Login

अजब गजब लग्न भाग - 38

पाखी आणी राज एकत्र येतील का? त्यांच्या आणी तिच्या आजोबांना सगळे समजेल का? त्यांचे पुढे काय होईल.
दीर्घकथा लेखन स्पर्धा  डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न  भाग - 38



राज दूर उभा राहून पाखी आणि रवीकडे पाहत होता.
दोघेही एकमेकांत इतके गुंतले होते की राजकडे लक्षच नव्हतं.
ते हसत-हसत बोलत होते, जणू आजूबाजूला कोणीच नाही.

शेवटी राजच स्वतः पुढे गेला.

“अरे, तुम्ही दोघेच बोलत आहात,” तो अर्धवट हसत म्हणाला.
“माझ्याशी बोलणार की नाही? रवी, तू तर मला विसरलाच दिसतोस.”

रवी लगेच हसला.
“असं कसं विसरेन! पाखी खूप दिवसांनी भेटली म्हणून गप्पा रंगल्या,” तो सहजपणे म्हणाला.

“मी पण कुठे रोज भेटतोय?” राज हलक्याशा टोमण्याने म्हणाला.

“हो रे, हो,” रवी म्हणाला.
“तुझ्याशी पण बोलतोच. बरं… वहिनी कशा आहेत? घरी आल्या का नाही अजून?”

हे ऐकताच राज क्षणभर गडबडला.त्यांची नजर नकळत पाखीकडे गेली.

पाखीही आश्चर्याने राजकडे पाहत होती.
त्या नजरेत प्रश्न होते… पण शब्द नव्हते.

“बोल ना,” रवी म्हणाला.

“नाही… अजून नाही,”
राज थोडा टाळक्यापणाने म्हणाला.

थोडा वेळ त्यांच्यात साधं, नॉर्मल बोलणं झालं.
मग रवी काही काम आहे असं सांगून तिथून निघून गेला.

राज आणि पाखी दोघे काही क्षण शांत उभे होते.
शब्द न बोलता सुद्धा, दोघांच्या मनात बरंच काही चालू होतं.

नंतर राजने पाखीला घरी सोडले आणि स्वतःही घरी निघून गेला…
पण त्या संध्याकाळची गोंधळलेली नजर दोघांच्याही मनात खोलवर रेंगाळत राहिली.

राज घरी आला.
घरात शांतता होती. बाहेरचा सगळा गोंधळ, पार्टीचा आवाज, लोकांचे चेहरे… सगळं मागे राहिलं होतं.

तो थेट बाथरूममध्ये गेला. थंड पाण्याने चेहरा धुतला, आरशात स्वतःकडे पाहिलं. डोळ्यांखाली थकवा होता, पण त्याहून जास्त गोंधळ मनात होता.
मस्त फ्रेश झाला, कपडे बदलले… तरीही मन शांत होईना.

तो बेडवर बसला. मोबाईल हातात घेतला, पण स्क्रीनकडे पाहतच राहिला. कोणालाही कॉल करावासा वाटत नव्हता. कोणाशी बोलावंसंही वाटत नव्हतं.

राज मनात विचार करत राहिला

“जिला शोधत आहे… ती भेटत नाही आहे.
आणि जिच्या प्रेमात नकळत पडत चाललो आहे…
ती माझ्याकडे पाहतही नाही आहे.”

तो हलकेच हसला. स्वतःवरच चिडला.
“किती विचित्र आहे ना प्रेम… ज्याच्यासाठी मन धडधडतं, तिलाच त्याची जाणीव नसते.”

खिडकीतून बाहेर पाहिलं. रस्त्यावरचे दिवे चमकत होते, गाड्या ये-जा करत होत्या. सगळ्यांचं आयुष्य पुढे चाललं होतं… फक्त त्याचं मन कुठेतरी अडकलं होतं.

तो उशीवर पाठ टेकवून डोळे मिटले.
पार्टीतला तो क्षण पुन्हा डोळ्यांसमोर आला ती… तिचं हसणं… आणि मग त्याच्याकडे पाहिलेली ती एक नजर, त्यांचा डान्स, तिचा स्पर्श सगळे त्याला आठवत होते.

“कदाचित तिला काहीच वाटत नसेल…
आणि कदाचित मलाच जास्त वाटत असेल…”

पण मन मानायलाच तयार नव्हतं.

राजने दीर्घ श्वास घेतला.
“उद्या पाहू… कदाचित उद्या काहीतरी बदलेल.”

आणि त्या आशेवरच तो हळूहळू झोपेच्या अधीन गेला…
मनात मात्र तिचाच विचार अजूनही जागाच होता.




क्रमश.

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


दिपाली चौधरी


तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी  कमेंट करा


0

🎭 Series Post

View all