दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
अजब गजब लग्न भाग - 39
अजब गजब लग्न भाग - 39
पाखी घरी आली.
मन थकलेलं होतं, पण आजची पार्टी खरंच मस्त झाली होती. तरीही एक हलकीशी हुरहूर मनात होती.
मन थकलेलं होतं, पण आजची पार्टी खरंच मस्त झाली होती. तरीही एक हलकीशी हुरहूर मनात होती.
“खूप उशीर झाला… आजोबांना भेटताच आलं नाही,”
ती स्वतःशीच पुटपुटली.
ती स्वतःशीच पुटपुटली.
ती फ्रेश झाली. सकाळसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी नीट तयार करून ठेवल्या. कामाच्या सवयीप्रमाणे सगळं व्यवस्थित केल्यावरच तिला थोडा निवांतपणा मिळाला.
मग ती बेडवर आडवी पडली. मोबाईल हातात घेतला.
गॅलरी उघडली… आजचे फोटो दिसले.
गॅलरी उघडली… आजचे फोटो दिसले.
राजसोबत काढलेले फोटो.
ती एकटक त्या फोटोकडे पाहत राहिली.
त्याच्या चेहऱ्यावरची ती शांत स्माईल, आत्मविश्वास… सगळंच वेगळं वाटत होतं.
त्याच्या चेहऱ्यावरची ती शांत स्माईल, आत्मविश्वास… सगळंच वेगळं वाटत होतं.
“सर किती हँडसम दिसतात… आणि किती चांगले आहेत,”
पाखी मनातच म्हणाली.
पाखी मनातच म्हणाली.
क्षणभर तिचं मन थांबलं. पण लगेचच वास्तव डोळ्यांसमोर आलं.
“सरांचं लग्न झालं आहे… मला सरांपासून दूरच राहायला हवं,”
ती स्वतःलाच समजावत मनात म्हणाली.
ती स्वतःलाच समजावत मनात म्हणाली.
त्या विचारासोबतच तिने मोबाईल बाजूला ठेवला.
डोळे मिटले… मन मात्र शांत होईना.
डोळे मिटले… मन मात्र शांत होईना.
झोप यायचा प्रयत्न करत होती,
पण विचारांमध्ये राजच पुन्हा पुन्हा डोकावत होता.
पण विचारांमध्ये राजच पुन्हा पुन्हा डोकावत होता.
“हे सगळं फक्त मनाचं आहे…
आणि मनाला आवर घालायलाच हवा,” असा विचार करत करत…
आणि मनाला आवर घालायलाच हवा,” असा विचार करत करत…
शेवटी पाखी हळूहळू झोपेच्या अधीन गेली.
पण त्या रात्री तिच्या मनातही, कोणीतरी नकळत जागाच होता.
पण त्या रात्री तिच्या मनातही, कोणीतरी नकळत जागाच होता.
.....
सकाळी आजोबा हॉलमध्ये शांतपणे बसले होते. हातात चहाचा कप होता, पण मन मात्र विचारांनी भरलेलं होतं.
“राज आणि पाखीला एकत्र कसं आणायचं?”
ते स्वतःशीच विचार करत होते.
“दोघांनी एकमेकांकडे नीट पाहिलं सुद्धा नाही… बोलणं तर दूरच राहिलं.”
ते स्वतःशीच विचार करत होते.
“दोघांनी एकमेकांकडे नीट पाहिलं सुद्धा नाही… बोलणं तर दूरच राहिलं.”
क्षणभर ते थांबले. मग कालची आठवण मनात आली.
“मी वकिलाला कॉल केला होता. त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट अजूनही तिथेच आहे.
दोघांच्या सह्या झाल्या आहेत… सगळं कायदेशीर आहे.
पण ते कागद हातात येणं गरजेचं आहे,”
आजोबा मनातच म्हणाले.
दोघांच्या सह्या झाल्या आहेत… सगळं कायदेशीर आहे.
पण ते कागद हातात येणं गरजेचं आहे,”
आजोबा मनातच म्हणाले.
ते थोडेसे गंभीर झाले.
“ते सर्टिफिकेट मला स्वतः जाऊन घेऊन यावं लागेल.
राजच्या ऑफिसमध्ये जावं लागेल आज,”
असा ठाम निर्णय त्यांनी मनाशी पक्का केला.
राजच्या ऑफिसमध्ये जावं लागेल आज,”
असा ठाम निर्णय त्यांनी मनाशी पक्का केला.
चहाचा शेवटचा घोट घेत त्यांनी कप बाजूला ठेवला.
आजचा दिवस काहीतरी बदल घडवणार आहे,
अशी एक अनामिक खात्री त्यांच्या मनात होती.
आजचा दिवस काहीतरी बदल घडवणार आहे,
अशी एक अनामिक खात्री त्यांच्या मनात होती.
राज सकाळी लवकर उठला. मनात कालच्या पार्टीचे, पाखीचे विचार घोळत होते. तरीही त्याने स्वतःला सावरलं आणि थेट जिममध्ये गेला.
ट्रेडमिलवर धावत असताना त्याचं मन मात्र वेगळ्याच दिशेने धावत होतं.
“आज मी आजोबांसोबत बोलू का?” तो स्वतःलाच प्रश्न विचारत होता. “ती कोण आहे? आजोबा मला सांगतील का?
मी तिचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाही… नाव तरी आठवत नाही आहे.”
मी तिचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाही… नाव तरी आठवत नाही आहे.”
डम्बेल उचलताना त्याचा हात क्षणभर थांबला.
“आणि तरीही… मला पाखी आवडायला लागली आहे,”
हा विचार मनात येताच तो स्वतःवरच चिडला.
हा विचार मनात येताच तो स्वतःवरच चिडला.
“माझं लग्न झालं आहे… हे मी विसरतोय का?”
राजने पुन्हा जोर लावला, वर्कआउटची गती वाढवली.
घामाच्या थेंबांसोबत मनातले गोंधळलेले विचारही जणू बाहेर पडत होते.
घामाच्या थेंबांसोबत मनातले गोंधळलेले विचारही जणू बाहेर पडत होते.
पण एक गोष्ट त्याला स्पष्ट जाणवत होती
मन जरी स्वतःला समजावत असलं,
तरी हृदय मात्र पाखीच्या दिशेने ओढ घेत होतं.
मन जरी स्वतःला समजावत असलं,
तरी हृदय मात्र पाखीच्या दिशेने ओढ घेत होतं.
क्रमश
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
दिपाली चौधरी
तुम्हांला कथा आवडत असेल तर, लाईक आणी कमेंट करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा