उत्साही आवाजात म्हणाला, “माझा मित्र भारतात आला आहे.”
रवी थोडासा उत्साही आवाजात म्हणाला, “माझा मित्र भारतात आला आहे.”
“अरे व्वा!” पाखीच्या चेहऱ्यावरही आनंद उमटला.
“मी त्याच्यासोबत बोलतो,” रवी पुढे म्हणाला,
“आपण त्याच्या ऑफिसमध्ये जाऊ. तुझ्या जॉबसाठी.”
“आपण त्याच्या ऑफिसमध्ये जाऊ. तुझ्या जॉबसाठी.”
“हे तर खूप छान आहे,” पाखी लगेच म्हणाली,
“थँक यू… खरंच.”
“थँक यू… खरंच.”
दोघेही काही क्षण उभे राहून बोलत होते.
पाखीच्या डोळ्यांत आशा होती, रवीच्या मनात मात्र काहीतरी न सांगितलेली हळवी भावना…
कॉफी शॉपमध्ये काम सुरू होतंच,
पण या दोघांच्या आयुष्यात काहीतरी नवीन
आकार घ्यायला लागलं होतं…
पण या दोघांच्या आयुष्यात काहीतरी नवीन
आकार घ्यायला लागलं होतं…
---
कॉफी शॉपच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली.
रवी खिडकीतून बाहेर पाहताच त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल उमटली.
“आलास शेवटी!” तो बाहेर जात म्हणाला.
गाडीतून राज उतरला.
डॅशिंग लूक, कॉन्फिडन्स , पण डोळ्यांत हलकासा थकवा
आणि आत कुठेतरी दडलेली शांतता.
आणि आत कुठेतरी दडलेली शांतता.
“अरे रवी!” राज पुढे येत म्हणाला.
दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात.
“किती दिवसांनी भेटतोय आपण,” रवी हसत म्हणाला.
“कामात अडकलो होतो,” राज थोडं हसून म्हणाला, “पण भारतात पाऊल टाकताच पहिला फोन तुलाच केला.”
दोघे आत कॉफी शॉपमध्ये आले.
“हे माझं छोटंसं विश्व,”
रवी आजूबाजूला दाखवत म्हणाला, “कॉफी, ऑफिस आणि माणसं सगळं इथंच.”
रवी आजूबाजूला दाखवत म्हणाला, “कॉफी, ऑफिस आणि माणसं सगळं इथंच.”
राजने सगळं न्याहाळलं, “छान आहे,” तो मनापासून म्हणाला.
दोघे समोरासमोर बसले.
“आणि सांग,” रवी थोडा गंभीर होत म्हणाला,
“तुझं दुबईचं काम पूर्ण झालं ना?”
“तुझं दुबईचं काम पूर्ण झालं ना?”
“हो,”
राज शांतपणे म्हणाला, “मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला.
कंपनीसाठी खूप फायद्याचा.”
राज शांतपणे म्हणाला, “मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला.
कंपनीसाठी खूप फायद्याचा.”
“मला माहित होतंच,” रवी अभिमानाने म्हणाला.
थोडा क्षण शांतता.
राज कॉफीचा घोट घेत म्हणाला, “रवी… या वेळेस परत येताना
फक्त काम घेऊन आलो नाही.”
फक्त काम घेऊन आलो नाही.”
रवीने भुवया उंचावल्या.
“आयुष्यात काहीतरी सोडून गेल्यासारखं वाटतंय,” राज हळू आवाजात म्हणाला.
रवी त्याच्याकडे पाहत राहिला.
“आणि म्हणूनच,” राज पुढे म्हणाला,
“मला नव्याने सुरुवात करायची आहे.”
“मला नव्याने सुरुवात करायची आहे.”
रवी हलकं हसला.
“म्हणजे?” तो विचारतो.
राज काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला
“मला माझ्या बायकोला शोधायचं आहे.”
“मला माझ्या बायकोला शोधायचं आहे.”
त्या वाक्यावर
रवी एकदम स्तब्ध झाला…
रवी एकदम स्तब्ध झाला…
कॉफी शॉपमध्ये सगळं सुरूच होतं, पण त्या टेबलवर
एक नातं, एक सत्य हळूहळू उघड होत होतं…
एक नातं, एक सत्य हळूहळू उघड होत होतं…
---
क्रमश
राज आणी पाखी ओळख होईल का? राजची बायको कोण आहे, हे रविला समजेल का?.....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा