Login

अजब गजब लग्न भाग -26

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.

दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 26


राजने मोबाईल हातात घेतला. क्षणभर तो तसाच शांत उभा राहिला.

पाखी खरंच चांगली मुलगी वाटते,
हुशार आहे, आत्मविश्वास आहे… तिला सेक्रेटरी म्हणून ठेवलं तर माझ्यासाठी नक्कीच सोयीचं होईल. ती सगळं काम नीट सांभाळेल…

क्षणभर त्याचा विचार भरकटला.

आणि दिसायला पण किती सुंदर आहे… सतत माझ्यासोबत असेल…
तो अचानक स्वतःवरच चिडला.

अरे राज, हे काय विचार आहेत?
माझं लग्न झालं आहे.

त्याच्या मनात आजोबांचे शब्द घुमले.
“तिला घरी घेऊन ये.”

पण मी तिला शोधू तरी कसं?
मला तिचं नावही माहीत नाही, आजोबांनी सांगितले होते, मी. लक्षात ठेवले नाही, ती कुठे राहते हेही मला माहिती नाही.
आजोबांना विचारलं तर ते काहीच सांगणार नाहीत…

राज गोंधळला.
मनात अनेक प्रश्न, पण उत्तर एकही नाही.

त्याने खोल श्वास घेतला. सगळे विचार झटकून टाकले.

आता फक्त कामावर लक्ष द्यायचं.
राजने मोबाईल घट्ट पकडला
आणि पाखीचा नंबर डायल केला…


---


राजने मोबाईल हातात घेतला.
एक दीर्घ श्वास घेतला… आणि नंबर डायल केला.

दुसऱ्या बाजूला फोन लगेच उचलला गेला.

हॅलो… पाखी म्हणाली

राज म्हणाला,
हॅलो… पाखी बोलतेय ना?

पाखी म्हणाली,
हो सर, मीच बोलतेय आहे.

क्षणभर शांतता.
राजचा आवाज गंभीर पण सौम्य होता.

राज म्हणाला,
आजच्या इंटरव्यूबद्दल बोलायचं होतं. तुमची तयारी, आत्मविश्वास आणि उत्तरं… मला सगळंच आवडलं आहे

पाखीचा श्वास क्षणभर अडखळला.

पाखी म्हणाली,
थँक यू सर…मी खरंच खूप प्रयत्न केला होता


राज म्हणाला..
आणि ते दिसत होतं. म्हणूनच मी ठरवलं आहे…
तुमची निवड झाली आहे.

त्या शब्दांनी पाखीच्या डोळ्यांत चमक आली.

पाखी म्हणाली,
खरंच सर…? मी… मी सिलेक्ट झाले?

राज म्हणाला
हो.
माझ्या ऑफिसमध्ये
माझी सेक्रेटरी म्हणून.

पाखी क्षणभर काहीच बोलू शकली नाही.

पाखी म्हणाली,
थँक यू सो मच सर… तुम्हाला निराश करणार नाही.

राज म्हणाला,
मला विश्वास आहे. उद्या ऑफिसला जॉईन व्हा.
सर्व डिटेल्स मेलवर पाठवतो.

पाखी म्हणाली,
नक्की सर.
थँक यू… खरंच खूप धन्यवाद.

कॉल कट झाला.

पाखीचा चेहरा आनंदाने फुलला.
ती लगेच बाहेर आली.


---

रवी समोरच उभा होता.

पाखी म्हणाली,
रवी… निवड झाली आहे!

रवी क्षणभर स्तब्ध झाला. मग हसला.

रवी म्हणाला,
मला माहीत होतं. तू नक्की करशील.

पाखीच्या डोळ्यांत आनंद होता.
पण रवीच्या मनात…
आता पाखी रोज दिसणार नाही…
पण तिचा आनंद, माझ्यासाठी सगळ्यात मोठा आहे…

तो स्वतःशीच हळूच म्हणाला.

रवीने पाखीकडे पाहिलं,
आणि मनापासून म्हणाला

रवी म्हणाला,
ऑल द बेस्ट पाखी… खूप पुढे जा.

पाखी हसली.
नवीन आयुष्याची एक नवी सुरुवात झाली होती…


---

“मला आता घरी सोडणार का?” पाखी हळू आवाजात म्हणाली.

रवीने तिच्याकडे पाहिलं. “हो, चल. तू थकली असशील.”

गाडीत बसल्यावर पाखी शांत झाली.
खिडकीबाहेर पाहत होती, पण मन मात्र कुठेतरी वेगळ्याच विचारांत अडकलेलं होते.

आजोबांना कधी सांगू?
आता सगळं नीट होत चाललंय… जॉब मिळाला आहे, भविष्य थोडं स्थिर वाटतंय…
पण हे सगळं त्यांच्यापासून लपवून ठेवणं योग्य आहे का?

तिचा गळा दाटून आला.

“रवी…” ती थांबली.

“काय झालं?” रवीने काळजीने विचारलं.

“मला असं होत आहे…”
“आजोबांना सगळं कधी सांगते, हेच समजत नाही आहे.”
“खूप दिवस झाले, खूप काही बदललं आहे… पण सत्य अजूनही तसंच आहे.”

रवी थोडा वेळ शांत राहिला.
मग म्हणाला

“सत्य सांगायला योग्य वेळ लागतो, पाखी.” “पण तू एकटी नाही आहेस.”
“जेव्हा सांगशील, तेव्हा धैर्याने सांग. आजोबा तुला समजून घेतील.”

पाखीने हलकेच मान हलवली.
डोळ्यांत पाणी होतं, पण मनात थोडासा हलकापणा आला.

गाडी तिच्या घराजवळ थांबली.

“थँक यू, रवी…”
“आज खूप गरज होती कुणाशी तरी बोलायची.”

“कधीही,” रवी हसत म्हणाला.
“आता जा, आराम कर.”

पाखी गाडीतून उतरली.
घराकडे चालताना एकच विचार मनात घोळत होता

लवकरच… आता आजोबांना सगळं सांगायलाच हवं.


---


क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all