दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 33
राज त्या कॉफीशॉपमध्ये शांत बसला होता.
समोर कॉफीचा कप ठेवलेला, पण त्याचे लक्ष मात्र दुसरीकडेच होते.
पाखी…
हसत बोलत होती, राशीसोबत मोकळेपणाने गप्पा मारत होती.
तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, डोळ्यांतला आत्मविश्वास… नकळत राजची नजर तिच्याकडेच खेचली जात होती.
हसत बोलत होती, राशीसोबत मोकळेपणाने गप्पा मारत होती.
तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, डोळ्यांतला आत्मविश्वास… नकळत राजची नजर तिच्याकडेच खेचली जात होती.
“मी सारखा तिच्याकडे का पाहतोय?” राज मनातच पुटपुटला.
ती इतर मुलींसारखी नाहीये… दिसायला साधी, पण वागण्यात वेगळी. कोणताही दिखावा नाही, तरीही तिचं अस्तित्व जाणवतंय.
राजने नजर वळवायचा प्रयत्न केला,
पण पुन्हा-पुन्हा तिच्याकडेच नजर जात होती.
पण पुन्हा-पुन्हा तिच्याकडेच नजर जात होती.
“असं काय आहे या मुलीमध्ये?”
“का इतकी शांतपणे मनाला स्पर्श करते?”
“का इतकी शांतपणे मनाला स्पर्श करते?”
त्याला स्वतःवरच राग आला.
“राज, तुझं लग्न झालं आहे… विसरू नकोस.”
“राज, तुझं लग्न झालं आहे… विसरू नकोस.”
तो खोल श्वास घेतो, कॉफीचा घोट घेतो.
पण मन मात्र ऐकत नव्हतं.
पण मन मात्र ऐकत नव्हतं.
पाखी हसली…
आणि त्या एका हसण्याने राजचं मन क्षणभर थांबलं.
आणि त्या एका हसण्याने राजचं मन क्षणभर थांबलं.
तो नजर खाली घालतो,
पण मनात एक अनोळखी हलचल सुरूच होती…
जिचं नाव तो स्वतःलाही सांगू शकत नव्हता.
पण मनात एक अनोळखी हलचल सुरूच होती…
जिचं नाव तो स्वतःलाही सांगू शकत नव्हता.
कॉफीशॉपमध्ये हलकंसं म्युझिक वाजत होतं…
नंतर अचानक टेम्पो वाढला आणि गाणं बदललं.
पाखी आणि राशी एकमेकींकडे पाहून हसल्या.
आजचा आनंद वेगळाच होता.
आजचा आनंद वेगळाच होता.
“चल ना… आज नाचूया,”
राशी पाखीचा हात धरत म्हणाली.
राशी पाखीचा हात धरत म्हणाली.
“हो गं… आज माझा दिवस आहे,”
पाखी हसत म्हणाली.
पाखी हसत म्हणाली.
दोघीही मोकळेपणाने नाचायला लागल्या.
कोण काय म्हणेल, कोण पाहतंय याची त्यांना पर्वाच नव्हती.
फक्त आनंद… निव्वळ आनंद!
कोण काय म्हणेल, कोण पाहतंय याची त्यांना पर्वाच नव्हती.
फक्त आनंद… निव्वळ आनंद!
पाखी कधी टाळ्या वाजवत होती,
तर कधी फिरत-फिरत राशीला ओढून घेत होती.
राशीही तिच्यासोबत ठेका धरत नाचत होती.
तर कधी फिरत-फिरत राशीला ओढून घेत होती.
राशीही तिच्यासोबत ठेका धरत नाचत होती.
दोघींच्या हसण्याने तो संपूर्ण कॉफीशॉप जिवंत झालं होतं.
आजचा सगळा ताण, संघर्ष, काळजी त्या नाचात विरघळून गेली होती.
आजचा सगळा ताण, संघर्ष, काळजी त्या नाचात विरघळून गेली होती.
