दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 23
अजब गजब लग्न भाग - 23
रवीने पाखीला हाक मारली.
“पाखी…”
“पाखी…”
ती लगेच त्याच्याकडे आली.
“काही काम होतं का?” पाखीने विचारलं.
“हो,” रवी हसत म्हणाला,
“माझा जो मित्र आला होता ना, त्याच्यासोबत तुझ्या जॉबबद्दल बोललो.”
“माझा जो मित्र आला होता ना, त्याच्यासोबत तुझ्या जॉबबद्दल बोललो.”
पाखी लक्ष देऊन ऐकत होती.
“उद्या आपल्याला त्याच्या ऑफिसमध्ये जायचं आहे,”
रवी पुढे म्हणाला,
“इंटरव्ह्यूची तयारी करून ये. त्याने सांगितलं आहे
इंटरव्ह्यू आवडली तर तो तुला त्याची सेक्रेटरी बनवेल.”, तुझ्यासाठी चांगलेच आहे.
रवी पुढे म्हणाला,
“इंटरव्ह्यूची तयारी करून ये. त्याने सांगितलं आहे
इंटरव्ह्यू आवडली तर तो तुला त्याची सेक्रेटरी बनवेल.”, तुझ्यासाठी चांगलेच आहे.
पाखीच्या चेहऱ्यावर क्षणात आनंद पसरला.
“खरंच?”
ती उत्साहात म्हणाली, “हे तर खूप छान आहे! पगारही जास्त मिळेल ना?”
ती उत्साहात म्हणाली, “हे तर खूप छान आहे! पगारही जास्त मिळेल ना?”
“हो,”
रवी म्हणाला, “तुझ्यासाठी हे खूप चांगलं आहे.”
रवी म्हणाला, “तुझ्यासाठी हे खूप चांगलं आहे.”
“माझे खूप खूप आभार,” पाखी मनापासून म्हणाली, “मी आजच तयारी सुरू करते.”
“असं काय म्हणतेस,” रवी हसत म्हणाला,
“आपण मित्र आहोत ना. मी काहीच खास केलं नाही.
आणि मला माहीत आहे तू उद्या खूप छान करशील. इंटरव्ह्यू पण चांगला देशील”
“आपण मित्र आहोत ना. मी काहीच खास केलं नाही.
आणि मला माहीत आहे तू उद्या खूप छान करशील. इंटरव्ह्यू पण चांगला देशील”
“मी प्रयत्न नक्की करेन,” पाखी म्हणाली, “मला जॉब खूप गरजेचा आहे. आजोबांचंही बघायचं आहे.”
“सगळं नीट होईल,” रवी विश्वासाने म्हणाला.
“मी आता निघते,” पाखी म्हणाली, “उद्याची चांगली तयारी करते.”
असं म्हणत, ती तिथून निघून गेली.
रवी तिच्याकडे पाहत राहिला.
उद्या तिच्या आयुष्यात
एक नवं वळण येणार होतं…
एक नवं वळण येणार होतं…
---
पाखी थेट हॉस्पिटलकडे निघाली.
मनात मात्र
उद्याच्या इंटरव्ह्यूचे विचार चालू होते. पण त्याआधी तिला आजोबांना भेटायचं होतं.
उद्याच्या इंटरव्ह्यूचे विचार चालू होते. पण त्याआधी तिला आजोबांना भेटायचं होतं.
हॉस्पिटलच्या रूममध्ये शिरताच आजोबांनी तिच्याकडे पाहिलं
आणि हसले.
आणि हसले.
“आज खूप खुश दिसतेस,” आजोबा म्हणाले.
“आजोबा…” पाखी हळूच म्हणाली,
“उद्या माझा इंटरव्ह्यू आहे.”
“उद्या माझा इंटरव्ह्यू आहे.”
“अरे वा!” आजोबांच्या डोळ्यांत आनंद चमकला.
“खूप छान बातमी आहे ही.”
“खूप छान बातमी आहे ही.”
“तुमच्यासाठीच आहे सगळं,” पाखी म्हणाली,
“मला चांगला जॉब मिळाला तर तुमची काळजी नीट घेऊ शकेन.”
“मला चांगला जॉब मिळाला तर तुमची काळजी नीट घेऊ शकेन.”
आजोबांनी तिच्या हातावर हात ठेवला.
“तू जे करतेस ते मनापासून करतेस,”
ते म्हणाले, “देव तुझं नक्की ऐकेल.”
ते म्हणाले, “देव तुझं नक्की ऐकेल.”
पाखीचा गळा दाटला.
“उद्या छान कर,” आजोबा म्हणाले,
“आणि आत्मविश्वास ठेव.”
“आणि आत्मविश्वास ठेव.”
“हो आजोबा,” ती स्माईल करत म्हणाली.
थोडावेळ गप्पा मारून पाखी तिथून निघाली.
---
घरी आल्यावर तिने देवाजवळ दिवा लावला.
“देवा, उद्या सगळं नीट होऊ दे,”
ती मनात म्हणाली.
ती मनात म्हणाली.
नंतर ती अभ्यासाच्या टेबलापाशी बसली.
रेझ्युमे परत परत पाहिला, महत्त्वाचे मुद्दे लिहून काढले,
काय बोलायचं, कसं बोलायचं सगळं नीट ठरवलं.
काय बोलायचं, कसं बोलायचं सगळं नीट ठरवलं.
आरशासमोर उभी राहून ती स्वतःशीच बोलायचा सराव करू लागली.
थकवा होता, पण डोळ्यांत झोप नव्हती
फक्त आशा होती.
फक्त आशा होती.
“उद्या माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे,”
असं मनात म्हणत पाखी शेवटी झोपली…
असं मनात म्हणत पाखी शेवटी झोपली…
---
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा