Login

अजब गजब लग्न भाग - 27

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 27


रवीने पाखीला घरी सोडलं. गाडीतून उतरतानाच पाखीच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहिला नाही. आजचा दिवस तिच्यासाठी खूप मोठा होता, मेहनतीचं फळ मिळाल्यासारखं वाटत होतं.

“धन्यवाद रवी,” ती मनापासून म्हणाली.

रवी फक्त हसला.
“आता पुढचा प्रवास तुझा आहे पाखी. स्वतःवर विश्वास ठेव.”

पाखी घरात आली. क्षणभर दाराशीच थांबली…
आत खोल कुठेतरी समाधानाची शांत लहर होती.

ती लगेच फ्रेश झाली.
स्वच्छ कपडे घालून देवाजवळ उभी राहिली. हळूच दिवा लावला, हात जोडले.

“देवा…”
“आजपर्यंत साथ दिलीस… पुढेही अशीच ताकद दे.”
“आजोबांची काळजी घ्यायची आहे… आणि स्वतःचं आयुष्य उभं करायचं आहे.”

डोळे मिटून ती क्षणभर तिथेच उभी राहिली.
मन हलकं झालं होतं. आज पहिल्यांदा तिला वाटलं
मी योग्य दिशेने चालली आहे.

ती हसली…
आणि नवीन आयुष्याच्या पहिल्या पायरीकडे आत्मविश्वासाने वळली.

पाखी हॉस्पिटलमध्ये आली.

पाखी आजोबांच्या बेडजवळ जाऊन बसली.
आजोबा शांत होते, पण पाखीच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन पाहत होते.

“आजोबा…”
पाखीने हळूच हाक मारली.

“काय गं पाखी, आज खूप शांत दिसतेस.”
“काही झालंय का?” आजोबा म्हणाले.

पाखीने दीर्घ श्वास घेतला.
“आजोबा, मला तुम्हाला सगळं सांगायचं आहे.”

आजोबांनी तिच्या हातावर हात ठेवला. “सांग बाळा… काही लपवायचं नाही.”

“लग्नानंतर…” तिचा आवाज थरथरला.
“मी कॉलेज, अभ्यास, आजोबांची काळजी… सगळं एकटीने करत होते.”

“तुमच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी…” “आणि घर चालवण्यासाठी…” “मी कॉफी शॉपमध्ये काम करायला लागले.”

आजोबा क्षणभर गप्प झाले.
त्यांच्या डोळ्यांत आश्चर्य आणि काळजी दोन्ही दिसत होती.

“कॉफी शॉपमध्ये?”
“कधीपासून?” त्यांनी विचारलं.

“कॉलेजच्या शेवटच्या दिवसांत.”
“परीक्षेआधी आजारी पडले तरी काम सोडलं नाही.” “कारण मला तुमची काळजी होती, आजोबा.”

आजोबांचे डोळे पाणावले.

“अगं पाखी…”
“हे सगळं एकटीने का सहन केलंस?” “मला सांगायला हवं होतंस.” आजोबा म्हणाले.

पाखी मान खाली घालून म्हणाली
“तुम्हाला त्रास नको होता.” “तुम्ही आधीच आजारी होता.”

आजोबांनी तिचा कपाळावरून हात फिरवला.
“तू खूप मोठी झालीस गं.” “मला अभिमान आहे तुझा.”

पाखीच्या डोळ्यांत पाणी आलं, पण त्या पाण्यात आज भीती नव्हती फक्त हलकं झालेलं मन होतं.

“आता पुढे काहीही लपवायचं नाही,”
आजोबा हसत म्हणाले. “आपण सगळं मिळून बघू.”

पाखी हसली.
आज पहिल्यांदा तिला वाटलं मी एकटी नाही आहे.


---


पाखी आजोबांच्या जवळ जाऊन बसली.
आज तिच्या मनात काहीतरी खूप जड होतं… पण ते आज बोलायलाच हवं होतं.

“आजोबा…”
तिने हळू आवाजात म्हटलं.

“काय झालं गं पाखी?”
“आज खूप गंभीर दिसतेस,” आजोबा म्हणाले.

पाखीने थोडा वेळ शांत राहून, मग बोलायला सुरुवात केली

“आजोबा, राजबद्दल… मला तुम्हाला सगळं सांगायचं आहे.”

आजोबांनी तिच्याकडे लक्ष देऊन पाहिलं.
“सांग बाळा, काही लपवायचं नाही.”

“आपलं कोर्ट मॅरेज झालं… पण त्या दिवशी…
राजांनी मला एकदाही नीट पाहिलं नाही.”

“सह्या केल्या…
आणि ते तिथून निघून गेले.” पाखी म्हणाली.

आजोबांच्या चेहऱ्यावर धक्का बसला.

“माझ्याकडे त्यांचा फोन नंबर नाही,
त्यांचा पत्ता नाही,
ते कुठे राहतात हेही मला माहिती नाही.”

“मी तुम्हाला खोटं बोलत होते…”
“कारण तुम्ही आजारी होता…
तुम्हाला त्रास नको होता.”

पाखीचा आवाज थरथरत होता.

“आजोबा…
मी त्यांची बायको आहे…
पण मला असं वाटतं की मी त्यांच्या आयुष्यातच नाही.”

आजोबा काही क्षण गप्प राहिले.
डोळे पाणावले.

“राजने चूक केली आहे,”
ते शांत पण ठाम आवाजात म्हणाले.
“पण याचा अर्थ असा नाही की तू चुकीची आहेस.”

“तू खूप मोठ्या मनाची आहेस पाखी.”
“कर्तव्य, प्रेम, जबाबदारी सगळं एकटीने पेललंस.”

ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले

“आता पुढे असं होऊ देणार नाही.”
“मी स्वतः राजशी बोलेन.”

तुम्ही नका बोलू,  त्यांना आता माझ्याकडे  येऊ द्या,  त्यांच्या आजोबांना पण  कॉल  करू नका,  ते पण टेन्शन  मध्ये येतील, पाखी म्हणाली.

ठीक आहे, तू म्हणशील तसें होईल, आजोबा  म्हणाले.

पाखीच्या डोळ्यांत पाणी होतं,
पण आज त्या पाण्यात वेदना नव्हत्या फक्त आधार होता.

“आता तू एकटी नाहीस,”  आजोबा हसत म्हणाले.

पाखीने मान हलवली. पहिल्यांदा तिला वाटलं कोणी तरी माझ्या बाजूने ठाम उभं आहे.


---


क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all