Login

अजब गजब लग्न भाग - 31

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न  भाग - 31


राज नेहमीसारखा स्टायलिश अंदाजात ऑफिसमध्ये आला.
फॉर्मल सूट, चेहऱ्यावर आत्मविश्वास, चालण्यात तो खास अ‍ॅटिट्यूड होता…

“गुड मॉर्निंग सर,”
ऑफिसमधले सगळे एकामागोमाग एक त्याला विश करत होते.

राज फक्त मान हलवत पुढे चालत होता. त्याचा तोच रुबाब, तोच थंडपणा होता.

चालताना त्याची नजर क्षणभर पाखीवर गेली.
ती तिच्या जागेवर शांतपणे बसून काम करत होती. त्या एका क्षणासाठी राज थांबला… पण लगेचच स्वतःला सावरलं.

काहीही न बोलता तो थेट आपल्या केबिनमध्ये निघून गेला.

पाखीनेही त्याच्याकडे जास्त लक्ष न देता पुन्हा कामावर लक्ष केंद्रित केलं.
तिला माहीत होतं, हा तिच्या आयुष्यातला नवा अध्याय आहे, आणि तिला तो स्वतःच्या मेहनतीने लिहायचा आहे.


पाखी आणि गणेश राजच्या केबिनकडे निघाले.
पाखीच्या मनात थोडी उत्सुकता होती, थोडी धाकधूकही… पहिलाच दिवस होता ना.

गणेशने हलकेच दरवाजावर नॉक केलं.
“मे आय कम इन, सर?” तो आदराने म्हणाला.

“यस, कम इन,” राजचा ठाम आवाज आतून आला.

गणेश आणि पाखी दोघेही केबिनमध्ये गेले.
राज आपल्या टेबलवर फाईल्स बघत बसला होता. त्याने नजर वर केली… आणि पुन्हा एकदा पाखीकडे पाहिलं.

क्षणभर वातावरण शांत झालं.
पाखी नीट उभी होती, आत्मविश्वासाने… पण डोळ्यांत आदर आणि संयम होता.

“सर, हा आजचा तुमचा शेड्युल,” गणेश बोलू लागला.

पाखी लक्ष देऊन सगळं ऐकत होती.
तिला माहीत होतं, हा फक्त पहिला दिवस नाही, तर तिच्या आयुष्याची नवी सुरुवात आहे.

गणेशने सगळं नीट समजावून सांगितलं आहे ना, याची खात्री करत राज म्हणाला,
“उद्या पासून हे सगळं पाखीच बघेल. आजच्या मीटिंगला पण पाखी येणार आहे.”

“यस सर,” गणेश लगेच म्हणाला.

“आता तुम्ही जाऊ शकता,” राजने थोड्या ठामपणे सांगितलं.

गणेश आणि पाखी दोघेही केबिनच्या बाहेर आले.

बाहेर येताच गणेश हसत पाखीशी बोलू लागला.
“काही टेन्शन घेऊ नकोस, सगळं हळूहळू जमेल,” तो म्हणाला.

पाखीही हसली.
“हो, पहिलाच दिवस आहे, पण छान वाटतंय,” ती म्हणाली.

हे सगळं राज आपल्या केबिनमधून पाहत होता.
दोघांमध्ये सहज गप्पा चालू होत्या, ओळख पहिल्याच दिवशी चांगली झाली होती.

“पहिल्या दिवशीच सगळ्यांशी जुळवून घेतेय… आत्मविश्वास आहे या मुलीत,”
राज मनात म्हणाला.

राज आपल्या टेबलवर बसून कामात मग्न झाला. फाईल्स, मेल्स, मीटिंग्स… सगळं एका मागोमाग सुरू झालं होते.

बाहेर पाखी आणि गणेशही आपापल्या कामाला लागले.
गणेश पाखीला हळूहळू सगळं समजवत होता, फाईल्स कुठे ठेवायच्या, शेड्युल कसं अपडेट करायचं, कॉल्स कसे अटेंड करायचे.

पाखी लक्ष देऊन ऐकत होती, जे सांगितलं जात होतं ते लगेच नोट करत होती.
पहिलाच दिवस असूनही तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसत होता.

“छान समजून घेतेस तू,” गणेश म्हणाला.

पाखी हलकेच हसली.
“काम मनापासून केलं की सगळं सोपं वाटतं,” ती म्हणाली.

ऑफिसमध्ये कामाचा शांत गडबडीतला माहोल तयार झाला होता… आणि पाखी त्या वातावरणात सहज मिसळून गेली होती.


क्रमश

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all