Login

अजब गजब लग्नभाग -22

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 22




“बायकोला शोधायचं आहे म्हणजे?” रवी थोडा गोंधळून म्हणाला.

राजने कॉफीचा घोट घेतला आणि शांतपणे बोलू लागला

“आजोबा मागे लागले होते.
लग्न कर… लग्न कर म्हणून.  शेवटी कोर्ट मॅरेज केलं.
त्या दिवशी मी इतका अस्वस्थ होतो, की तिच्याकडे नीट पाहिलंसुद्धा नाही.  तिचे नाव पण मला  माहिती नाही.  ती कशी दिसते.  ते पण  मी पाहिले नाही. आता आजोबा म्हणत आहे.  तिला घेऊन ये,  तिला कुठे शोधू? ”   राज  म्हणाला.

रवी आश्चर्याने ऐकत होता.

“आता तीन चार महिने झाले असतील लग्नाला,”
राज पुढे म्हणाला,
“आजोबा परत तिचा विषय काढू लागलेत.
म्हणून…  आता तिला शोधायचं आहे.”

रवी क्षणभर गप्प राहिला.  मग हसत म्हणाला

“नक्की भेटेल.  आणि एक गोष्ट सांगतो…”
राजने त्याच्याकडे पाहिलं.

“माझ्या शॉपमध्ये एक मुलगी आहे,”  रवी म्हणाला,
“खूप हुशार आहे.  परिस्थिती कितीही अवघड असली
तरी कोणतंही काम करायला तयार असते.  आता नुकताच तिचा निकाल लागला  चांगल्या मार्क्सने पास झाली आहे.”

“माझ्या कंपनीत मला सेक्रेटरी हवी आहे,”
राज सहजपणे म्हणाला,  “इंटरव्ह्यूमध्ये पास झाली
तर तिला घेईन.”

“अरे व्वा!  हे तर मस्तच,”
रवी आनंदाने म्हणाला.  “उद्या तिला घेऊन येतो.”

“हो, घेऊन ये,”  राज म्हणाला,
“आता मी निघतो.  आजोबा वाट पाहत असतील.”

दोघेही उठले.

रवीने राजला घट्ट मिठी मारली  आणि तो बाहेर निघून गेला.

राजही बाहेर पडत होता.

तेवढ्यात  कोणीतरी त्याला धडकले.

ती तोल जाऊन पडणारच होती
तेवढ्यात राजने पटकन  तिला पकडलं.

क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला.

राज तिच्याकडे पाहत राहिला… तिच्यावरून डोळे हटतच नव्हते.

कुणीतरी मागून आवाज दिला.

राजने भानावर येत तिला सरळ उभं केलं आणि एक शब्दही न बोलता तिथून निघून गेला.

ती पाखी होती.

तीही काही क्षण त्या माणसाकडे पाहत राहिली.
“किती हँडसम आहे…” मनात विचार आला.

पण लगेचच ती भानावर आली. ते सगळे विचार बाजूला सारले
आणि पुन्हा कामाला लागली.

पण दोघांनाही माहीत नव्हतं ज्याला राज शोधत होता,
तीच त्याच्या अगदी समोर उभी होती…

आणि नियती हळूच हसत होती…


---





क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all