दूर बसलेला राज नकळत त्यांच्याकडे पाहत राहिला.
पाखीचा तो मुक्त आनंद, तो निष्पाप हसरा चेहरा…
त्याच्या मनात नकळत एक वेगळीच भावना उमटत होती.
पाखीचा तो मुक्त आनंद, तो निष्पाप हसरा चेहरा…
त्याच्या मनात नकळत एक वेगळीच भावना उमटत होती.
पाखी आणि राशीसाठी मात्र तो क्षण खास होता
मैत्रीचा, यशाचा आणि थोडंसं स्वप्नं पूर्ण झाल्याचा
मैत्रीचा, यशाचा आणि थोडंसं स्वप्नं पूर्ण झाल्याचा
थोड्यावेळाने गाणी थांबली,
पाखी आणि राशी दमून खुर्चीवर बसल्या.
“आज खूप एन्जॉय केलं गं,”
राशी हसत म्हणाली.
राशी हसत म्हणाली.
“हो ना… असंच वाटतंय, आजचा दिवस कधीच संपू नये,”
पाखीने समाधानाने उत्तर दिलं.
पाखीने समाधानाने उत्तर दिलं.
पाखीने बिल दिलं,
कॉफीशॉपमधून बाहेर पडल्या.
कॉफीशॉपमधून बाहेर पडल्या.
रात्रीची थंड हवा अंगावर येत होती.
रस्त्यावर चालताना दोघी गप्पा मारत होत्या आजचा जॉब, ऑफिस, पुढचं आयुष्य…
रस्त्यावर चालताना दोघी गप्पा मारत होत्या आजचा जॉब, ऑफिस, पुढचं आयुष्य…
थोड्याच वेळात त्या घरी पोहोचल्या.
मन आनंदाने भरलेलं होतं, पण शरीर थकलेलं.
मन आनंदाने भरलेलं होतं, पण शरीर थकलेलं.
“चल, उद्या लवकर ऑफिस आहे,”
राशी म्हणाली.
राशी म्हणाली.
“हो, आता झोपायलाच हवं,”
पाखी हसत म्हणाली.
पाखी हसत म्हणाली.
दोघी रूममध्ये गेल्या.
आजचा दिवस आठवत,
पाखीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं… आणि त्या आनंदी मनाने झोपून गेल्या.
आजचा दिवस आठवत,
पाखीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं… आणि त्या आनंदी मनाने झोपून गेल्या.
राशीने झोपण्याआधी रविला मेसेज केला होता
“उशीर झाला आहे. आज मी पाखीकडेच थांबणार आहे.”
रवी बेडवर बसून तो मेसेज वाचत होता.
त्याच्या ओठांवर हलकंसं हसू आलं.
त्याच्या ओठांवर हलकंसं हसू आलं.
“आज दोघी खूप मजा करून आल्या असतील,”
तो मनात म्हणाला.
तो मनात म्हणाला.
पाखीचा आनंद त्याला दिसत होता…
तिचा जॉब, तिचं हसणं, तिचा आत्मविश्वास
सगळं आठवत होतं.
तिचा जॉब, तिचं हसणं, तिचा आत्मविश्वास
सगळं आठवत होतं.
मनाच्या एका कोपऱ्यात थोडंसं वाईट वाटत होतं,
पण त्याहून जास्त तिच्यासाठी आनंद होता.
पण त्याहून जास्त तिच्यासाठी आनंद होता.
“ती खुश आहे… एवढंच पुरेसं आहे,”
असं स्वतःशीच म्हणत
रवीने मोबाईल बाजूला ठेवला.
असं स्वतःशीच म्हणत
रवीने मोबाईल बाजूला ठेवला.
खिडकीतून येणाऱ्या शांत रात्रीकडे पाहत,
तोही हळूहळू झोपेच्या कुशीत गेला…
तोही हळूहळू झोपेच्या कुशीत गेला…
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा