Login

अजब गजब लग्न भाग - 29

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 29


राशीने फोन ठेवताच आनंदाने उडी मारली.
ती जागेवरच नाचायला लागली, हसत हसत स्वतःशीच बोलत होती.

हे सगळं रवी पाहत होता.

“एवढा कसला आनंद झाला?” तो हसत विचारू लागला.

“पाखीला जॉब लागला!” राशी उत्साहाने म्हणाली.
“ती उद्या पार्टी देणार आहे.”

रवी थोडा थांबला, मग शांतपणे म्हणाला
“पाखीला जॉब लागला…
हे मला आधीच माहिती आहे.”

राशी त्याच्याकडे वळून पाहत म्हणाली
“तुला कसं?”

“मी तिच्या सोबत होतो,” रवी हळू आवाजात म्हणाला.

क्षणभर दोघेही शांत झाले.
राशीला त्याच्या आवाजातला अभिमान आणि हलकीशी उदासी दोन्ही जाणवली होती.

“काय झालं दादा?” राशीने विचारलं.

रवी फक्त हलकंसं हसला.
“काही नाही… फक्त एवढंच
तिचा आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.”

राशीने त्याच्याकडे पाहिलं. आज तिला कळलं
दादाच्या हसण्यामागे काही न बोललेली भावना दडलेली आहे.

राशी हळूच रवीजवळ जाऊन बसली.
तिला दादाच्या मनात काय चाललंय, हे कळत होतं.

“दादा…”
“तू ठीक आहेस ना?” तिने विचारलं.

रवी थोडा वेळ शांत राहिला.
मग म्हणाला

“राशी…
मी तुला आधीच सांगितलं होतं ना… मला पाखी आवडते.”

राशीने मान हलवली.

“आता ती जॉबला लागली आहे.”
“दररोज माझ्या समोर नसेल,…
माझ्या ऑफिसमध्येच नसेल.”

त्याचा आवाज जड झाला.

“आनंद व्हायला हवा…पण मनात कुठेतरी दुखतंय.”
“तिला रोज पाहून…
ती माझी नाही, हे जास्त जाणवतं.” रवी म्हणाला.

राशी काही क्षण गप्प राहिली. मग हळूच म्हणाली

“दादा…
पाखीचं लग्न झालं आहे.”

“आणि ती खूप संघर्षातून इथे पोहोचली आहे.”

“तिच्या आनंदात तू दुःख ठेवू नकोस.” राशी म्हणाली.

रवी दीर्घ श्वास घेत म्हणाला
“मला माहित आहे.”

“म्हणूनच मी मागे राहणार आहे.”
“तिच्या आयुष्यात अडथळा नको बनायला.”

“पण मन…bमन थोडं वेळ मागतंय.”

राशीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. “तू खूप चांगला आहेस दादा.”

“आणि हेच तुझं मोठेपण आहे.”

रवी हलकंसं हसला.
त्या हास्यामागे वेदना होत्या… पण निर्णयही होता.

राशी थोडावेळ शांत उभी होती.
रवीने तिच्याकडे पाहून हलक्या आवाजात म्हटलं

“आता रात्र झाली आहे.” “झोपून घे.”

“उद्या पार्टीला जायचं आहे ना,”
तो हसत म्हणाला.

राशीने मान हलवली.
“हो दादा… उद्या पाखीचा दिवस आहे.”

“ठीक आहे,” रवी म्हणाला.
“तू पण थकली असशील.”

“चल, गुड नाईट.”

“गुड नाईट दादा,”
राशी म्हणाली.

राशी निघून गेली. रवी मात्र तिथेच थांबला.
खिडकीबाहेर पाहत.

मनात विचारांचा कल्लोळ होता… पण एक निर्णय ठाम होता

पाखीचा आनंद महत्त्वाचा आहे. आणि तोच विचार मनाशी धरून, रवीनेही शेवटी झोपेचा आधार घेतला.


क्रमश
पाखी आणी राशीची पार्टी कशी होते?,  तिथे राज  येईल का?  पाखीचा ऑफिसचा पाहिला दिवस कसा असेल?.....

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all