Login

अजब गजब लग्न भाग - 30

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 30


पाखी लवकर उठली. आज तिच्यासाठी खास दिवस होता.

तिने घर आवरलं, शांतपणे तयार झाली.
आरशात पाहताना चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि हलकीशी उत्सुकता दिसत होती.

घरातून निघण्याआधी तिने देवाजवळ दिवा लावला.
हात जोडले.

“आज सगळं चांगलं होऊ दे,” ती मनात म्हणाली.

त्यानंतर ती थेट हॉस्पिटलमध्ये आजोबांकडे गेली.
बेडजवळ जाऊन वाकून नमस्कार केला.

“आजोबा, आज माझा ऑफिसचा पहिला दिवस आहे,”
ती हसत म्हणाली.
“तुमचा आशीर्वाद हवा आहे.”

आजोबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. “यशस्वी हो बाळा,”
“आणि स्वतःवर विश्वास ठेव.”

पाखीचे डोळे पाणावले, पण ओठांवर स्मित होतं.

“मी निघते,” ती म्हणाली.

हॉस्पिटलमधून बाहेर पडताना मनात एकच विचार होता
आज नवीन आयुष्याची सुरुवात आहे.

ती सरळ ऑफिसकडे निघाली.

......

पाखी बिल्डिंगकडे क्षणभर थांबून पाहू लागली.
उंच, स्वच्छ काचांची बिल्डिंग… बाहेर ये-जा करणारी माणसं, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपापली घाई.
इथूनच माझी नवी सुरुवात… ती मनातच पुटपुटली.

पहिल्यांदा आली होती तेव्हा रवी सोबत होता. त्याच्या बोलण्यात, त्याच्या मार्गदर्शनात ती इतकी गुंतलेली होती की आजूबाजूचं काहीच दिसलं नव्हतं.
आज मात्र ती एकटी होती… मनात भीती होती. मला सगळे. जमेल ना, पाखी म्हणाली आणी तिने खोल श्वास घेतला. आजोबांचा आशीर्वाद अजूनही मनात घोळत होता. त्यातूनच तिला बळ मिळालं.
घाबरायचं नाही, पाखी… तू हे मिळवलं आहेस, स्वतःलाच धीर देत ती आत शिरली.

रिसेप्शनवर नाव नोंदवताना हात थोडेसे थरथरत होते, पण चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं हलकंसं हसू होतं.
आज फक्त जॉबचा पहिला दिवस नव्हता…
आज तिच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होत होता.


गणेश नावाच्या मुलाने तिला सगळं नीट समजावून सांगितलं.
“राज सरांचं शेड्युल घ्यायचं, त्यांना जाऊन कळवायचं. मिटिंग असेल तर त्यांच्या सोबत यायचं,” तो म्हणाला.
क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, “आज तुमचा पहिला दिवस आहे ना, म्हणून आज मी तुमच्यासोबतच राहीन.”

पाखी हलकंसं हसली.
“तू म्हणशील तर चालेल. पण मला नीट सांग. मी लगेच समजून घेईन,” ती आत्मविश्वासाने म्हणाली.

“ओके,” गणेश म्हणाला.

पाखीने मनातच स्वतःशी एकदा पुन्हा ठरवलं
पहिल्याच दिवशी चुकायला नाही द्यायचं.
नवीन जबाबदाऱ्या, नवीन माणसं… सगळं जरा अनोळखी होतं, पण भीतीपेक्षा उत्सुकताच जास्त होती.

गणेशने पाखीला तिची जागा दाखवली.
“इथे तुमचं बसायचं,” तो म्हणाला.

पाखीने आजूबाजूला एक नजर टाकली. सगळं नवीन होतं, पण नीटनेटके आणि शांत होते.

ती खुर्चीत बसली, पर्स बाजूला ठेवली आणि एक दीर्घ श्वास घेतला.

नवा प्रवास… नवी सुरुवात, ती मनात म्हणाली.

कॉम्प्युटर सुरू करून तिने फाइल्स नीट लावल्या, वही उघडली आणि कामाला लागली.
पहिल्याच दिवशी स्वतःला सिद्ध करायचं होतं, हे तिला पक्कं ठाऊक होतं.


गणेश तिथून निघून गेला.

पाखी आता एकटीच तिच्या टेबलावर बसली होती. ऑफिसमधली लगबग हळूहळू जाणवायला लागली. कुणी फोन उचलत होतं, कुणी फाइल्स घेऊन धावत होतं… आणि त्या सगळ्यात पाखी स्वतःला त्या वातावरणात मिसळण्याचा प्रयत्न करत होती.

तिने राज सरांचा शेड्युल पुन्हा एकदा नीट वाचला, वेळा वहीत लिहून ठेवल्या.
चूक होऊ द्यायची नाही, ती मनात म्हणाली.

थोड्या वेळाने तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. आजचा दिवस तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस होता, पहिला जॉब, पहिला दिवस, आणि नवीन जबाबदाऱ्या होत्या.
पाखीने स्वतःशीच हसत पुन्हा कामावर लक्ष केंद्रित केलं.


क्रमश
गणेश आणी पाखीचे बोलणे, राज आवडेल का? त्यांच्या मनात काय येईल?, .......


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all